अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग २
( अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40769 )
काही दिवसांनंतर -------------
भागीरथ उद्योगसमुहाने उद्योग जगतात नुकतीच २५ वर्षे पुर्ण केली होती . त्या निमित्ताने या समुहाच्याच एका पंचतारांकीत हॉटेलमधे भव्य समारंभ आयोजीत केला होता .
देश विदेशातील अनेक नावाजलेल्या व्यक्ती या समारंभाला उपस्थीत राहणार होत्या . या समारंभाची व्यवस्था पाहण्यासाठी आदिती भागीरथ एक दिवस आधीच हॉटेलमधे आलेली होती . हॉटेलच्या १३व्या मजल्यावर आदितीसाठी कायम स्वरुपी एक स्वीट राखीव होता .
आपल्या स्वीटमधे बसुन आदिती या आयोजीत केलेल्या समारंभाची माहिती घेत होती . तिच्यासमोर अदबीने उभा राहुन धनसुख समारंभाची रुपरेषा सांगत होता . पण आदितीचे त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते . ती मधेच कसलातरी विचार करत होती . आपले बोलणे संपवुन धनसुख जेव्हा जायला निघाला , तेव्हा तिने अचानक त्याला विचारले .
"धनसुख , मला आठवते आहे की , काहि दिवसांपुर्वी दुपारी ३ वाजता प्राध्यापक नीलकंठ मला भेटायला येणार होते . तशी अपॉइंटमेंटही ठरलेली होती . पण नंतर ती अपॉइंटमेंट कॅन्सल झाली . नीलकंठ सर मला भेटलेच नाहीत . कामाच्या गडबडीत मलाही नंतर याचा विसर पडला . सरांना काही प्रॉब्लेम होता का ? "
धनसुख थोडा गडबडला . पण लगेच सावरुन तो धुर्तपणे बोलु लागला .
"काही कल्पना नाही मॅडम . मी अपॉइंटमेंट ठरलेल्या दिवशी दुपारी ३ पासुन तासभर नीलकंठ सरांची वाट पाहिली . पण ते आलेच नाहित . तसेच त्यांचा काहि फोनही आला नाही . मी सुद्धा माझ्या बाजुने त्यांना कितितरी वेळा फोन केला . पण त्यांचा फोन बंदच होता . "
"बरं . ठिक आहे . यु कॅन गो नाउ . ती समारंभाच्या कार्यक्रमाची फाइल तेवढी इथे ठेउन जा . मला एकदा परत सगळी व्यवस्था तपासुन बघायची आहे . " आदिती थोडा विचार करत म्हणाली . धनसुख फाइल ठेवुन तिथुन त्वरेने निघुन गेला .
आदिती थोडा वेळ फाइल बघत बसली . तेवढ्यात तिच्या रुमची डोअरबेल वाजली . तिने दरवाजा उघडुन पाहिले तर कुणीतरी कुरीअर कंपनीतला तरुण हातामधे फुलांचा बुके घेउन उभा होता . आपला चेहरा त्याने टोपीने बराचसा झाकला होता .
" धिस इस अ गिफ्ट फॉर यु मॅडम .. फ्रॉम सम वेल विशर .." त्याने तो फुलांचा बुके पुढे करत सांगितले .
"ओके . थँक्स . प्लीज कीप इट देअर . " तिने आतमधील टेबलाकडे बोट केले . त्या तरुणाने तत्परतेने तो बुके रुममधील टेबलावर ठेवला .
"हॅव अ नाइस डे मॅडम " असे म्हणत तो रुममधुन बाहेर पडला . आदिती परत रुमचा दरवाजा लावुन घेउ लागली . तेवढ्यात तिची नजर बाहेरच्या पॅसेजमधे गेली . तिच्या रुमबाहेर इतका वेळ उभे असलेले तिचे सिक्युरिटी गार्ड आता कुठेच दिसत नव्हते . आदितीला आश्चर्यच वाटले . ती दरवाजा बंद करायचा विसरुनच गेली . तेवढ्यात त्या फुलांच्या बुकेमधुन एक तीव्र स्वरुपाचा गंध सर्व रुममधे पसरला . त्या गंधाच्या प्रभावाने बघता बघता आदिती बेशुद्ध होउन रुममधे कोसळली .
त्या गंधाची तीव्रता काही क्षणांत ओसरली . हि संधी साधुन तो तरुण परत आदितीच्या रुममधे आला . बेशुद्ध आदितीकडे पाहुन त्याने आपल्या मोबाइलवर कुणालातरी काहितरी निरोप दिला . पुढच्याच क्षणी पलीकडच्या रुममधे दबा धरुन बसलेले त्याचे चार साथीदार आदितीच्या रुममधे आले . त्यातल्या एकाने आपल्या खांद्यावर धनसुखला आणले होते . त्याने धनसुखचे मुटकुळे खाली फेकले . धनसुखही बेशुद्ध झालेला होता . पलिकडच्या रुममधे आदितीचे सिक्युरिटी गार्डही बेशुद्ध होउन पडलेले होते .
"चला रे . पुढच्या तयारीला लागु . आपल्यापाशी वेळ खुप कमी आहे . " तो तरुण आपल्या साथीदारांना म्हणाला . सगळेजण भराभरा पुढच्या तयारीला लागले .
----------------------------- भाग २ समाप्त --------------------------------------- काल्पनीक --------------------------------------
प्रतिक्रिया
29 Aug 2017 - 8:27 pm | शब्दानुज
29 Aug 2017 - 8:27 pm | शब्दानुज
29 Aug 2017 - 8:30 pm | शब्दानुज
आदितिला जो बुके देण्यात आला त्याचा परिणाम कुरियर बॉयवर का झाला नाही ?
असा कुठला गंध असतो ज्याची तिव्रता अचानक वाढते ?
30 Aug 2017 - 12:35 am | ज्योति अळवणी
बर चालू आहे हं