माझा कुठला धर्म, माझा कुठला पंथ
मी कुठल्या तळ्यातला, माझा कोण संत
माझी कुठली जात, कुठली उपजात
नेमकी कुठल्या समईतली, मी वात
निळे अंबर, हिरवा निसर्ग
भगवा सुर्योदय, कोणाचा कुठला रंग
हा संप्रदाय, तो संप्रदाय
ज्याचा त्याचा आपआपुला समुदाय
अनादी मी, अनंत मी
आत्ममग्न, निसंग मी
सुधीर देशमुख
प्रतिक्रिया
15 Aug 2017 - 6:38 pm | तृप्ति २३
व्वा खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
मराठी कविता
15 Aug 2017 - 6:43 pm | धर्मराजमुटके
छान आहे कविता !
19 Aug 2017 - 9:55 am | sudhirvdeshmukh
आभारी आहे !