चायना आणि चुंबी १

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
2 Jul 2017 - 5:05 pm

ठिंबक टू !

शेजार्‍यांशी सोहार्दाचे आदर्शाचे गोडवे अधिक पण दोन शेजारी एकमेकांशी शांततेत जगतील हे वास्तवात कमी दिसत असलं तरी, किमान ब्रिटीश पूर्व काळात हिमालयाची भिंत त्यामागची काही हजार वर्षे शांततेत जावीत एवढी उंच नक्कीच होती. जगाच्या सर्व जागा काबीज करण्यासाठी ब्रिटीश गलबत आणि खलबत यशस्वी होताना भारताच्या सीमा कुठे पर्यंत असाव्यात याचे निर्णयही ब्रिटीशांनीच घेतले. भारताच्या फाळणीची अप्रत्यक्ष जबादारी जशी त्यांच्या गळ्यात जाते, भारत एकसंघ असतानाच्या सीमांच्या अधिकतम विस्ताराच श्रेयही त्यांनाच जात. इराण, अफगाणीस्तान, तीबेट, चीन यांच्या सोबतच्या सीमा अधिकतम ठेवण्याची दक्षता ब्रीटीशांनी घेतली. ज्या सीमांना आणि शेजारी देशांना भारतीय राजांनी नीट पाहीलही नव्हते त्यांच्यावर वर्चस्व मिळवण्याचे काम ब्रिटिशांनी चोख बजावले. भारतीय उत्तरी सीमांचे प्रदेश काही फार उत्पन्नाचे नव्हते तरीही ब्रितीशांनी त्यावर लक्ष केंदित का केले ? याचे कारण होते दि ग्रेट गेम !!

या ग्रेट गेमची माहिती ग्रेट रोचक आहे, भारतीय शालेय इतिहासात सहसा न शिकवली गेलेली. कदाचित ऐतिहासिक रित्या आम्ही कमी सहज जाता आलेल्या पूर्व दिशेला प्रभाव पाडण्यास लक्ष दिले पश्च्चिमेला मागे काय जळते आहे याची आमच्या राजे आणि धार्मिक मंडळींना चिंता नव्हती. आपल्या पेक्षा चिनी लोक बरे की त्यांना त्यांच्या देशाच्या सर्व सिमा माहीत होत्या आणि त्या सर्व सीमांच्या पलिकडे काय जळते त्याची कल्पना होती. त्यांच्या सगळ्यात वाईट काळात सुद्धा ब्रिटींषांनी लादलेल्या सिमांबद्दलच्या करारांवर त्यांनी सह्या केल्या नाहीत. युद्धाच्या विवीध प्रकारात अगदी अफूही विकली तरी ब्रिटीशांना त्यांच्या कडून त्यामानाने मोठे प्रदेश हस्तगत करता आले नाहीत. देश प्रेम या शब्दाचा अर्थ चिनी इराणी अफगाणी लोकांना ज्या पद्धतीने कळतो तो तसा भारतीयांना का कळला नाही ते माहित नाही, भारतातील राजेरजवाड्यांना आपापसात झुंजवत परकीय येत राहीले सत्ता गाजवत राहीले. चिनी लोकांच्या एकुण चिवटपणापुढे ब्रिटीश आणि जपानी यश क्षूल्लक होत तरी सुद्धा स्वदेशाच्या एकजुटी साठी वनचायना म्हणत लहान सहान गोष्ट बिनसली तरी चिनी लोक अख्ख जग डोक्यावर घेतात. त्यांच राष्ट्रप्रेम पाहिल की १९४७ मध्ये पाकीस्तान न देता सरळ सिव्हील वॉर होऊन एक सोक्षमोक्ष लावून घेतला असता तर आजचा घोळ राहीला नसता पण आम्ही भारर्तीय तसे करु शकत नाही कारण पुरोगामी ठरतो, आमची 'पुरोगामी जनता' ठिंबक टू म्हणजे ट्रॅक टू च्या नावाखाली दुसर्‍या देशांचे राष्ट्रप्रेम किती योग्य आणि भारतीयांनी दाखवलेले राष्ट्रप्रेम कसे चुकीचे हे ठसवण्यात गढलेली असते ठिबक ठिबक ठिबकत असते. असो.

नेमेची मधूनच येतो पावसाळा आणि उगवते भू-छत्री तशी चीन भारत सिमेवर धूस-फूस चालू असल्याची बातमी आली आपल्या सरकारला काय म्हणायचे आहे याचा बातम्यांमध्ये उल्लेख गायब पण चिन सरकार भारताला कसे चुकीचे म्हणते त्या बद्दल भरभरुन बातम्या भारतीय वृत्तपत्रात. यात अगदी भारताच्या माजी परराष्ट्र सचिव आहेत. तसे अंबानींनी देऊ केलेल्या खूर्तीत बसीन कम्यूनीस्टते भाजपात तळ्यात मळ्यात करणारे कुणी सुधींद्र कुलकर्णी आहेत. या सुधींद्र कुलकर्णींनी तर चक्क चीन मध्ये बसून चीनच्या बाजूने लेख लिहून छापून तर आणलाच त्या लेखा खाली लगोलग आलेल्या चिनी लोकांचे प्रतिसाद मोठे रोचक आहेत. चिनी लोकांची बाजू न घेणारे भारतीय कसे युरोमेरीकनांचे एजंट म्हणून ट्रेटर्स आहेत ते आवर्जून सांगतात. म्हणजे पुर्वी आमची वृत्तमाध्यमे फक्त युरोमेरीकनांची धार्जीणी आहे हे माहित होते आता हल्ली ती पाकीस्तानच आणि चीन धार्जीणी सुद्धा असतात. हे धार्जीणेपण इतपत आहे की सध्याचा तणाव ज्या Doklam वरुन आहे त्याचा उहापोह सुद्धा त्यांना त्यांच्या लेखात करावयास नको असतो.

ठिंबक टू मंडळींना त्या त्या देशातील मंडळींकडून प्रो इंडीया लेखन करुन घेतल्याचे अथवा पाहील्याचे अद्याप ऐकिवात नाही. चिनचे कोकलणे आम्हाला ऐकवले जाते तसे आमच्या संरक्षण मंत्र्यांकडून आणि परराष्ट्र मंत्र्यांकडून खंबीर वक्तव्ये वाचण्यास येत नाहीत हे पाहून आपल्याच सरकारचे कुठे चुकते आहे का असा संभ्रम पसरण्यास वेळ लागत नाही. सर्वसामान्य लोकांना पाकीस्तानबाबतच्या समस्या काय ते माहित असते पण चिन बाबत नेमक्या समस्या काय ते माहित नसते.

क्रमशः

प्रतिशब्दबातमी

प्रतिक्रिया

कुणी सुधींद्र कुलकर्णी आहेत.
डोक्याला शॉट लावुन घ्यायचे असेल तर कुलकर्णी बुवांचे किर्तन अवश्य ऐकावे ! :p

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa

वरुण मोहिते's picture

2 Jul 2017 - 6:13 pm | वरुण मोहिते

होते एके काळी हे सुधींद्र कुलकर्णी