फुकटेगिरी

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
11 Dec 2007 - 3:04 pm

नमस्कार लोकहो !!

आज एक नवीन विषयाला सुरूवात करीत आहोत. विषय सर्व मानवजातीच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे फुकटेगिरी.

प्रत्येकाला फुकट मिळालेली गोष्ट आवडत असते. भय्याकडे अ़ख्खी पाणीपुरी खाल्ल्यावर त्याच्याकडून वर एका फुकट पुरीची अपेक्षा असते.

गावाला स्वत:च्या बागेत आंब्यांची रास पडली असेल तरी च्या मायला त्या शेजार्‍याच्या झाडावर दगड भिरकवण्यासाठी आमचा हात अजूनही शिवशिवतो. हाच आम्ही जिवंत असल्याचा पुरावा.

आता आम्ही कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे आमची फुकटेगिरी इतरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणस्थांनी राग मानू नये कारण हे वास्तव आहे.

तर मंडळी, येथे कृपया आपल्या फुकटेगिरीचे किस्से लिहा. म्हणजे आपल्यासारखे इतरही या जगात आहेत, याचा आनंद सर्वांना मिळेल.

आपला,
(आनंदयात्री) धोंडोपंत

आमच्या फुकटेगिरीचा एक किस्सा सुरुवातीला -

आमच्या गावात बबनशेठ नावाचं एक बडं प्रस्थ आहे. मोठा चिरेबंदी वाडा, खूप मोठी भातशेती, आंबा आणि काजूची बागायत, मँगो कॅनिंग फॅक्टरी, घरासमोर ५/६ गाड्या, मालवाहतूक करण्यासाठी ट्रक, हायवे वर एक मॉटेल, जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा, पतपेढ्यांचे अध्यक्षपद, गावातल्या कुठल्याही कार्यक्रमाला सन्माननीय पाहुण्यांचे आमंत्रण वगैरे बर्‍याच गोष्टीं त्यांना वश आहेत.

त्यांच्या गोठ्यात पन्नासएक जनावरं. ती सगळी जनावरं म्हणजे गाई, बैल, म्हशी आणि त्यांच्या राखणीसाठी चार पाच गुराखी पोरं, तीन चार धनगरी कुत्रे असा सगळा लवाजमा सकाळी त्यांच्या वाड्याबाहेर पडतो. दिवसभर गुरं रानात चरून दुपारी साडेतीनच्या सुमारास ही वरात आमच्या घरावरून जाते.

गावाबाहेर एक डॅम आहे तीथे गुरांना पाणी पाजून मग संध्याकाळी साडेपाचला पुन्हा गोठ्यात जातात. मग दूध काढणं, उकाड्याचे दूध पोहोचवणे वगैरे कामे सुरू होतात.

तर सांगायची गोष्ट अशी, दुपारी जेव्हा ही गुरे आमच्या घरासमोरून जात तेव्हा बाळ्या नावाच्या गुराख्याला आम्ही बोलावून त्याच्याशी गप्पा मारीत असू. तो बाळ्या पण इरसाल होता लेकाचा. गुरं समोरून निघाली की आमच्या भावंडांपैकी कुणीतरी

"काय बाळासाहेब, कसं काय चाललाय?"

बाळ्या खूष. "या बसा इथे जरा"

"नको वो. शेटनी पायला तर *******"

"अरे, शेट गेला त्याच्या आयच्या *** . तू बैस इथे."

असे म्हणून बाळ्याशी गप्पा सुरू होत. बाळ्या हा "हेड गुराखी" होता. आता बाळ्याच बसला म्हटल्यावर इतर पोरंही तिथेच रेंगाळायची. सहाजिकच गुरंही तिथेच.

मग आमच्यापैकी कुणीतरी त्यातल्या एखाद्या म्हशीला हाकारत आमच्या वाडीत घेऊन जायचं. आमच्या गुरांसाठी भिजवलेल्या चंदीचं एखादं घमेल त्या म्हशीपुढे टाकायचं आणि आमच्या बुध्या गड्याला तिचे दूध काढायला लावायचं.

म्हशीचे दूध काढण्याआधी तिला 'उतरवायला' लागते. ती एकदम दूध देत नाही. त्या गोष्टीला साधारण पाच सात मिनिटे लागतात. पण बुध्या त्यात प्रवीण होता. तो पाण्याचा एक हबका सडावर मारायचा आणि दोन्ही हातांनी तिला उतरवायचा. त्यामुळे दोन तीन मिनिटात दूध यायला सुरूवात व्हायची.

आणि मग काय विचारता राव, दुधाची गंगा वहायची हो गंगा ! बबनशेठच्या म्हशी म्हणजे आमच्या कोकणातल्या गावठी म्हशी नव्हेत राव. त्या म्हशी म्हणजे 'मुर्रा" जातीच्या . हरयाणावरून आणलेल्या. एक म्हैस सात ते आठ लिटर दूध द्यायची. स्टेनलेसस्टीलच्या दोन मध्यम आकाराच्या बादल्या दुधाने भरायच्या म्हाराजां !

दूध काढून झाल्यावर तिला हाकारत पुन्हा रस्त्यावर आणायची आणि बाळासाहेबाला नमस्कार करून पाठवायचा. मग मज्जाच मजा.

बबनशेठ मात्र रोज विचार करीत असेल. च्यायला, रोज एक म्हैस दूध देत नाही हा काय प्रकार आहे?

बरोबर आहे हो. दुपारी साडेतीनला दूध काढल्यावर जगातली कुठली म्हैस पुन्हा संध्याकाळी साडेपाचला दूध देईल?

आपला,
(फुकट्या) धोंडोपंत

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

11 Dec 2007 - 3:55 pm | प्रमोद देव

धोंडोपंत! धमाल किस्सा आहे तुमचा.
ह्या म्हशीवरून मला पुलंच्या 'म्हैस'कथेची आठवण झाली.
"चांगली काठेवाडी म्हस होती. धा धा शेर दूध देत होती" हे संवादही ऐकायला यायला लागलेत आता.

विसोबा खेचर's picture

11 Dec 2007 - 5:03 pm | विसोबा खेचर

धोंड्या शिंच्या, फुकटेगिरीचा किस्सा बाकी झकासच लिहिला आहेस हो!

(देवगडी) तात्या.

बेसनलाडू's picture

11 Dec 2007 - 10:00 pm | बेसनलाडू

पण सांभाळ रे बाबा, म्हैशीचं दूध फुकटात पदरात पाडून घेतोस ते ठीक आहे पण उद्या शेजारल्या वाड्यात एखादी सूनबाई बाळंत झाली म्हणजे श्टीलचा डबा घेऊन खरवसाकरता चिक मागायला नाही गेलास म्हणजे मिळवली! :)
सोवळेपणाचे किंवा सभ्यपणाचे स्तोम माजवत नसलो किंवा अवाजवी समर्थन करत नसलो (आणि विद्रोही साहित्याचा यथायोग्य सन्मान करत असलो, आस्वाद घेत असलो), तरीसुद्धा वरील प्रतिसाद मला असभ्यतेचा किंवा निर्लज्जपणाचा अतिरेक वाटला (मागे कोणाच्यातरी रात्री चांगल्या जाण्याबद्दलचे जाहीर चर्विचरण झाले होते तसेच). बाकी तुमचे चालू द्यात. पंचायत समिती नेमल्याचे , तिने प्रतिसादांची कापाकापी करण्यासंबंधीचे अधिकार असल्याचे ठराविक उत्तर यायची किंवा खुद्द समितीच्या खुलाशाचीही/कारवाईचीही अपेक्षा नाही.
(निरपेक्ष)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

12 Dec 2007 - 1:08 am | विसोबा खेचर

सोवळेपणाचे किंवा सभ्यपणाचे स्तोम माजवत नसलो किंवा अवाजवी समर्थन करत नसलो (आणि विद्रोही साहित्याचा यथायोग्य सन्मान करत असलो, आस्वाद घेत असलो), तरीसुद्धा वरील प्रतिसाद मला असभ्यतेचा किंवा निर्लज्जपणाचा अतिरेक वाटला

धन्यवाद! असभ्य आणि निर्ल्लज्ज माणसाकडून दुसरी काय अपेक्षा करणार?!

असो...

आपला,
(असभ्य आणि निर्ल्लज्जपणाचा कळस असलेला!) तात्या.

बेसनलाडू's picture

12 Dec 2007 - 2:52 am | बेसनलाडू

धन्यवाद! असभ्य आणि निर्ल्लज्ज माणसाकडून दुसरी काय अपेक्षा करणार?!
--- बरोबरच आहे. सर्वज्ञात आहे. म्हणूनच (निरपेक्ष) अशी स्वाक्षरी केली :)
(निरपेक्ष)बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे's picture

11 Dec 2007 - 10:25 pm | प्रकाश घाटपांडे

<<< पण सांभाळ रे बाबा, म्हैशीचं दूध फुकटात पदरात पाडून घेतोस ते ठीक आहे पण उद्या शेजारल्या वाड्यात एखादी सूनबाई बाळंत झाली म्हणजे श्टीलचा डबा घेऊन खरवसाकरता चिक मागायला नाही गेलास म्हणजे मिळवली! :)

कसें? :)
>>>

बांगरवाडीतील समदी पोर आमच्या शाळेत यायची. त्याच्यातला अंकुशाने बांगरवाडीतल्या इतर पोरांना इचारल, कारे काल कुनी क्कुनी च्या घेतला त्या सुमनबाईकडे. समद्यांनी घेतला व्हता. एकट्या अंकुशाने घेतला नव्हता. त्यानं इचारला कसा लागला चा. सगळी प्वॉर म्हनली की चांगला व्हता कि. पन तू का नाई पिला साल्या. मंग अंकुशा म्हनाल कि येड्यांनु मी आत गेल्तो तव्हा पघितल कि बाई च्यात कंच दुध घालत व्हती. आर बाईच्या दुधाचा चा प्याले रे खी खी खीऽ ऽऽ मंग बाकीचे समदे कांढावल्या वानी झाले.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

12 Dec 2007 - 1:55 am | विसोबा खेचर

सदर किस्सा हा कोणाचा आहे? म्हणजे कुणी लिहिला आहे? कुठल्या पुस्तकातील वगैरे आहे किंवा कसे? की तुमच्याच लेखणीतून उतरला आहे?

नाही, जो कुणी याचा लेखक असेल त्याने 'निर्ल्लज्जपणाचा नी असभ्यपणाचा अतिरेक केला आहे', असा निरोप सदर लेखकास पोहोचवावा ही विनंती..! :)

आपला,
(सभ्यतेचा आणि सुसंस्कृतपणाचा नमोगतीय पित्त्या!) तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Dec 2007 - 4:27 pm | प्रकाश घाटपांडे

<<सदर किस्सा हा कोणाचा आहे? म्हणजे कुणी लिहिला आहे? कुठल्या पुस्तकातील वगैरे आहे किंवा कसे? की तुमच्याच लेखणीतून उतरला आहे?>>

सदर किस्सा हा आमच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर या मु.पो. बेल्हे ता. जुन्नर जि. पुणे येथील आमच्या शाळेत स्वकर्णांने ऐकलेला किस्सा असून तो खरा आहे. सदर किस्सा हे माझे प्रामाणीक शब्दांकन आहे. सदर किश्श्या कडे जरा वेगळ्या नजरेने पाहिलेत तर काय वास्तव आहे हे लक्षात येईल.
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2007 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत,
आपला फुकटेगिरीचा किस्सा आणि आपण टाकलेला विषय सहीच आहे. अहो, कदाचित आमचा गैरसमज असेल पण, हा संशोधनाचा विषय ठरेल. बहुतेक श्रीमंत असलेले काही मित्र. जे जरा श्रीमंत आहेत, असे वाटते. ते फार चिंगुस आणि फुकटे असतात, असे वाटते. गाडी असुन लिफ्ट मागणे,गाडी मागणे. खिशात पैसे असुनही काढण्याचे नाटक करणे,देतो-देतो म्हणतात पण, पैसे निघत नाहीत. आज तुला माझ्याकडुन पार्टी असे म्हणुन बार मधे गेल्यावर थोडी जास्त झाल्याची अभिनय करणे, कितीतरी प्रसंग सांगता येतील !!! कधी कधी वाटते च्यायला इतक्या पैशाचे काय करतील हे लोक. अडचणीची वेळ आहे, भुका जबरा लागलेल्या आहेत, आता काहीतरी हॉटेलात (सामान्य हॉटेल हो )खाल्ले पाहिजे अशा प्रसंगात पैसे असुनही खर्च होतील म्हणुन भुकेने काकूळतील पण, घरी जाऊन जेवतील....! किंवा तसेच झोपतील. आणि कारण सांगतील अरे, 'ती' ना, माझ्याशिवाय जेवत नाही. कितीतरी प्रसंग सांगता येतील !!!
......... आहेत का आपणास काही असेही मित्र... :)

आपला..................!
मनाचा श्रीमंत आणि सढळ हाताने खर्च करणारा.
(स्वत:च म्हणतो असे कोण कोणाचं कौतुक करतं )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

12 Dec 2007 - 3:47 am | मुक्तसुनीत

(अजून थोडा चावटपणा असे म्हणतात तसे अजून थोडा फुकटेपणा ..:-) )

एकदा एक "कोब्रा" , त्याच्याच दुसर्‍या एका "कोब्रा" मित्राकडे सायंकाळी जातो. चहापान होऊन काही तास उलटल्यावरही पाव्हणा हलण्याची काही चिन्हे नाहीत.. यजमान कोब्रा बसल्याबसल्या चुळबूळ करायला लागला. .. हा आता जातो का मग जातो... पाव्हणा आपला बसल्या खुर्चीत घट्ट.. आणि मग वीज कडकडून अचानक पावसाला सुरुवात होते. झाSSSSSSलं ; आता कशाला हलतोय् पाव्हणा ! शेवटी यजमानाचा नाइलाज होतो.
तो पाव्हण्याला म्हणतो : "हेहेहे , नाही , आता म्हणजे , ....जेवूनच जा".

पाव्हणा विचारात पडतो : "असे म्हणता ? बाSSSSर. वैनीना म्हणावे आमटीभाताशिवाय काही नको.. नाही तेव्हढी कोशींबीर असली म्हणजे झाले".

यजमान कोब्रा : "पहातो हो ! थांबा इथेच दिवाणखान्यात... मी "हिला" सांगतो सैपाक वाढव म्हणून ... कसे !" एव्हढे म्हणून यजमान आत.

बायकोला : "आता काय करणार ! नाही आहे टळत त्याला काय करता ! घाला आता आमटीत पाणी नि काय्."
बायको नाके मुरडत लागते चुलीकडे. पुन्हा आपले खोटे हसू पांघरत यजमान बाहेर येतो तो काय ! पाव्हण्याचा पत्ता नाही !

यजमानाची विकेट डाउन ! "चायला , म्हणजे आधी यांच्याकरता जास्त सैपाक करायचा ..आणि हे काय ? पळून कसला जातो लेकाचा !" अशा शिव्या देत यजमान तिकडे काही मिन्टे उभा राहतो... आणि काही मिन्टातच .....

पावसाच्या पाण्याने सचैल भिजलेला पाव्हणा धापा टाकत परत हजर !

यजमान : "का हो ? काय झालं काय एकदम !?" पाव्हणा म्हणतो : "नाही, मी म्हण्टलं इथे जेवायचाय् , तर घरचा सैपाक नको फुकट नको जायला ....म्हणून आमच्या सौ.ना सांगून आलो , तेव्हढा रात्रीचा वरणभात कमी टाक म्हणून !"

मित्रानो : ज्या माणसाने हा किस्सा सांगितला तो पण कोब्रा होता आणि मी सुद्धा याच "स्पेसीज्"मधला आहे. हा विनोद आहे. सर्वानी हलकेच घ्या... ! :-)

पुष्कर's picture

12 Dec 2007 - 10:23 am | पुष्कर

दुसर्‍यांचे असले किस्से चिक्कार सांगता येतील. उदाहरणार्थ- घरी आलेल्या मित्राला 'थांब बस जरा, मी चहा घेऊन येतो' असं म्हणून आत जाणारा, आणि (मित्र चहा येण्याची वाट बघत बसतो) थोड्या वेळाने बाहेर येऊन 'चल, घेतला चहा, आता निघायचं का?' असं विचारणारा कोब्रा. किंवा 'ले' एवढा एकच शिक्का करणारे लेले,त्यांचा ले मागायला आलेले गोखले,नुसती एक उभी दांडी (।) एवढाच शिक्का करून घेणारे नेने (तो शिक्का उभा-आडवा-तिरका असा दोनदा मारला की झाला नेने) असे किस्से प्रसिद्ध आहे.
पण मला वाटते प्रस्तुत विषय हा स्वतःच्या फुकटेगिरीवर असल्यामुळे तसे काही लिहिल्यास वाचताना मजा येईल.

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 4:41 pm | गारंबीचा बापू

वा पंत,

तुम्हीही फुकटेगिरीत सराईत आहात हे समजल्यावर आनंद वाटला.

आमचा अण्णा खोतही तसलाच.

पण तो दूध वगैरे शुल्लक गोष्टीत फुकटेगिरी करत नाही. तो लोकांच्या जमिनी आणि बायका हडप करतो.

बापू

झकासराव's picture

14 Dec 2007 - 4:12 pm | झकासराव

मस्त किस्सा. :)
आता मी काय मुद्दामहुन केली नाही फुकटेगिरि पण एकदा झालीच.
आम्ही त्याव्ळे रेशन कार्डावर मिळणारं बरच काही विकत घेत होतो.
तर एकदा ऱोकेल आणायला गेलो. त्या दुकानदाराचा हिशेब चुकला होता आणि त्याने ५० रु दिल्यावर त्यातील परत ९० दिले होते. :)
हे माझ्या लक्षात आल पण मुद्दामच तिथुन सटकलो रॉकेल घेवुन. :)

जुना अभिजित's picture

14 Dec 2007 - 4:26 pm | जुना अभिजित

कालेजात असताना एका हाटेलात आम्ही जेवायला गेलो होतो. एकदा चुकुन हिशेबात १०० चा घोळ झाला आणि दुकानदाराने आम्हाला जास्त १०० रुपये दिले. आम्ही बाहेर पडता पडता आमच्या लक्षात आलं. सर्व मित्रांनी एकमुखी परत फिरून दु.दाराला जास्तीचे पैसे परत दिले. अर्थातच त्याला आनंद झाला.

परत एकदा त्यात हाटेलात आमच्याकडून ५०-६० रुपये जास्त गेले. तेव्हाही दुकानदाराने त्याच्या मुलाला आमच्या मागे पाठवून ते पैसे परत दिले. आम्ही त्या ठिकाणी जाणारे एकटेच नव्हतो आणि काही ओळख वगैरे पण नव्हती. पण दुकानदाराच्या वागण्यातील सहजभाव होता. तसाच आमच्या मित्रांच्याही. मी एकटा असतो तर कदाचित सटकलोही असतो ;-)

हा एक किस्सा फुकटेगिरी बद्दलचा. खुप उशिरा लक्षात आलं आणि परत देण्यासारखं नसलं तर खिशात पडलं पवित्र झालं असं म्हणायचं. ;-) आलेली लक्ष्मी परत पाठवू नये. पण जर लगेच लक्षात आलं तर कुणाचे श्रमाचे पैसे बुडवू नयेत अशी शिकवण मला माझ्या मित्रांकडून आणि दुकानदाराकडून मिळाली.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

शलाका पेंडसे's picture

14 Dec 2007 - 5:55 pm | शलाका पेंडसे

हा हा, सर्वांचे किस्से छान आहेत.

मी-सौरभ's picture

23 Feb 2012 - 7:15 pm | मी-सौरभ

हे असले उद्योग करण मंजे जरा अतीच नाही का???

वपाडाव's picture

23 Feb 2012 - 7:30 pm | वपाडाव

फुकट्या, तु हा 'ज ह ब ह री' धागा वर कामुन काढला रे...
आता धागा वर आलाच आहे तर सुरु करा रे मंडळी...

बंडा मामा's picture

24 Feb 2012 - 10:06 am | बंडा मामा

फुकट्या, तु हा 'ज ह ब ह री' धागा वर कामुन काढला रे...

चौकटराजा's picture

23 Feb 2012 - 7:39 pm | चौकटराजा

कोब्रा चिकट असतोच असतो त्यामुळे त्यावर " मायंदाळ" किस्से आहेत. आता ते कोब्रा देखील खिलाडू पणे घेतात. त्या किश्याचा उपयोग शिकवणी सारखा करून देब्रा,कब्रा, वगैरे शिकवणीचे पैसे न देताच चिकट होउ लागले आहेत. चिकट व फुकटा यातला फरक हा असा आहे.

मी-सौरभ's picture

24 Feb 2012 - 10:37 am | मी-सौरभ

कोब्रा हे कोब्रा असतात ;)

मराठी कथालेखक's picture

14 Apr 2016 - 5:31 pm | मराठी कथालेखक

कथा छान आहे, जुने वाद-प्रतिसाद वाचून करमणूक झाली.

तुम्हा लोकांना लेवा माहीती आहेत का कोब्रा पेक्षा डेंजर चिकटू

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2016 - 12:54 pm | मराठी कथालेखक

माझा अनुभव आहे की कोब्रा हिशेबी असतात, फुकटे नाही.
पुर्वी एक कोब्रा सहकारी होता, खूप रसिक.
आम्ही एकदा दुपारच्या जेवणाला रेस्टारंट मध्ये गेलो मी ६३ रु बिल भरले, दुसरे दिवशी त्याने मला ३१.५० दिले.
नेहमीच असा काटेकोर हिशेब होई. पण एकदा तो मला म्हणाला "आज मी बिल भरणार", मी कारण विचारल्यावर म्हणाला "आपण नेहमी तुझ्या बाईकने येतो, तुझे पेट्रोल खर्च होते म्हणून"
मला वाटते असे हिशेबी असणे तसे वाईट नाही.

जव्हेरगंज's picture

14 Apr 2016 - 9:45 pm | जव्हेरगंज

कोब्रा (;_;

(*_*)

(✽ ゚д゚ ✽)

(;_;)