सहप्रवासी २

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
28 Jun 2017 - 5:52 pm

सहप्रवासी भाग 1

असाच एक रविवार.
दुपारचे २
सी.एस.टी ठाणे लोकल.
सरळ बाजुची खिड़की पकडुन बॅक लॉग भरण्यासाठी उलटी मोजणी.
जास्त म्हणजे ६० पर्यंत सुक्ष्मात विलिन होण्याची खात्री.
डुलकी लागतच होती आणि दरवाजावर कल्ला झाला.
३ कॉलेज कन्या डब्यात शिरल्या. अगदी गाडी सुटता सुटता.
डब्यात इन मीन २ प्रवासी.
समोरच्या बाकावर खिदळत समुह स्थानापन्न.
...
"ए तु जुली बघितलायस का ग"? कन्या १
माझ्या अंगावर शहारा आला.
डोळे अर्धवट उघडुन प्रश्नकर्ती कडे ओझर टाकला.
"हॉ" कन्या २
"व्हॉट्स द बिग डील? काय बावळट्पणा. करायच्च ते करायच वरुन आय लव यू म्हणुन पिळायच. काळजी घ्यायचीअक्कल नाही. आणि शाम रुसवा म्हणायचे. आख्ख गाणे म्हणजे छळ आहे नुसता" कन्या १
डिट्टो हीअर. (मी मनातल्या मनात)
"अग जरा हळू बोल. डब्यात इतर लोक पण आहेत की" कन्या २
" झोपलेत नाही तर त्यांना सुद्धा विचारेन बर का? त्यांच्याच जमान्यातले आहे. अँड आय अ‍ॅम शुअर ही विल अ‍ॅग्री " कन्या १
"गप ग" कन्या २
" आणि ते माझे मत मी ग्रुप वर टाकले तर काय जबरदस्त ट्रोलींग झाले माझे. वाईट वाटले मला. मला माहीत आहे माझी मते थोडी जगावेगळी असतात. पण खणखणीत असतात. त्या मुळे सर्व माझ्याकडे वाद घालतात. पण मी माझे मत आग्रहाने मांडणार. कितीही भांडलात तरी. जळा माझ्यावर" कन्या १
(कुठे बर असेच काहीतरी वाचले होते? बहुतेक कुठल्या तरी संस्थळावर. जाउ दे.)
"झाली तुझी सुरवात. कायम आरती काढुन घेतल्याशिवाय तुला झोप लागत नाही का"? कन्या ३
" म्हणजे विचार परिवर्तन करण्यात माझे इनपुट देते त्यात आरती कसली"?कन्या १
"तु कुठल्या तरी ग्रुप वर तुझी मते मांडल्या मुळे विचार परिवर्तन होण्याची सुरवात होइल असे तुला वाटणे म्हणजे एक आरती च ना? काय बदलले आहे आणि काय वदलणार आहे? आज ही ज्युली आहे उद्याही असणार आहे. ३० वर्षात काही ही जास्त फरक पडलेला नाही. अगदी निग्लीजिबल. अँड बिकॉज वी आर स्टुपीड्स टू से येस इन द सिस्युएशन."कन्या ३
"तुझ्या कडे डेटा आहे का"? कन्या १
" हो पण मी तुला तो शेअर करणार नाही. एवढीच हौस असेल तर के.ई.एम. मधे चौकशी कर" कन्या ३
" ही पळवाट झाली. मते मांडायची पण सब्स्टांशिएट न करता पळायचे" कन्या १
" ठिक आहे बाई. तु बरोबर मी चूक. तु माझ्या पेक्षा मोठे झुरळ. आणि मोठ्या मिश्यांचे. तु तुझी जग बदलणारी मुद्देसुद मते मांडत रहा. ट्रोलींग वरुन स्वतः ची आरती काढत बस. विषय संपला" कन्या १.
मी डोळे उघडले आणि नुकत्याच काढलेल्या मिश्यांवरुन हात फिरवत स्टेशन ची वाट पहात राहीलो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Jun 2017 - 9:33 pm | मुक्त विहारि

"आज ही ज्युली आहे उद्याही असणार आहे. ३० वर्षात काही ही जास्त फरक पडलेला नाही. अगदी निग्लीजिबल. " (अशा ३ ज्युली माहीत आहेत.)

आणि

"एवढीच हौस असेल तर के.ई.एम. मधे चौकशी कर."

हे पण ऐकिवात आहे.

मुक्त विहारि's picture

28 Jun 2017 - 9:35 pm | मुक्त विहारि

http://www.misalpav.com/node/24894

@ संपादक मंडळ.... आधीच्या भागाची लिंक लेखातच दिल्यास उत्तम, असे वाटते.

आदूबाळ's picture

29 Jun 2017 - 9:37 am | आदूबाळ

मस्त आहे!

ही 'केईएममध्ये चौकशी'ची भानगड काय आहे?

मुक्त विहारि's picture

29 Jun 2017 - 7:12 pm | मुक्त विहारि

गणपतीला नजरानजर
नवरातीला नाचगाणे
दिवाळीला सणवार
आणि
नविन वर्षाला कोरी पाटी. (परत नवा भिडू नवे राज)

(अज्जूनही समजले नसल्यास. व्यनि करावा.)