तुझ्याशिवाय
माझं आयुष्य
वजा तू
फक्त एक शून्य
तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजतचं नाही
प्रत्येक पावलागणिक
तुझा विचार असतो
तू नाहीस
ही कल्पनाच
मी करत नाही.
तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजतचं नाही
मी खूप भांडतो तुझ्याशी
पण त्याच्या कित्येक पटीने
प्रेम करतो तुझ्यावर
नकळत दुःखवले जातो आपण
मी मुद्दाम तसं करत नाही
तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजतच नाही
मला ही आयुष्याची
वाट चालायचीय अजून
पण तू हवीस
तू नसशील तर मला
हे चालणेच नकोय
देवाकडे दुसरं काही
मागत मी नाही
तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजत नाही.
----हे वाचलेलं आणि अनुभवलेलं.
आपला धुमधडाका
प्रतिक्रिया
16 Oct 2008 - 8:40 pm | शितल
मी खूप भांडतो तुझ्याशी
पण त्याच्या कित्येक पटीने
प्रेम करतो तुझ्यावर
नकळत दुःखवले जातो आपण
मी मुद्दाम तसं करत नाही
तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजतच नाही
छान भाव मांडले आहेत.
:)
17 Oct 2008 - 1:38 pm | धुमधडाका
धन्यवाद !!!!!!
शितल
17 Oct 2008 - 3:02 am | प्राजु
ते वाचलेलं आणि अनुभवलेलं.. मस्त आहे मांडलं इथे :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Oct 2008 - 12:28 pm | सचिन जाधव
भाव समजले.........
राव आपल अण तुमच सारखच आहे..........
जीना इसिका नाम हे.
प्रत्येक पावलागणिक
तुझा विचार असतो
तू नाहीस
ही कल्पनाच
मी करत नाही.
तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजतच नाही
मला माझे दिवस आठ्वले.............
17 Oct 2008 - 1:18 pm | अनिल हटेला
छान कविता !!!
माझं आयुष्य
वजा तू
फक्त एक शून्य
भावना पोचल्या...
(सुखरूप )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..