लपून रहाण्याची जागा

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
15 Oct 2008 - 10:03 pm

आज प्रो.देसाई विशेष खूष दिसले.त्यांना जुन्या आठवणी आल्याने मला काहीतरी सांगावंसं वाटत होतं.मला म्हणाले,
" सामंत ईकडे बसा.मी तुम्हाला एक गमतीदार आठवण सांगतो."
मी म्हणालो,
"भाऊसाहेब,मीच आज तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो"

तरूण वयांत सैन्यात जाण्याचे खूप मनांत येत असतं.कदाचीत देशप्रेमाच्या आसक्ती पेक्षा युनीफॉर्मचा भप्केपणा, शिस्त आणि मान मिळतो त्याचच आकर्षण जास्त असावसं असं मला वाटतं.त्याचं असं झालं आमचा मोठा भाई,प्रभाकर त्यावेळी पंचवीस एक वर्षाचा होता. मिळालेल्या तांत्रीक शिक्षणांत खूप हूशार होता.रेडीओ आणि वायरलेस टेक्नॉलॉजी बद्दल खूप आवड होती.त्यावेळी दुसरं महायुद्ध जोरात होतं.ब्रिटीश लोकामुळे भारताला पण युद्धात सामील व्हावं लागलं.भाईपण जॉईन झाला एअरफोर्स ऑपरेटर म्हणून.त्याचं पोस्टींग झालं अबोटाबाद नावाच्या गावामधे.(त्यावेळी पाकिस्तान अस्तीतवात नव्हतं.)
कालच्या भूकंपात हे गांव पुर्ण भूईसपाट झालं.भाई जीवंत असता तर हे ऐकून त्याला शॉक बसला असता.असो.

पुढे काय झालं ,एव्ह्ड्या थंड प्रदेशात राहणं त्याला जमेना.युद्धामधे एमरजन्सी असल्याने त्याला रजा मिळेना.प्रकृती बरी नसल्याचं कारण दाखवून तो घरी परतला.आम्ही सर्व त्यावेळी वेंगुर्ल्याला राहत होतो.तिकडे तो आला.रजा संपली तरी तो राहीला. सैन्याची
चौकशी सुरू झाली.वेंगुर्ल्याला शेवटी पोलीस आले.गमंत म्हणजे आमचं वेंगुर्ल्याचं घर मोठं असल्याने आईने अर्धं घर तिच्या एका मानलेल्या भावाला रहायला दिले होतं. त्यांच्या बायकोला आम्ही "लिलूची आई"म्हणत असूं.ही बाई भोळी,प्रेमळ आणि सदाची घाबरलेली असायची,आणि पुढे,पुढे न करणारी होती.तिला एव्हडंच माहीत होतं की पोलीस आले की पकडतात आणि सरळ तुरंगात टाकातात.नेहमी बोलताना तिचा आवाज हलका असायचा.पण अशा घाबरलेल्या बेळी ती निराळा अपरिचीत घोघरा आवाज काढायची.त्या आवाजात ती भाईला म्हणाली,
"अरे, भाई तूं ताबडतोब संडासात लप.पोलीस संडासात येवूच शकत नाहीत."
हे ऐकून आम्ही सर्व खो,खो, हंसलो.हे बघून ती लहान मुलासारखी रडायला लागली.हे ऐकून पोलीस पण गहिवरले.ते म्हणाले
"बाई आम्ही फक्त चौकशी साठी आलो आहो.यांना तुरुंगात टाकणार नाही."

ह्या प्रसंगापासून पोलीस दिसला कि आम्हाला लिलूच्या आईची आठवण येते.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2008 - 11:58 am | प्रकाश घाटपांडे

आमच्या कं बळद व्हत त्येच्या त मी लपुन र्‍हायचो
प्रकाश घाटपांडे

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Oct 2008 - 12:17 pm | घाशीराम कोतवाल १.२

काय जागा आहे लपायची सामंत साहेब लगे रहो
पोलिस आता कोठुनही शोधुन काढ्तात हो
कुठे ही लपा ते शोधतात
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Oct 2008 - 9:30 pm | श्रीकृष्ण सामंत

प्रकाश घाटपांडे,घाशीराम कोतवाल,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com