नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
8 Aug 2017 - 4:58 am

मूळ कविता - आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाचि धून (कवी - सोपानदेव चौधरी)

आली कुठूनशी कानी, चषकांची किन किन
नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन

स्कॉच व्हिस्की ती भरली, धुंद मद्य चषकांनी
थंड बियर फेसाळती, गजर चिअर्स उंचावुनी

वारुणीच्या चषकात आईसक्यूब्ज ओले चिंब
चखना असे साथीला, काजू चिकन आणि श्रिम्प

खंबा दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा
मद्य घेवुनी अंतरी, स्वागतास माझ्या उभा

चिंता संसाराची सरे, माझ्या साकियाँच्या साथीत
माझे मन झाले दंग, उमर खय्यामच्या रुबायांत

आली कुठूनशी कानी......

vidambanकविता

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

15 Aug 2017 - 3:32 pm | धर्मराजमुटके

मी वारुणीमार्गाचा उपासक नाही पण एक रचना म्हणून कविता आवडली.

पहिल्या कडव्यात यमक जुळविण्याचा प्रयत्न केला असता तर अजुन मजा आली असती असे वाटते.
अर्थात कवितेत काय लिहायचे याचा संपूर्ण अधिकार लिहिणार्‍याचा असतो हे मान्य !

उदा.

चषकांची किण किण आली कुठूनशी कानी,
नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुनी

चांदणे संदीप's picture

17 Aug 2017 - 3:30 pm | चांदणे संदीप

पहिल्या कडव्यात यमक जुळविण्याचा प्रयत्न केला असता तर अजुन मजा आली असती असे वाटते.

यमक तर तसेही जुळालेच आहे, फक्त एका लयीत म्हणायची/वाचायची गरज आहे! :)

Sandy

चामुंडराय's picture

20 Aug 2017 - 8:14 am | चामुंडराय

मूळ कवितेची आणि गाण्याची सुरवात देखील "आली कुठूनशी कानी" अशीच आहे त्यासाठी सुरवात तीच ठेवून पुढील भाग बदलला आहे.