६० वर्षांची 'ड्रीम गर्ल'

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Oct 2008 - 2:55 pm

मित्रानो या गोष्टीवर विष्वास बसत नाहिय्ये.
पण आपली ड्रीमगर्ल हेमा मालिनी चक्क ६० वर्षांची होत्येय.
अजूनही ती तितकीच सुंदर दिसते.
तिच्या वयाच्या तारका आत्ता आज्जी झाल्यात. त्यांच्याकदे पाहुनही असे वातत नाही की खंडहरों से पता चलता है के कभी इमारत बुलंद हुवा करती थी.
ऐन उमेदीची ती सर्वार्थाने ड्रीमगर्ल होती. मध्यम वय तीने सहजतेने स्वीकारले. ( आठवा तिच्या मुलीबरोबर जेट सुगंधी मॅट्ची जहिरात )
बिजवर माणसाशी लग्न केले त्याने समाजात तीला कधीच स्वतःबरोबर वागवले नाही. त्याची कोणतीही तमा खन्त न ठेवता तीने आपल्या मुलीना मोठे केले. त्याना स्वतःच्या पायावर उभे कहाण्यात मदत केली.
कधी नृत्याचे वेगळे प्रयोग तर कधी तेराह पन्ने सारखी वेगळी मालीका यातून ती काही प्रयोग करतच राहिली. चेहेर्‍यावरचा गोडवा अजूनही तस्साच टवटवीत आहे. तीच्या हास्यात तीच जादु अजूनही कायम आहे.
अजूनही ती एखाद्या समारंभात येताच तिच्या आगमनाने चांदणे फुलावे तशी जादु होते.
वय लपवण्याचा तिने कधी खोटा प्रयत्न केला नाही. लग्नानंतर कधीच ती गॉसीप/ पेज थ्री वर झळकली नाही.
तीने "जिंदगी" सहज स्वीकारली. आणि मिळेल त्यात आनन्दी राहिली.
स्वतःच्या उणीवा मान्य करुन ती जगत राहिली
सीता और गिता मधल्या बहिणीं तिच्या इतक्या तन्मयतेने कोणीच साकार करु शकले नाही
शोले मधली बडबडी बसन्ती तर निव्वळ स्वतः जगत असावी इतकी उत्तम होती.
खुशबु मधली खेडूत / रजिया सुलतान मधली रजिया /
तर ऋषी कपूर बरोबर केलेल्या एका चित्रपटात तीने धाकट्या दीराबरोबर लग्न करावे लागणार्‍या वहिनी ची भुमिका तीने योग्य भावानिशी सादर केली.
बागबान मधली तीने सादर केलेली पोक्त गृहिणी पहाताना सुद्धा तिच्यातला आत्मविष्वास ठायी ठायी जाणवत होता. परिपक्व सौंदर्य म्हणजे याचा ती वस्तुपाठच होती .
तिची गणना उत्कृष्ठ अभिनेत्रींमध्ये होऊ शकणार नाही कदाचित.
पण तिच्यातल्या तजेलदार स्त्रीला साठ लाख सलाम,

संस्कृतीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

16 Oct 2008 - 2:57 pm | जैनाचं कार्ट (not verified)

तिच्यातल्या तजेलदार स्त्रीला साठ लाख सलाम,

हेच म्हणतो !

तिचा पंखा !
राजे

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

भडकमकर मास्तर's picture

19 Oct 2008 - 1:11 am | भडकमकर मास्तर

या धाग्यात प्रकाशचित्र तर हवंच ना !!!

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2008 - 10:31 pm | प्रभाकर पेठकर

६० वर्षांची अज्जीबात वाटत नाही हंऽऽ.....!

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

सखाराम_गटणे™'s picture

16 Oct 2008 - 2:57 pm | सखाराम_गटणे™

सहमत

टारझन's picture

16 Oct 2008 - 6:48 pm | टारझन

असहमत !!!
मेक अप काळाच्या सुरकुत्या झाकतो असे म्हणतात ...
मला डाउट आहे हेमाला झोपेतुन उठल्यावर पाहिलं तर विजाभौ असाच लेख काढण्याची पुन्हा चेष्टा करतील ..

बाकी लहानपणी ( शोले पाहिल्यावर ) काही काळ आम्हीही हेमा-श्रीदेवीची स्वप्न पाहिल्याचं आठवतय ... :) नंतर माधूरी दिक्षित आणि आता येउन जाउन कत्रीना , म्हणजे काळा नुसार आमची ड्रिम गर्ल चेंज झाली ...
काळ कोणालाच सोडत नाही हेच खरे ... कितीही संतुर उगळला तरी !

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Oct 2008 - 8:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेक अप काळाच्या सुरकुत्या झाकतो असे म्हणतात ...
मला डाउट आहे हेमाला झोपेतुन उठल्यावर पाहिलं तर विजाभौ असाच लेख काढण्याची पुन्हा चेष्टा करतील ..

टारू, हेमा मालिनीच्या तरूण दिसण्याचं (तिनेच उघड केलेलं) गुपित फक्त मेकअप नाही आहे; तर ते आहे स्टेरॉईड्स आणि कॉस्मेटीक सर्जरीज. शिवाय ती रोज नाचाचा सराव करते, आणि व्यायामाचा फायदा होतोच (ते तुला माझ्या वयाचा झालास की समजेलच म्हणा!).

अदिती (आज्जी, वय वर्ष ७५ ;-) )

झकासराव's picture

16 Oct 2008 - 2:59 pm | झकासराव

वा! विजुभाउ लेख लिहिलात ते उत्तम केलत.
माझा देखील सलाम हेमामालिनीला.
(ड्रीम गर्लचा फॅन)

अवांतर : ऋषी कपूर बरोबर केलेल्या एका चित्रपटात तीने धाकट्या दीराबरोबर लग्न करावे लागणार्‍या वहिनी ची भुमिका तीने योग्य भावानिशी सादर केली.>>>>>>>>
चित्रपटाच नाव "एक चादर मैलीसी"
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रभाकर पेठकर's picture

16 Oct 2008 - 3:05 pm | प्रभाकर पेठकर

अविश्वसनिय सत्य.

आमचे जितूभाय, देव साहेब पण बरेच दिवस आपले 'तारुण्य' टिकवून होते. आमच्या सारखे, त्यांच्या व्यक्तिमत्वात पन्नाशीतच 'कारुण्य' दिसू लागले नाही.

ऋषी कपूर बरोबर केलेल्या एका चित्रपटात तीने धाकट्या दीराबरोबर लग्न करावे लागणार्‍या वहिनी ची भुमिका तीने योग्य भावानिशी सादर केली.
'एक चादर मैलीसी'...?

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 Oct 2008 - 5:26 pm | डॉ.प्रसाद दाढे

अजूनही ती तितकीच सुंदर दिसते.

एकदम सहमत! मी तिला एकदाच प्रत्यक्ष व जवळून पाहीली आहे. अतिशय ग्रेसफूल आहे. मी तर टकमक बघतच राहीलो होतो. (मनातल्या मनात धर्मे॑द्रचा ज्याम हेवा वाटला होता ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2008 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बागबान मधे ड्रीम गर्ल काय सुंदर दिसते, त्या चित्रपटात स्टोरीबरोबर ती एक न विसरणारी गोष्ट असावी.

तीने "जिंदगी" सहज स्वीकारली. आणि मिळेल त्यात आनन्दी राहिली.
स्वतःच्या उणीवा मान्य करुन ती जगत राहिली
सहमत आहे.

हेमावर मराठीत एक पुस्तक आहे. ( प्रकाशक / पुस्तकाचे नाव विसरलो आहे). त्यात गुलजारची प्रस्तावना अफलातूनच आहे. पुस्तक मिळाल्यास आवर्जुन वाचावे असेच आहे.

ते पुस्तक वाचुन व्रतस्थ जीवन कसे असावे / असते असे समजले.

यशोधरा's picture

16 Oct 2008 - 10:15 pm | यशोधरा

मलाही खूप आवडते हेमामालिनी. अत्यंत ग्रेसफुल वाटते!

वर्षा's picture

16 Oct 2008 - 10:26 pm | वर्षा

साठीची अजिबात वाटत नाही. अतिशय सुंदर दिसते अजूनही!
(त्यामानाने रेखा मला म्हणतात तितकी तरूण वगैरे वाटत नाही. ती साठीची वगैरे आहे की नाही ठाऊक नाही....)
-वर्षा

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2008 - 10:34 pm | प्रभाकर पेठकर

रेखा, ५४ पूर्ण, ५५ चालू.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

विजुभाऊ's picture

17 Oct 2008 - 12:38 pm | विजुभाऊ

रेखा हल्ली जरा उग्र वाटते. जया बहाद्दुरी कडे तर पहावत नाही
हेमाला झोपेतुन उठल्यावर पाहिलं तर विजाभौ असाच लेख काढण्याची पुन्हा चेष्टा करतील ..

टारझनाराव हे भाग्य आम्हाला कोठुन मिळणार ;)
तिच्या ग्रेसफुल सतेज दिसण्याचे रहस्य म्हणजे आयुष्याने जे दिलय ते समाधानाने स्वीकारत ; कामाचा आनन्द घेणे हे असु शकते.

विसोबा खेचर's picture

17 Oct 2008 - 1:11 pm | विसोबा खेचर

वीरूप्राजीच्या बसंतीला आमच्याही शुभेच्छा..! :)

तात्या.

बहुधा जया भाधुरीला मधुमेह असावा. मधुमेही रुग्णांना थकवा लगेच येतो आणि त्यांच्या त्वचेवर त्याचा परिणाम लगेच जाणवतो.

रेखा-जया- हेमा यामध्ये हेमा जास्त कार्यमग्न आहे. हे तिच्या चिरतारुण्याचे रहस्य असावे.

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2008 - 10:38 pm | प्रभाकर पेठकर

बहुतेक धर्मेंद्रला मधुमेह असावा. त्याने हेमा मालीनी पासून जरा दूरच राहावे. मधुमेही रुग्णांची पथ्ये फार कडक बुवा.....

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा