व्यथा

सुरताल's picture
सुरताल in जे न देखे रवी...
19 Oct 2008 - 12:08 am

सारे ओळखीचे डोळे पुसून गेले!
होते अनोळखी ते गाली हसुन गेले!

ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की,
माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले!

माझ्या पराभवाची चर्चा कुठे न झाली
घायाळ काळजाला विंचू डसून गेले!

डोळ्यात चाहत्यांच्या मी बांधल्या हवेल्या
कळले मला न केंव्हा घरटे बसुन गेले!

जे काल जाहले ते मी आठवू कशाला?
डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले!

सुरताल

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

19 Oct 2008 - 12:13 am | ऋषिकेश

चांगला प्रयत्न..
फक्त

जे काल जाहले ते मी आठवू कशाला?
डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले!

अथे एकदम अचानक विनाकारण आलेला आशावाद मात्र खटकला / बाकी कवितेच्या भुमिकेशी विसंगत वाटला

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मनीषा's picture

19 Oct 2008 - 7:56 am | मनीषा

---आणि आशयपूर्ण कविता ..

सारे ओळखीचे डोळे पुसून गेले!
होते अनोळखी ते गाली हसुन गेले!

जे काल जाहले ते मी आठवू कशाला?
डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले! .... हे खासच !

मदनबाण's picture

19 Oct 2008 - 12:00 pm | मदनबाण

व्वा. कविता फार आवडली..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

दत्ता काळे's picture

19 Oct 2008 - 1:08 pm | दत्ता काळे

ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की,
माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले!

- जीवघेण्या शब्दलाईनी.

सुरताल's picture

20 Oct 2008 - 1:04 am | सुरताल

मनपुर्वक आभार!
दहा वर्षापुर्वी केलेली कविता.
मानवर आघात करणारे काहि तरी घडले होते त्यातुन सुचलेले काव्य.
आताशा असे काही सुचत नाहि.आणि सुचले तरी शब्दात उतरवणे कठीण झालय
सुरताल

सासुरवाडीकर's picture

31 Dec 2012 - 5:06 pm | सासुरवाडीकर

:( :-( :अरेरे:

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Dec 2012 - 5:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडली.
पुलेशु