नमस्कार मिपाकरहो!
"गोष्ट तशी छोटी.." आणि मिपा दिवाळी अंकाचे काही तरी ऋणानुबंध असले पाहिजेत. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात "गोष्ट.."ची घोषणा झाली होती. यंदा सुद्धा दिवाळी अंकासाठी सासं आणि "गोष्ट ..." टीम पुन्हा एकत्र आले आहेत.
आजकालच्या डिजिटल युगात लेखनासोबतच व्हिडीओ ब्लॉगिंग आणि पॉडकास्ट सारखे उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत चालले आहेत. मिपानेही मागच्या दिवाळीत आपले यू ट्युब चॅनल सुरू करून नव्या अभिव्यक्तीची दारे उघडली होती. यंदाच्या दिवाळी अंकात आपण एक संपूर्ण विभाग दृकश्राव्य माध्यमाकरिता राखून ठेवत आहोत. "गोष्ट..." च्या टीम वर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा तुमच्या बरोबर फटाके फोडायला सज्ज आहोत.
आपण आपली डिजिटल दिवाळी अगदी धूमधडाक्यात साजरी करायची. दर्जेदार लेखन हा आपल्या मिपा दिवाळी अंकाचा यु एस पी! लेखनाच्या बरोबरीनेच आता आपण आपल्या अंगचे इतरही गुण उधळायला तयार व्हायचं. आता तुम्ही म्हणाल नेमकं काय करायचं बुवा? तर त्याचे तपशील खाली दिले आहेतः
१. दिवाळी पहाट
महाराष्ट्रात दिवाळी पहाट हा दिवाळीचा अविभाज्य भाग आहे. मिपाकरांनी एक अशीच मैफिल जमवली तर? आपल्यापैकी अनेक जण उत्तम गायक अथवा वादक असतील. आपण सर्व मिळून एक डिजिटल दिवाळी पहाट साजरी करु शकतो. आपल्या गायन अथवा वादनाच्या ऑडिओ फाईल्स आम्हाला पाठवा.
चला मग, मिपाच्या दिवाळी अंकात आपण सुरांनी रंग भरुया!
२. अभिवाचन
आपल्या नवीन कथा, कविता इ. चे अभिवाचन आपण ऑडिओ स्वरुपात देऊ शकता. आपला आवाज चांगला असेल तर लेखकाची परवानगी घेऊन मिपावरच्याच एखाद्या उत्तम कलाकृतीचे अभिवाचनही आपण करु शकता. ह्यानिमित्ताने वाचकांनी त्यांना ऑडीओ बुकमध्ये ऐकायला आवडतील अशी मिपावरची रत्ने शोधून द्यावीत. आम्हाला मिपा मौक्तिकं सुचवा, आपण ती दिवाळी अंकाच्या नियमात बसत असतील तर जरुर या विभागात आणून सजवू.
३. व्हिडीओ दंगा
दिवाळीच्या फराळाच्या पाककृती, एखाद्या हटके ठिकाणी केलेली भटकंती अशा गोष्टी आता व्हिडीओ स्वरुपातही देता येतील. फोटोंच्या स्लाईडशोवर आपले निवेदन टाकून असे व्हिडीओ बनवणं अगदी सोप्पं आहे. त्यासाठी मिपा फिल्लम इन्स्टीट्युटचा क्रॅश कोर्स करुन टाका! - व.. व... व्हिडिओचा! ऊर्फ मिपा फिल्लम इन्स्टिट्युट!
४. दिवाळी देशो देशीची
मिपाकर अख्ख्या जगभर पसरले आहेत. आपल्या गावातील, शहरातील ( भारतात आणि परदेशात) दिवाळीची लखलख तुम्ही घेऊन या. तुमच्या शहराचे दिवाळी फोटोज, सांस्कृतिक कार्यक्रम इ. चे फोटोज / कव्हरेज करुन आम्हाला पाठवा. आपण ते चॅनल वर टाकूयात. दिवाळी अंकाला ही देशोदेशीची झळाळी शोभून दिसेल.
तर मग लागताय ना कामाला?! दिवाळी अंकासाठी असणारे सर्व नियम इथेही लागू आहेतच. त्यासाठी दिवाळी अंक-२०१७ चा आवाहनाचा धागा एकदा जरूर बघून घ्यावा.
आपले व्हिडीओ / ऑडीओ आपण - misalpav.channel@gmail.com इथे पाठवू शकता. साहित्य पाठवण्याची शेवटची तारिख ३० सप्टेंबर २०१७.
कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी आपण पिलीयन रायडर किंवा स्रुजा ह्यांच्याशी संपर्क साधू शकता. मंडळ सेवेस तत्पर आहे!
धन्यवाद!
टीम दिवाळी अंक २०१७
प्रतिक्रिया
11 Sep 2017 - 11:41 am | प्रचेतस
कल्पक उपक्रम होईल.
11 Sep 2017 - 11:58 am | सई कोडोलीकर
वाचकांनी सुचवलेल्या मिपा रत्नामौक्तिकांच्या अभिवाचनात सहभागी व्हायला आवडेल.
11 Sep 2017 - 12:03 pm | यशोधरा
अरे वा! मस्तच!
11 Sep 2017 - 12:22 pm | एस
भारीच.
11 Sep 2017 - 12:32 pm | विनिता००२
अभिवाचन एकट्याचे की ग्रुपचे पण चालेल???
11 Sep 2017 - 5:23 pm | विनिता००२
अभिवाचन एकट्याचे की ग्रुपचे पण चालेल?????? उत्तर द्यावे कोणीतरी
11 Sep 2017 - 5:42 pm | स्रुजा
अहो आम्ही वेगळ्या टाझो मध्ये आहोत, आमचा दिवस सुरु व्हायला वेळ लाग्तो. गृप मध्ये म्हणजे कसं म्हणताय? सांवादात्मक का?
12 Sep 2017 - 10:35 am | विनिता००२
हो म्हणजे कथेत जसे वेगवेगळी पात्रे येतात, तसे २ किंवा ३ जणांनी वाचन करायचे.
12 Sep 2017 - 5:15 pm | विनिता००२
अभिवाचनाचा वेळ साधारण किती असावा?? १० मिनिट / १५ मिनिटं???
12 Sep 2017 - 5:28 pm | गोष्ट तशी छोटी...
१. १० ते जास्तीत जास्त १५ मिनिटे चालेल.
२. २-३ जणांनी मिळून केलेले अभिवाचनही चालेल.
13 Sep 2017 - 9:23 am | विनिता००२
धन्यवाद!
11 Sep 2017 - 12:36 pm | इशा१२३
अरे वा! परत एकदा यशस्वी मंडळ कामाला लागले का!
छान कल्पना आणि शुभेच्छा !!
11 Sep 2017 - 2:09 pm | मोदक
छान कल्पना आणि शुभेच्छा !!
+११
11 Sep 2017 - 12:48 pm | Minal Rao
मिपा दिवाळी अंका च्या प्रतिक्शेत.
11 Sep 2017 - 6:33 pm | जुइ
चांगला उपक्रम आहे.
11 Sep 2017 - 8:17 pm | जेम्स वांड
उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा
11 Sep 2017 - 8:33 pm | दशानन
ऑडिओ चालेल का?
11 Sep 2017 - 8:40 pm | पिलीयन रायडर
हो अर्थातच!
अभिवाचन हे ऑडीओ फाईल मध्येच द्यायचे आहे.
पाककृती , भटकंती सारख्या प्रकारांना फोटो आणि निवेदन असल्याने तिथे व्हिडीओ लागेल.
11 Sep 2017 - 8:43 pm | दशानन
झकास!!!!
11 Sep 2017 - 9:14 pm | गोष्ट तशी छोटी...
जे कुणी इच्छुक असतील त्यांनी आम्हाला तसे कळवले तर येणार्या साहित्याचा अंदाज घ्यायला बरे पडेल. पुनुरावृत्ती टाळायलाही त्याने मदत होईल.
त्यासाठी स्रुजा, पिरा किंवा गोष्ट तशी छोटी.. पैकी कोणत्याही आयडीला कळवावे.
मिपावरचे जे जुने लेख ऑडीओ स्वरुपात यावे असे वाटते, त्यांचे नोड इथे दिलेत तरी चालतील. मात्र दिवाळी अंकात शोभेल असे लिखाण असावे. अर्थात जे दिवाळी अंकात घेता येणार नाही ते आपण दिवाळी नंतर प्रकाशित करु शकतोच.
12 Sep 2017 - 4:24 pm | मियामी
मिसळपावची सदस्य नुकतीच झाले तरी जुनी वाचक आहे मी. एकदा झालेला प्रयोग मिसळपाव साधारण त्याच स्वरूपात परत आणते आहे असे वाटले वाचून. विषय पण अगदीच बाळबोध वाटले . शाळेचा अंक उत्साही मुले करतील तसे काही
खरंतर कोणत्याही अंकाचा मग तो डिजिटल असो किंवा प्रिंटेड स्वरूपातला ,त्यातले लिखाण हे बलस्थान हवे. दृकश्राव्य माध्यमात हे वरचे विषय समहाऊ अंकाला कनेक्ट न करता समांतर राहिल असे वाटत नाही का ? अर्थात मी फारच नवीन आहे मत द्यायला पण 'राजहंसाचे चालणे , भूतली जालिया शहाणे ,आणिके काय कोणे , चालावेची ना ? '
12 Sep 2017 - 5:55 pm | मोदक
"तुम्ही जुने वाचक असून मत देण्याबाबत नवीन आहात" याच्याशी सहमत.
12 Sep 2017 - 6:17 pm | यशोधरा
मोरू परतोनी आला हे नाटक पाहिले आहे का तुम्ही?
12 Sep 2017 - 6:57 pm | सूड
हो तुमचं परिकथेतलं राज्य कसं आहे सध्या र्राजकुमारीजी?
12 Sep 2017 - 7:34 pm | मियामी
का इथे मत देणे हा अपराध आहे? विरोधी असेल तर ग्रुप करुन संशय घेतात का?
आपल्याला माझे इतर प्रोफाईल हवे आहे का मिपाचे जे कोणी असतील चालक त्यांना? हा काय प्रकार आहे?
सरळ नियमात लिहून टाका इथे विरोधी मत देणे नियमबाह्य आहे.
नविन लोकांनी लिहिणे तर अपराध आहे.
प्रत्येक नविन आय डी हा दुसराच कोणीतरी मोरु का कोण आहे असे असते. म्हणजे इथे सदस्यत्व घेणे दुसर्याला अपमानकारक वाटायला लावता आपण.
12 Sep 2017 - 9:09 pm | यशोधरा
कसले फटाफट निष्कर्ष काढता बै तुम्ही!! मी म्हणणार होते, नाटक पाहिलं असेल तर त्याचं अभिवाचन करून तुम्ही सुद्धा का पाठवत नै? मज्जा येईल!
तुम्ही तर एखादया सराईत आयडी सारखे निष्कर्ष काढले ब्वॉ उगाच.
16 Sep 2017 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा
लै लै भारी उपक्रम!
17 Sep 2017 - 12:32 pm | नाखु
बुवांच्या आवाजात जीवनकथा ऐकायला आवडेल,
बुवा मणावर घ्या
डस्टी वगैरे पात्रांच्या आवाजांकरिता हिरवे पारवे कंपनी सहकार्य करेल
कथाकथनी नाखु
25 Sep 2017 - 11:43 am | विनिता००२
मिपावर अभिवाचनाच्या काही फाईल्स होत्या. कुठे सापडतील? मी दिवाळी अंक पाहिला त्यात दिसत नाहीयेत.
25 Sep 2017 - 12:43 pm | पैसा
अनाहिता अंक २०१७ 'उंच माझा झोका' मध्ये http://www.misalpav.com/node/39075 या धाग्यात आणि विशेषांक टॅब खाली मराठी भाषा दिन २०१७ मध्ये काही धाग्यांच्या ऑडिओ फाइल्स आहेत.
25 Sep 2017 - 4:04 pm | विनिता००२
खूप खूप आभार पैसाताई :)
25 Sep 2017 - 9:46 pm | गोष्ट तशी छोटी...
नमस्कार विनिता!
आपला ऑडिओ मिळाला. त्यावर अभिप्रायही दिला आहे.
आपल्या मदतीसाठी ज्या दर्जेदार अभिवाचनांचा आदर्श ठेवून आपण वाचन करू शकता अशा काही लिंक्स सुद्धा पाठवत आहोत.
अजून काही मदत लागल्यास कळवावे.
धन्यवाद!
26 Sep 2017 - 12:25 pm | विनिता००२
लिंक्स साठी धन्यवाद!
नवोदीतांना बरीच मदत होईल त्यांची.