स्वत:वर प्रेम करुन तर बघ....!!!!!

नुसताधिन्गाना's picture
नुसताधिन्गाना in जनातलं, मनातलं
16 Oct 2008 - 11:05 am

स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे आपल्यातली अमर्याद प्रेम करण्याची ताकद ओळखणं. एकदा का ही ताकद ओळखली, की आपण स्वतःवरच नव्हे, तर सगळ्यांवरच प्रेम करू लागतो. .......
तुम्ही स्वतःच्या कधी प्रेमात पडला आहात? स्वतःच स्वतःला खूप आवडला आहात? विचित्र वाटतोय प्रश्‍न, की असा कधी विचारच आला नाही मनात?

हा काही आध्यात्मिक प्रश्‍न नाहीए. साधा सरळ विचार आहे. आपण आपल्याला आवडणे यासारखी सुंदर गोष्ट नाही. आपण नेहमीच इतरांशी असलेल्या आपल्या नात्यांविषयी बोलत असतो, पण आपलं आपल्याशीही काही नातं असतं, याचा अनेकदा विचारच करत नाही. आपण आपल्यालाच काही देणं असतो. आपलं आपल्याशीच काही मागणं असतं. कधी मनाच्या या आवाजाचा विचार केला आहे? इथे आतला आवाज म्हणजे आपली विवेकबुद्धी अपेक्षित नाही. तो तर मनाचा एक वेगळाच कप्पा आहे... आपल्याला अंतर्बाह्य सच्चा ठेवणारा. हा आवाज आहे आपल्याला आनंददायी जगणं शिकवणारा. आपल्याला आपल्यावरच प्रेम करायला शिकवणारा. कारण एकदा का तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडलात, की जगणंही सुंदर होऊन जातं.

स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे आत्मकेंद्री, स्वार्थी प्रेम नव्हे, तर ते आहे आपल्यातली अमर्याद प्रेम करण्याची ताकद ओळखणं. एकदा का ही ताकद ओळखली, की आपण स्वतःवरच नव्हे, तर सगळ्यांवरच प्रेम करू लागतो. कारण आपल्याला जग होकारार्थी भासू लागतं. जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी घडू लागते. कामात आपण जादा ऍक्‍टिव्ह होतो. मग त्याच्याशी जे जे संबंधित असतात ते खूष. समोरचे खूष की आपण खूष. विन विन सिच्युएशन!

म्हणूनच म्हटलं, तुम्ही कधी स्वतःच्या प्रेमात पडला आहात? नसलं तर पडून बघा. हे प्रेम म्हणजे काय, तर आपण आपल्यावर खूष असणं. तुम्ही कधी तुम्हा स्वतःला गिफ्ट दिलं आहे? म्हणजे कपडे, बॅगा, इतर गरजेच्या वस्तू या आपण गरजेच्या वस्तू म्हणून घेत असतो किंवा आवडलं म्हणून घेत असतो. (पैसे आहेत ते कुठे संपवायचे, म्हणूनही अनेक जण घेत असतील) पण एखादी ठरवलेली गोष्ट केली, किंवा बराच काळ रेंगाळलेलं, रखडलेलं काम पुढाकार घेऊन पूर्ण केलं म्हणून खूष होऊन स्वतःला बक्षीस देऊ केलंय? देऊन बघा. इथं फक्त एखादी वस्तू स्वतःला प्रेझेंट करण्यापर्यंत, किंवा आवडती खायची वस्तू घेण्यापुरतंच हे मर्यादित नाही. तर मनाला आवडेल ती गोष्ट करायची. कोणाला जर संपूर्ण दिवस लोळत काढायचा असेल तर यथेच्छ काढावा (इथं स्वतःचं घर हवं किंवा घरातल्यांना ही गोष्ट पटवून द्यायला हवी. सॉरी!) पण उलटंही आहे बरं! एखादी गोष्ट नाही घडली मनासारखी तर खूप वेदना होतात. अशा वेळी लोकांच्या भिडेस्तव दुःख मनाशी दाबून टाकतो. नकोच करायला असं. मनाचं ऐकायचं, मनसोक्त रडून घ्यायचं. मन स्वच्छ होऊन जाईल. मोकळं मोकळं!

स्पार्क जिवंत असला की तुम्ही भरभरून जगू शकता. एकदा का तो स्पार्क धूसर झाला, की जगणं साचलेलं डबकं होऊन जातं. म्हणूनच हा स्पार्क कायम ठेवण्यासाठी अपेक्षाभंग, नैराश्‍य आणि एकटेपणा या बाबी आयुष्यातून काढून टाकायला हव्यात, असं सांगितलं आहे.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

16 Oct 2008 - 12:02 pm | सायली पानसे

hi
friend what u have written is an absolute truth.
there is nothing better than loving yourself.... moment u start loving yourself life changes for you.....
some one has said ...if u want others to respect you respect yourslef first ... with same logic... love your self and life will love you.... everyone around you will love you.
i have experienced it... at one point of time when i was gng thru the worst patch in my life some one taught me .... love and respect yourself and the world around you will change.... and it worked ..it gave me the confidence to face the world ... life is gr8 since then.
we must learn to live every moment fully... let it be sad or happy moment .... live that moment....cry if u want to or laugh ... and see..
life is better and happier...
so friends try to follow what he says....
start loving your self and you will see the difference.

all the best!!
sayli.

नुसताधिन्गाना's picture

16 Oct 2008 - 4:09 pm | नुसताधिन्गाना

मनापासुन धन्यवाद सायली, आता मला असे लेख लिहिण्यास हुरुप आला आहे. धन्यवाद.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Oct 2008 - 12:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

स्पार्क जिवंत असला की तुम्ही भरभरून जगू शकता. एकदा का तो स्पार्क धूसर झाला, की जगणं साचलेलं डबकं होऊन जातं. म्हणूनच हा स्पार्क कायम ठेवण्यासाठी अपेक्षाभंग, नैराश्‍य आणि एकटेपणा या बाबी आयुष्यातून काढून टाकायला हव्यात

सहमत झकास झकास
मी आता तसा कोतवाल नाही बरं?

नुसताधिन्गाना's picture

16 Oct 2008 - 4:12 pm | नुसताधिन्गाना

धन्यवाद घाशीराम कोतवाल.

ललिता's picture

16 Oct 2008 - 12:54 pm | ललिता

अगदी सहमत, नकारात्मक विचारांनी नैराश्य व एकटेपणा येतो.
हा मनाचा दुबळेपणा असतो... त्यावर मात करणं तसं सोपं नाही, पण प्रयत्न करायलाच हवे हे मान्य!

नुसताधिन्गाना's picture

16 Oct 2008 - 4:15 pm | नुसताधिन्गाना

मनापसुन धन्यवाद ललिता, तु माझ्या मताशी सहमत आहेस. हा तर माझा पहिलाच लेख आहे. मी असे लेख आता जरूर पाठवेन.

ऍडीजोशी's picture

16 Oct 2008 - 3:18 pm | ऍडीजोशी (not verified)

छान लेख.

तसाही मी फक्त स्वतःवरच प्रेम करतो :)