डॉक्टर सदाभाऊ मराठवाड्याच्या एका दुर्गम म्हणाव्या अश्या भागांत दाखल झाले आणि काही दिवसांनी मी सुद्धा दाखल झालो. सदाभाऊ हे घोरपडे घरातील द्वितीय मुलगे. प्रचंड श्रीमंती घरी वास करत असली तरी सदाभाऊ ना त्यांची काहीही पर्वा नव्हती. ते आधी डॉक्टरकी शिकायला गेले, तिथे एक मुलीच्या प्रेमात पडले आणि वडिलांच्या विरुद्ध जाऊन घरजावई म्हणून ह्या गावांत दाखल झाले. त्यांनी आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहून एखादा चांगला कारकून पाठवण्याची विनंती केली होती. घोरपडे घराण्यात मी कामाला होतो पण दुय्यम दर्जाचा दिवाणजी म्हणूनच. मला दुर्गम भागांत इच्छा जरी नसली तरी पूर्णपणे सारा कारभार माझ्याच हातांत राहील म्हणून मी हि नोकरी पत्करली.
सदाभाऊचे सासरे खरेतर त्या गावांतील चांगले मोठे प्रस्थ होते. गावांत प्रचंड शेतजमीन होती पण अनेक कारणास्तव शेती होत नव्हती. सासरेबुवांना त्यांत रस नव्हता. मला थोडीशी मोकळीक मिळतांच मी घोरपडे घराण्याकडून कर्ज घेऊन शेती उभी केली. हाताखाली अनेक लोकांना तयार केले. सदाभाऊ डॉक्टर म्हणून गावांत सेवारत होतेच पण त्यांच्या आग्रहावरून मी शेती विकसित करत आहे म्हणून मलाही गावांत विशेष मान होता. सदाभाऊ मात्र कधीही माझ्या कामांत लक्ष घालत नसत. पैसे वाढत आहेत ना ? हा एकाच त्यांचा प्रश्न. वर्षां मागे वर्षे गेली. सदाभाऊचे सासरे वारले. सदाभाऊ आणि नीता वाहिनी ह्या आता साऱ्याचे मालक होते. त्यांची दोन्ही मुले शिकायला शहरांत होती. मी स्वतः लग्न करून बायको मुलांना पुण्यात ठेवले होते. मी एक आठवडा पुण्यात राहायचो. गावांत आर्थिक सुबत्ता येऊ लागली होती. सदाभाऊनी आता दहावी पर्यंत चे शिक्षण गावांतच व्हावे म्हणून शाळा सुद्धा उभी केली होती.
अशांत मी एक दिवस पुण्यात असताना तर अली कि नीता वाहिनी अचानक वारली. मी तात्काळ गावी गेलो. संपूर्ण गावावर जणू काही वीज कोसळली होती. त्यादिवशी गावांतील जवळ जवळ प्रत्येक माणूस येऊन गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दूरवर डोंगरांत एक आदिवासी जमातीचे गांव होते ते सुद्धा येऊन गेले. सदाभाऊ ह्यांनी डॉक्टर म्हणून किती काम केले होते ह्याची कल्पना मला त्या वेळी आली.
काही महिने गेले. एक दिवस माझी पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली असल्याने मी पुण्यात गेलो नाही. सदाभाऊ ना सुद्धा काही सांगितले नाही. त्यांचा वाडा चांगला प्रशस्त आणि दुमजली होता. समोरून एक प्रचंड वऱ्हांडा स्वागत करत असे. डाव्या बाजूला त्यांचा दवाखाना आणि आंत गेल्यास घर होते. माझ्या साठी एक मोठे घर वाड्याच्या बाजूला सुमारे ५० मीटर अंतरावर होते. रात्रीच्या वेळी मी अंधारात रेडिओ लावून बसलो होतो. मला रेडिओ अतिशय बारीक आवाजांत ऐकायची सवय. वाड्याच्या बाहेर हालचाल ऐकू अली म्हणून मी खिडकीतून हळूच डोकावून पहिले. एक माणूस हातांत टॉर्च आणि डोक्यावर कांबळ घेऊन जाताना दिसला. मी लक्षपूर्वक पहिले तर त्याने जाऊन दवाखान्याचे दार खटखटवले. सदाभाऊ नि दार उघडले सुद्धा. इतक्या रात्री सदाभाऊ दवाखान्यात पाहून मला सुद्धा आश्चर्य वाटेल. दोघे बाहेर राहूनच काही बोलले आणि तो माणूस डोके हलवत पुन्हा माघारी चालत आला. मला ते सर्व काही विचित्र वाटले.
मी खिडकीतून त्या माणसाला बारकाईने न्याहाळले. परत येताना तो माणूस आणखी कणी नसून आदिवासी गांवातील त्यांचा प्रमुख हणमंत आहे हे कळले. सदाभाऊना मी दुसऱ्या दिवशी काहीही विचारले नाही. इतकी वर्षे गावांत राहून सुद्धा मी गावांत मित्र असे बनवले नव्हते. पैसे व्याजावर वगैरे द्यायचे म्हणजे मित्र बनवून चालत नाही. पण त्या दिवशी मी मुद्दामहून शेती पाहणी करण्याच्या निमित्ताने बाहेर पडलो. शाळा मास्तरांनी चहाला येतंय का म्हटले. मी हो म्हटले. त्यांना सुद्धा थोडे आश्चर्य वाटले.
बोलता बोलता सदाभाऊनी गावांत किती सेवा केली आहे असा विषय काढला. मास्तरांनी डोके हलवले. सेवा केलीय खरी पण हालच दबक्या आवाजांत पण जास्त सेवा सुद्धा गावा साठी चांगली नव्हे बरे. सदाभाऊ फार चांगले व्यक्ती आहेत पण हे गावकरी त्यांना एक दिवस संकटांत घालतील असं अनाहूत सल्ला त्यांनी दिला. "असे का म्हणताय हो तुम्ही मास्तर ? " मी त्यांना विचारले. मास्तरांनी आजूबाजूला पाहत हळूच मला कुजबुजून सांगितले. "अहो, ती सायकल दुरुस्तीवाला पांडू ? त्याची मुलगी १७ वर्षांची आहे आणि पोटुशी राहिली होती. सदाभाऊनी गर्भपात करून दिला. आता मुलीचे आयुष्य वाचवले खरे पण त्यामुळे गावांतील रोमियोंना भलताच चेव चढला. गजाची धाकटी मुलगी तिचेही तसेच झाले आणि त्यांनंतर ती शकू जिचा पती दारू पिऊन मेला तो ? ती सुद्धा गेली होती म्हणे. आता लोक बोलतात कि सदाभाऊ गर्भपात करतात म्हणून असल्या गोष्टी वाढत चाललाय. पूर्वी काय विधवा बाई पोटुशी राहिली म्हणजे गळ्यांत फास किंवा विहिरीत उडी हेच दोन पर्यायात होते बघा." मी समजल्या प्रमाणे डोके हलवले.
"मास्तर, आपण म्हणताय ते बरोबर आहे पण एक काम करा ह्यावर आपले तोंड अगदी बंद ठेवा. कारण काय ज्या शाळेंत तुम्ही शिकवत ती सदाभाऊ च्या पैश्यावर चाललीय. तुम्ही असल्या चहाड्या करताय हि बातमी कुणी तिथे पोचवली तर माझी मैत्री सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही." माझ्या धमकीने मास्तरांचा चेहरा पांढरा फटक पडला. चालत घरी जाताना मला एक गोष्ट आठवली. गावांत शंकर कि कोण तरी एक चांगला शिकलेला मुलगा होता. त्याने मला विचारले होते कि गावांत एखादे औषदांचे दुकान चालू केले तर काही व्याजाने पैसे मिळतील का ? सदाभाऊ आपल्या दवाखान्यात काही औषधें ठेवत पण बहुतेक औषधें शहरांतून मागवावी लागत. मी त्यावेळी तो विषय मनावर घेतला नव्हता पण आता हा चांगला मुद्दा होता.
मी दुसऱ्या दिवशी सुद्धा घरी आहे हे सदाभाऊना ठाऊक नव्हते. मी रात्री मुद्दाम त्यांच्या वाड्यावर पळत ठेवली. मी घरांत ना राहता दूरवर आमचा जनरेटर ठेवण्याचे घर होते तिथे मुक्काम केला. रात्रीचे २-३ वाजले असावेत कि वाड्याच्या मागच्या बाजूचे दिवे चालू झाले, मी हळू हळू झाडांच्या मागे लपत वाडयाच्या मागीलदारी पहिले. एक आकृती दिसत होती, वाड्याचे मागील दार उघडले आणि सदाभाऊ दिलेले. आतील उजेडाने आता त्या आकृतीवर प्रकाश पडला होता. ती एक स्त्री होती, स्त्री काय मुलगीच होती. आदिवासी. तिच्या कपड्यावरून ती मी ओळखली. ती आंत गेली. दरवाजा बंद झाला.
मी आता ह्या कोड्याचे तुकडे जुळवायला घेतले. माझ्याकडे वाड्याच्या सर्व किल्ल्या होत्या. वाड्याला शहरांतून नवीन प्रकारची लोक्स मीच बसवली होती. मी पुन्हा मागील दारी गेलो. हळूच दार बाहेरून उघडले. दिवे बंद होते ते तसेच ठेवले. चालत चालत मला दवाखान्याच्या बाजूला जायचे होते. नक्कीच इथे सदाभाऊ गर्भपात घडवून अनंत असतील असा माझा होरा होता. अर्थांत त्यांत चुकीचे असे काहीच नव्हते पण मी जे काही करत होतो ते फक्त उत्सुकतेपोटी. पकडला गेलो तर घरांत चोर घुसला असे सांगून मी स्पष्टीकरण दिले असते. वाड्याच्या आंत डाव्या बसूला दवाखाना होता. पण तिथे जाण्याआधी मला उजेडाने भरलेल्या हॉल मधून जावे लागले होते. हॉल च्या डाव्या बाजूला होता सासरबुवांचा बेडरूम जो त्यांच्या निधनानंतर बंदच ठेवला होता. हॉल च्या वर जिन्याने गेल्यास सदाभाऊचा बेडरूम होता. हॉलच्या एन्ड ला डाव्याबाजूला दवाखान्याची एंट्री होती.
तिथे जाण्यासाठी सासरबुवांच्या बेडरूमच्या बाजूने मला जायचे होते. पण जाताना वाटले के तेथील दिवे चालू आहेत. मी दचकलो. ह्या रूम मध्ये अगदी कोणालाही प्रवेश नव्हता. मी चाचपणी करण्याच्या उद्देशाने जवळ गेलो तर दार बंद नव्हतेच. मी दाराच्या फटीतून आंत पहिले आणि माझ्या अंगावर काटा आला. सदाभाऊ आणि ती आदिवासी मुलगी पूर्णपणे विवस्त्र होऊन प्रणयकीडा करत होती. ती मुलगी सुद्धा त्यांत स्वखुशीने आणि अतिशय आनंदाने भाग घेत होती असे वाटत होते. दोघांनाही कशाचीही शुद्ध नव्हत. मी एक पाऊल मागे घेतलं आणि हळू हळू आलो होतो तास मागच्या पावली परत गेलो. पत्नी सुख नसल्याने सदाभाऊ अश्या गोष्टीं मन रामावर आहेत ह्याचे आश्चर्य वाटले तरी चीड वगैरे आली नाही. मी पत्नीपासून दूर असल्याने गावांत काही मुलीकडे माझी नजर सुद्धा वाईट दृष्टीने गेली असावी असे मी म्हणू शकतो पण एक अर्थाने सदाभाऊचा मला हेवा सुद्धा वाटला.
दुसऱ्यादिवशी पुन्हा हणमंत येऊन सदाभाऊशी बोलून गेला ह्या वेळी सदाभाऊ आणि हणमंत ह्यांच्या मध्ये आवाज वाढवून काही बोलणे झाले असे वाटले. मी सकाळी सदाभाऊना भेटायला गेलो. मी लवकर आलो असे त्यांना वाटले. मी सुद्धा त्यांना खर काय ते सांगितले नाही. तर गावांत एखादे मोठे पक्के मार्केट बनवले तर चालू शकते असा विचार मांडला. सदाभाऊ ना त्यात वावगे वाटले नाही. मग मी त्यांना एखादी फार्मसी उघडण्यासाठी काय करावे लागते असे विचारले. त्यांच्या मते त्या साठी आधी प्रशिक्षित माणूस पाहिजे असेल आणि असा माणूस गावांत येऊन राहणे मुश्किल आहे. पण मग पूर्ण फार्मसी उघडण्य ऐवजी फक्त साधी औषधें ठेवणारे दुकान केले तर ? गावांत किमान निरोध आणि गर्भनिरोधक गोळ्या ह्यांना प्रचंड डिमांड आहे असे ऐकण्यात आले आहे अशी एक बातमी त्यांच्या कानावर घातली. सदाभाऊचा चेहरा बदलला त्यांच्या चेहऱ्यावर काडी नाही ते रागाचे भाव निर्माण झाले. औषधांच्या बरोबर त्यांनी त्या मार्केटची संकल्पना धुडकावून लावली आणि मला जायला सांगितले.
काही आठवडयांनी सदाभाऊ वारले. एका सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या सासरेबुवांच्या शयनकक्षांत मिळाला. शरीराची अवस्था पाहून त्या मुलीबरोबबर संभोग करताना त्यांना हृदयविकाराचा झटका वगैरे आला असावा. मी त्या आठवड्याला सुद्धा काही तरी कारण काढून मागे घरीच राहिलो होतो आणि एक दुसरी मुलगी त्या दिवशी घरांत आली होती. मी घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी म्हणून त्यांच्या मृत शरीरावर कपडे चढवून नंतर लोकांना बोलावणे पाठविले.
काही वर्षे निघून गेली आणि माझा मुलगा कॉलेज मध्ये जायला लागला आणि मी बायकोला गावी बोलवून घेतले. एक दिवस हणमंत मला भेटला मी त्याला बाजूला नेवून विषय काढला. तो चमकेल असे वाटले होते पण नाही. त्याला अजिबात काहीही आश्चर्य वाटले नाही. हणमंता च्या गावांत एक तांत्रिक उपस्थित झाला होता. गावांतील अनेक लोक गुप्त रित्या त्याच्या नादाला लागले होते. तो म्हणे गुप्तधन वगैरे दाखवून देऊ शकत होता. पण त्यासाठी अनेक घाणेरड्या गोष्टी करणे आवश्यक होते. काही गोष्टी ऐकून मला अगदी किळस आली. काही साधनेत मृत गर्भ हवे होते. असे गर्भ कुठे मिळतील ? मग हणमंत डाक्टर कडे आला. त्यांनी बऱ्याच वाटाघाटी नंतर मेनी केले कि गावांत कुणी गर्भपात घडवून आणला कि मृत गर्भ डॉक्टरांनी हणमंतला द्यायचा आणि त्याच्या बदल्यांत हणमंता त्यांना त्याच्या गावांतील कोवळ्या पोरी आणून द्यायचा.
डॉक्टरांनी ह्याचा मनसोक्त लाभ घेतला पण हळू हळू गावांत गर्भपाताचे प्रमाण कमी झाले आणि हनुमंताने एका पोरींकडून त्यांच्या अंगांत विष टोचले. त्याने डॉक्टरांचा मृत्यू झाला आणि तो तांत्रिक सुद्धा अश्याच पद्धतीने हणमंताने मारला. त्याच्या चेहऱ्यावर सर्व काही सांगताना इतके निर्विकार भाव होते कि माझ्या अंगावर काटा आला.
इतरत्र प्रकाशित : https://cafe.bookstruck.in/t/topic/387
प्रतिक्रिया
17 Aug 2017 - 9:38 am | एमी
बाप्रे :o
तुमचे सगळे लेख सत्यकथा आहेत का?
17 Aug 2017 - 10:07 am | धर्मराजमुटके
तुमच्या सगळ्या कथा सुंदर आहेत पण त्यातील बर्याचशा अतिंद्रिय अनुभवात बसतात काय याबद्द्ल साशंक आहे.
17 Aug 2017 - 9:45 pm | ज्योति अळवणी
आवडली कथा
19 Aug 2017 - 6:28 am | विजुभाऊ
डॉक्टरांच्या प्रॉपर्टीचे नंतर काय झाले? ती कोणाला मिळाली
19 Aug 2017 - 7:20 am | नावातकायआहे
अतिंद्रिय अनुभव?
19 Aug 2017 - 8:45 am | हरवलेला
नावात काय आहे :)