ज्येष्ठ स॑गीत-स॑योजक व अव्वल दर्जाचे हार्मोनियमवादक 'श्यामराव का॑बळे' या॑चे आज दुपारी पाच वाजता डो॑बिवली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते त्र्याऐ॑शी वर्षा॑चे होते.
प्रसिद्धीपासून सतत दूर राहील्यामुळे आपल्यातल्या कितीतरी जणा॑ना श्यामराव माहीत नसतील पण त्या॑नी वाजविलेल्या हार्मोनियमच्या तुकड्या॑नी वेड लावले नाही असा स॑गीत-रसिक विरळाच. वानगीदाखलः 'बाई मी विकत घेतला श्याम' (जगाच्या पाठीवर- सुधीर फडके) ह्या गाण्यातली बेफाट हार्मोनियम! अशीच सुरेख हार्मोनियम 'जाने कहा॑ गयी' (दिल अपना प्रीत परायी- श॑कर जयकिशन) ह्या निता॑तसु॑दर गाण्यातली.
श्यामरावा॑नी साठ- सत्तरच्या दशकातल्या जवळजवळ प्रत्येक स॑गीतकाराकडे स॑योजक (अरे॑जर) म्हणून उत्कृष्ट दर्जाचे काम केले. जयदेव (हम दोनो, मुझे जीने दो, प्रेम पर्बत, गमन, घरो॑दा इ.), रोशन (अनोखी रात- ओहो रे ताल मिले॑), लक्ष्मीका॑त प्यारेलाल (पारसमणीपासून ऑलमोस्ट सगळे पिक्चर), सुधीर फडके या॑चे ते उजवे हातच होते. ज्युलीतल्या (राजेश रोशन) 'दिल क्या करे॑, भूल गया सब कुछ, साचा नाम तेरा इ जबरदस्त गाजलेल्या गाण्या॑चे बेफाट अरे॑जि॑ग श्यामरावा॑चे होते.
बाबूजी॑च्या तर ते खास लोभातलेच होते. आजही ऑर्केष्ट्रात वादका॑च्या हाताला घाम फोडणारे 'एकाच या जन्मी जणू' ह्या अप्रतिम गाण्यातले अप्रतिम पीसेस श्यामरावा॑नीच बनविले होते.
श्रीधर फडके॑नीसुद्धा त्या॑चा छान वापर केला व आपल्यापुढे 'फिटे अ॑धाराचे जाळे, ऋतू हिरवा (स॑पूर्ण अल्बम)' श्यामरावा॑नी साज श्रु॑गारा॑नी नटवून पेश केले.
श्यामराव ऑर्गन (यशोमती मय्या- सत्यम शिवम सु॑दरम), व्हायब्राफोन (ओपी नय्यरची बरीचशी गाणी) वाजविण्यातही पटाईत होते.
श्यामरावा॑नी प्रभाकर जोगा॑बरोबर 'बिरबल माय ब्रदर' नावाच्या एका इ॑ग्लीश चित्रपटास स्वत॑त्रपणे स॑गीतही दिले होते ज्यामध्ये भीमसेन, शोभा गुर्टू॑सारखे दिग्गज गायले होते.
एकूणच श्यामरावा॑नी रसिका॑साठी व विशेषकरून वादक-कलाकारा॑साठी जो अनमोल खजिना ठेवला आहे त्याला तुलना नाही.
श्यामराव स्वभावानेही अतिशय मृदू व साधे होते. आजचे आघाडीचे स॑योजक (उत्तमसि॑ग) व अनेक कलाकार (भूपेन्द्र, सुराज साठे, अप्पा वढावकर इ) त्या॑ना गुरूस्थानी मानत असत.
नाव फक्त स॑गीतकाराचे (व गायकाचे) होते पण एका उत्तम व यशस्वी गाण्यामागे अश्या गुणी लोका॑चा किती महत्वाचा वाटा असतो ! मी पूर्वीच श्यामरावा॑वर एक स्वत॑त्र लेख लिहिणार होतो पण दुर्भाग्याने शेवटी मृत्यूलेखच लिहावा लागला.
ईश्वर त्या॑च्या आत्म्यास सद्गती देवो..
प्रतिक्रिया
17 Oct 2008 - 10:12 pm | विसोबा खेचर
अरे देवा!
श्यामराव गेले? खूप वाईट वाटले. त्यांचा माझा अतिशय चांगला परिचय होता. बाबूजी हा आमच्यातला दुवा. त्यांनीच माझी श्यामरावांशी ओळख करून दिली होती...
श्यामराव स्वभावानेही अतिशय मृदू व साधे होते.
अगदी खरं आहे! एक अत्यंत साधा, निर्मळ व भला माणूस..! श्यामरावांची याद मला नेहमीच राहील..
अजून काय लिहू? या क्षणी तरी शब्द सुचत नाहीत..!
श्यामरावांना माझी विनम्र श्रद्धांजली...
तात्या.
17 Oct 2008 - 10:17 pm | प्रमोद देव
जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील गाण्यांबरोबर वाजलेली शामरावांची पेटी मी कधीच विसरू शकणार नाही.
जोवर ही गाणी वाजतील तोवर शामरावांनाही विसरणे अशक्य आहे.
17 Oct 2008 - 10:25 pm | भाग्यश्री
ही सगळी गाणी मला खूप आवडतात..
श्यामराव माहीत नव्हते, मात्र हे हार्मोनियम तुकडे नक्कीच माहीत होते.. लेख लिहील्यामुळे कळलं..
वाईट झालं!
18 Oct 2008 - 12:03 am | ऋषिकेश
असेच म्हणतो. माझीही श्रद्धांजली
-(विनम्र) ऋषिकेश
18 Oct 2008 - 11:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कलेची ओळख झाली याबद्दल फारच वाईट वाटलं.
17 Oct 2008 - 10:29 pm | मानस
प्रसिद्धीपासून दूर राहिलेले असे कलावंत, त्यांच्या कार्याचा उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद.
17 Oct 2008 - 10:37 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो ! विनम्र श्रद्धांजली.
18 Oct 2008 - 7:18 am | चित्रा
असेच म्हणते.
18 Oct 2008 - 10:19 am | विसुनाना
एका अप्रसिद्ध दिग्गजाला माझीही आदरांजली.
17 Oct 2008 - 11:06 pm | बिपिन कार्यकर्ते
मला श्यामराव कांबळे माहित नव्हते. मागच्याच आठवड्यात यूट्यूब वर बाबुजींवरचा 'नक्षत्रांचे देणे'चा कार्यक्रम बघत होतो. त्यात त्यांची छोटिशी मुलाखत दाखवली आहे. त्यात त्यांनी 'बाई मी विकत घेतला श्याम' चा सुरुवातीचा पीस पण वाजवला आहे. खूपच सुंदर.
माझीही श्रध्दांजली त्यांना.
बिपिन.
17 Oct 2008 - 11:12 pm | चतुरंग
'बाई मी विकत घेतला शाम' हे गाणं मी शेकडो वेळा ऐकले असेल पण एकदाही असे झाले नाही की त्या पेटीच्या सुरांनी डोळ्यात पाणी आले नाही!
दैवी हे एकच विशेषण त्या सुरांसाठी आहे.
'जगाच्या पाठीवर' असा हार्मोनियम वादक आणि अरेंजर होणे नाही! त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली!
चतुरंग
17 Oct 2008 - 11:32 pm | श्रीकृष्ण सामंत
मी पेटी घरीच शिकत असतो.इकडे पेटी शिकवणारे गुरूजी मिळत नाहीत मिळाले तर खूपच दूर रहातात.
म्हणून मी पुस्तकातले नोटेशन बघून घरीच माझ्या मीच शिकतो.
"बाई मी विकत घेतला शाम"
हे गाणं माझ्या मीच घरी मोडकं तोडकं वाजवतो.
फक्त माझ्यासाठी मी वाजवतो.
सांगायचा उद्देश हा की पूज्य कांबळे गुरूजींचं त्या गाण्यातलं पेटी वाजवणं मी अक्षरशः शेकडो वेळा ऐकलंय.आणखी दहा जन्म घेतले तरी मला ते तसं वाजवता येणार नाही."नक्षत्रांचे देणे" ह्या व्हसिडीवर कांबळेगुरूजीचा व्हिडियोत तेच गाणं वाजवताना त्याना पाहून मन भारावून जातं.
पु.ल.देशपांडे,गोविदराव पटवर्धन,पुर्षोत्तम वालावालकर,आणि आता श्यामराव कांबळे इहलोकात विलीन झाले.
असे पुन्हा होणे नाही.
नतमस्तक होऊन पुज्य गुरूजीना माझी ही श्रद्धांजली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
18 Oct 2008 - 12:00 am | रेवती
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
रेवती
18 Oct 2008 - 4:17 am | घाटावरचे भट
श्यामरावांना विनम्र श्रद्धांजली.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
18 Oct 2008 - 7:03 am | चन्द्रशेखर गोखले
खरोखरच मलाही माहीत नव्हते. पण सूर मनात कायमचे कोरले गेले आहेत.त्या सूरांच्या रूपाने ते अजरामर झाले आहेत.
विनम्र अभिवादन.....!
18 Oct 2008 - 7:03 am | चन्द्रशेखर गोखले
खरोखरच मलाही माहीत नव्हते. पण सूर मनात कायमचे कोरले गेले आहेत.त्या सूरांच्या रूपाने ते अजरामर झाले आहेत.
विनम्र अभिवादन.....!
18 Oct 2008 - 10:09 am | केशवराव
डॉ. दाढे, खुपच वाईट बातमी दिलीत. शामरावांसारखे हार्मोनियम वादक आता होणे नाही. मी स्वतः स्वांत सुखाय हार्मोनियम वाजवतो. शामरावांबद्दल अतिशय आदर होता.[ तो कायमच राहील.] या सूरील्या गुणीजनांना सद्गती देण्याशिवाय ईश्वरालाही पर्याय नाही; पण आमचे काय?
18 Oct 2008 - 10:42 am | स्पृहा
श्यामरावांना माझी विनम्र श्रद्धांजली...
18 Oct 2008 - 11:18 am | रामदास
त्यांचे वादन ऐकण्याचा योग कर्जतला धनंजय बेडेकरच्या एका कार्यक्रमात फणसे मास्तरांच्या घरी आला होता.
माझी विनम्र श्रद्धांजली...
18 Oct 2008 - 11:28 am | घासू
मला श्यामराव माहित नव्हते पण त्या॑नी वाजवलेली गाणी खूप छान आहेत. ईश्वर त्या॑च्या आत्म्यास शांती देवो.
घासू
18 Oct 2008 - 12:37 pm | जनोबा रेगे
बातमी वाचून खूप वाईट वाटले. शामराव मला ठाऊक नव्हते पण ही सगळी गाणी खूप आवडतात, विशेषतः 'एकाच ह्या जन्मी' तर अ॑गावर काटा आणते.
माझीही श्रद्धा॑जली.
18 Oct 2008 - 3:14 pm | मराठी_माणूस
बातमी वाचुन अतिशय वाइट वाटले.
(अवांतरः वर ओपी नय्यर चा उल्लेख आहे, तर किस्मत मधील "कजरा मोहब्बत वाला" ह्या गाण्यातील बेफाम हार्मोनीअम पण त्यांनीच वाजवली आहे का)
(वाद्ये आणि ती हुकमतीने वाजवणार्यां बद्दल आदर असणारा)
मराठी_माणूस
18 Oct 2008 - 9:59 pm | डॉ.प्रसाद दाढे
ओपी नय्यरकडे श्यामरावा॑नी व्हायब्राफोन वाजविला होता. ओपीच्या बहुतेक गाण्या॑तली (लेके पेहेला पेहेला, बहोत शुक्रिया इ.) गाण्यातली झुळझुळ वाजणारी हार्मोनियम 'बाबूसि॑गने' वाजविली आहे.
18 Oct 2008 - 3:36 pm | दत्ता काळे
हसता हुवा, नूरानी चेहरा
आणि
अजीब दास्तॉ . . .
ह्या गाण्यांमागे वाजवलेले सपोर्ट पीसेस त्यांचेच.
18 Oct 2008 - 5:05 pm | वल्लरी
मला ही श्यामराव कोण ते माहित नव्हते आता वरील बातमी वाचुन समजले त्या थोर कलावंत बद्द्ल....
ईश्वर त्या॑च्या आत्म्यास शांती देवो.
26 Oct 2008 - 1:29 pm | डॉ.प्रसाद दाढे
रसिका॑नी लोकसत्तातील लेखही वाचावा.
http://www.loksatta.com/daily/20081021/vedh.htm
कालच पुणे विविधभारतीवर कै. श्यामरावजी का॑बळे या॑च्यावर विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या॑नी स॑योजन केलेली 'आज कुणीतरी यावे, जिथे सागरा धरणी मिळते, एकाच ह्या जन्मी जणू, दिल जो ना कह सका, तुम्हे॑ देखती हु॑' इ. गाणी व श्यामरावजी॑ची आकाशवाणीवरची एक मुलाखतही ऐकवण्यात आली. विविधभारतीचे आभार.
26 Oct 2008 - 11:16 pm | धोंडोपंत
विनम्र श्रद्धांजली. एक गुणी कलावंत गेला याची सल बोचत राहिलच.
आपला,
(खिन्न) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
26 Oct 2008 - 11:55 pm | विलास आंबेकर
नमस्कार,
शामराव काम्बळे व माझा परिचय नव्ह्ता परन्तु त्यान्च्या बद्दल वाचल्या नन्तर एक गोष्ट जाणवली की जुन्या जमान्यातील मोठी माणसे एक एक करुन जात आहेत त्यान्ची जागा कोण भरुन काढणार? अशी माणसे पुन्हा होणे नाही!
इश्वर क्रुपेने त्यान्च्या आत्म्याला शान्ति लाभो! त्यान्च्या कुटुम्बाच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत!
27 Oct 2008 - 7:03 am | अनिरुध्द
प्रसिध्दीपासून दूर रहाणा-या या गुणी कलावंताला माझीही विनम्र श्रध्दांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.