नळावरच्या लायनीत काल जावच लागलं
पुरषासारखा पुरुष असुन ..
त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं
वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी र्हाली
तीचं करुन करुन माय कमरंत वाकली
आज मग बाबुला उदबत्या विकाया धाडलं
आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं
इतक्यात ती समोरुन जणू तरंगत आली...
मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली
तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता
आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता..
सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत...
हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळलं व्हतं...
पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता..
काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला होता..
हा हा म्हणता दोन तास दोन मिनीटात उडाले
शेवटी माझ्याशी बोलण्यासाठी तिने ओठ उघडले..
"नंबर तुझा आहे.. पण मला भरु देशील का पाणी?"
निसत्या आवाजानचं माझ्या मनात नाचु लागली गाणी..
येड्यासारखा मग मी नुसताच लाजलो
हसत हसत तिच्या मागे उभ र्हायलो
घागर भरुन होताच घरी लागली जाउ
च्यायला जाता जाता म्हणली..."धन्यवाद भाऊ !!! "
-ऋषिकेश
(२१ मे २००७)
*******
मि.पा. वर पहिल्यांदाच काही प्रकाशित करतोय. तेव्हा चुका सांभाळून घेणे
प्रतिक्रिया
13 Dec 2007 - 3:29 am | धनंजय
यवढा धरून दम, येना ती, = दमयंती
पन तिनं श्यावटी आसं यिंग्लिशमंदी "धन्यवाद" का म्हनायचं - झ्याक मर्हाटीत "थ्यांक्यू" न्हाय म्हनावं?
गमतीदार कविता!
13 Dec 2007 - 6:32 am | प्राजु
सह्ह्ही आहे कविता....
लईच भारी.
- प्राजु.
13 Dec 2007 - 6:45 am | विसोबा खेचर
ऋषिकेशभाऊ!
लई झ्याक अन ब्येस कविता केलिया तुमी राव!
तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता
आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता..
क्या बात है.. ह्या ओळी सर्वात मस्त! होतं असं जवानीत! एखादी गोड पोरगी आसपास असेल तर बरेचसे गोंगाट हे गोंगाट वाटत नाहीत तर बागेश्री, यमनकल्याण वाटतात! :)
मि.पा. वर पहिल्यांदाच काही प्रकाशित करतोय. तेव्हा चुका सांभाळून घेणे
मिपावरील प्रथमच केलेल्या लेखाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि मनापासून स्वागत! आता मात्र थांबू नका. औरभी लिख्खो...
(२१ मे २००७)
कविता झकास आहे, परंतु एवढी शिळी कविता मिसळपावच्या वाट्याला का बरं?! काहीतरी ताजं, गरमागरम, आणि नुकतंच लिहिलेलं पण येऊ द्या की! :)
तात्या.
13 Dec 2007 - 6:54 am | ऋषिकेश
प्रतिसाबद्दल धन्यवाद
परंतु एवढी शिळी कविता मिसळपावच्या वाट्याला का बरं?! काहीतरी ताजं, गरमागरम, आणि नुकतंच लिहिलेलं पण येऊ द्या की! :)
नक्की!! ये तो शुरुआत है :)
आणि 'भाऊ' ठळक झालेला पाहिला... ;)
- ऋषिकेशभाऊ
13 Dec 2007 - 9:32 am | पुष्कर
कविता आवडली. आणखीन येऊ द्या.
-पुष्कर
13 Dec 2007 - 1:51 pm | केशवसुमार
ऋषिकेशभाऊ!
शिळी असली तरी झकास आहे..आवडली..
नळावरच्या लायनी वरून आम्हाला आमच हे जूने विडंबन आठवलं.. धन्यवाद
केशवसुमार
13 Dec 2007 - 8:30 pm | ध्रुव
--
ध्रुव
14 Dec 2007 - 8:10 am | गुंडोपंत
मस्त आहे.
फक्त शहरी आणि ग्रामीण बोली शब्दांचा थोडा घोळ आहे उदा."जणू " ... असे न म्हणता ''जनू''असा उचार असेल असे वाटते.
पण तरीही वेगळ्या विषयावरची ही कविता खुपच मस्त आहे.
माझ्या कुचकटपणाकडे दुर्लक्ष करइतराजून असेच येवू देणे इतकेच.
आपला
गुंडोपंत
14 Dec 2007 - 6:32 pm | शलाका पेंडसे
धम्मालच कविता आहे.
20 Dec 2007 - 5:58 pm | लबाड मुलगा
छान वाटले
पक्या