बठा चालना गयात
ज्या वट्टावर बठी बठी आमि भयाण गप्पा मारुतं
ज्या लाइंग न खांब खाले एक दुसरांनी टेस्ट लेउत
जो वट्टा झिजाई मन्या साऱ्या सुट्या खपी जाऐल शेतं
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
फोनवर कितलक बोलुत आमि ?, बीजी राहतस आणी बिलं बी येस
फेसबुक वर बी कितलक chat करुत , बोलणं कयस पण चेहरा याद येस
ऑनलाईन राहतस चोवीस तास, पण गावमा ऑफलाईन दीखेल शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
सावन जाई बठेल शे दुसरा गावमा, तर मह्याना अभ्यास चालू शे
ननूनी MPSC नि तयारी , ते कुलदीपले चांगला जॉब शे
मी बी शे आपला काममा , पण डोया गाववर लागेल शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
योगेशनं नवनव काम शे , तो थोडाच दिवस येस
चेतननं तर कयत बी नई , कावे जासं आणि कवे येस
बठासन आपलं जीवन शे, नि बथासना आपला कामे शेत
तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
हाशेलना आवाज सावन तुना , कानवर दिनभर भुणभुण करस
तुना कायदाना अभ्यास नानू , आजबी आमले दोषी म्हणस
मह्याले संताप आजबी येस , आणि कुलदीपना डायलाग पाठ शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
कोणले फ़ोन करी बाहेर बलाडुत , बठा दूरदूर चालना गयात
खंडेराववर कोणी वाट देखुत, सुट्या साऱ्यासन्या संपी गयात
वट्टावर बठेल शे धूळ बठी , दुसरा कोण बठाव शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल
match ना गप्पा कोण मारी आते, आणि कोण फिलासाफी शिकाडी
येणारा जाणाराले कोण चीडाई आते, आणि कोण गाना वजि दाखाडी
गुपचुप कानमा वायरिं टाकी, गाना एकटाच ऐकाव शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल
मना प्रॉब्लेम कोनले सांगू आते, कोण सल्ला द्यावावं शे
दु:खे मना दूर करात ज्यासनि, त्यासले Thank You बोलणं शे
आपला साऱ्यासनि भावना त्या वट्टालेबी कयस
म्हनिसन तो निर्जीव वट्टाबी आपली वाट देखस
.......................................................RDK
प्रतिक्रिया
21 Sep 2017 - 1:26 pm | पैसा
मराठीत प्रचलित नाहीत त्या शब्दांचे अर्थ देता का? म्हणजे कविता समजेल.