अमृतरूपी झरा
डोंगराच्या कुशीत मातीच्या पोटी
उगवला एक झरा
सहजच पाहिले मी त्याला
खळखळ हासत होता
पटपट बोलत होता
झरझर पुढे चालत होता
काट्या-कुट्यातून वाट शोधत होता
दगडालाही भेग पाडत होता
आपल्या पाण्याने कुणा कित्येकजणांना तृप्त करत होता
कुठेतरी सहजच सुंदर बाग फुलवून पुढे जात होता
उपकाराची परतफेड मागत नव्हता
पुन्हा एकदा
मानवास हरवत होता.........
प्रतिक्रिया
21 Oct 2008 - 7:11 am | चन्द्रशेखर गोखले
छान कविता ! लिहीत रहा