अंत आणि आरंभ

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
14 Aug 2017 - 6:49 pm

जीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे...

जीर्ण-शीर्ण कातडी
शेषाने टाकली.

प्रलय अमृतात
धरती न्हाली.

हिरव्या शालूत
नववधू लाजली.

प्रीतीचे गाणे
नभी गुंजले.

अंकुर चैतन्याचे
पुन्हा प्रगटले.

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

15 Aug 2017 - 3:26 pm | धर्मराजमुटके

मस्त आहे मुक्तक आवडले. मात्र मृत्युला माणूस घाबरतो हे ही तितकेच सत्य आहे.