हिच जगाची रीत असावी
चंदनापेक्षाही झिजावे
माझे-माझे म्हणावे
अन त्या पिल्लांनी
त्याच्या मोबदल्यात काय दयावे
अनवाणी पायाने चालावे
उन्हात तापावे
पावसात भिजावे
अन पिल्लांना त्याची झळ ना लागू दयावी
पिल्लांना पंख फुटले की घरटे सोडून जावे
पाखरे बनून आपले काम सूरू करावे
परत फिरून घरट्याकडे न बघावे
त्या मात्या-पित्यांना कधी न विचारावे
हिच जगाची रीत
पुन्हा-पुन्हा तशीच रहावी
मग त्या पिल्लांच्या बनलेल्या पाखरांनी आपल्या पिल्लांच्या तशा
वागण्याने का रडावे?........
खर पिल्लुं ते जे असं न करतं
मात्या-पित्यांनी कष्ट करावे
पिल्लांना त्याची जाण असावी
हिच जगाची रीत असावी
पुन्हा-पुन्हा तशीच रहावी ...................
प्रतिक्रिया
14 Oct 2008 - 11:11 am | विजुभाऊ
अपेक्षा ठेउ नका. पिल्ले ही तुमच्या सारखीच असतील हा अट्टाहास नसावा.
पिल्ले वेगळ्या वातावरणात वाढली/ तुम्ही वेगळ्या वातावरणात वाढला आहात.
15 Oct 2008 - 9:57 pm | मंदार
पिल्ले ही तुमच्या सारखीच असतील हा अट्टाहास नसावा.पण त्या पिल्लानी जरा तरी विचार करायला हवा कि नको? पिल्ले वेगळ्या वातावरणात वाढली तरी त्याना तिथ-पर्यत कोणी आणले त्याचा विचार करावा.