मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ३

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
26 Jun 2017 - 8:38 pm

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ३

भाग १ ------ http://www.misalpav.com/node/40043
भाग २ ------ http://www.misalpav.com/node/40076

" काय ? या लोकगीताचे मुळ उगमस्थान हा रानी शरावतीका महल ? ते कसं काय ? " तिघींनीही चकीत होउन विचारले .

"वह इक लंबी कहानी है मॅडमजी . वह सुनानेमें थोडा टाईम लगेगा . " गाईड शांतपणे म्हणाला . कहानी म्हणल्यावर तिघींचीही उत्सुकता अजुनच वाढली .

"हां तो सुनाईये ना . हमे कहां ट्रेन पकडनी है ." नेहा उत्साहाच्या भरात बोलुन गेली . तिचे हे बोलणे ऐकुन इतर दोघींनी तिच्याकडे जरा डोळे वटारुनच पाहिले . तेव्हा कुठे नेहाला आपल्या बोलण्यातील चुक लक्षात आली . तिने जीभ चावली आणी चुकीची दुरुस्ती केली .
"मतलब , हमें ट्रेन तो पकडनी है . लेकीन ट्रेन आज लेट है . अभी उसे आनेमें टाईम है . तो हमारे पासभी टाईम है . हमे वह कहानी सुननी है ."

बाकीच्या दोघींनीही मान हलवुन होकार दिला . अखेर त्यांच्या विनंतीला मान देउन , एक दोन मिनीटे विचार करुन तो गाईड ती विलक्षण लोककथा सांगु लागला .

"अनेक शतकांपुर्वी , मुघलांच्याही आक्रमणापुर्वी हे मयुरखेडा गाव राजस्थानातील एका राजाच्या अखत्यारीत होते . तेव्हा तर या गावाचे नाव नुसतेच खेडा होते . या गावामधे एक खुप प्रसिद्ध गायक राहात असे . शरावती हि त्या गायकाची मुलगी . घरातच गाणे असल्यामुळे शरावतीला गायनकला चांगलीच अवगत होती . पण त्याच बरोबर ती नॄत्यकलेमधेही चांगलीच पारंगत होती . गावातील काही विख्यात गुरुंकडुन तिने नॄत्यकलेचे शिक्षण घेतले होते . नॄत्यकला हा तिचा जीव की प्राण होता .

गावामधे दरवर्षी यात्रा भरत असे . या यात्रेला स्वता राजा न चुकता हजर राहात असे . या यात्रेमधे राजस्थान व इतर अनेक मुलुखांमधील नावाजलेले गायक , नर्तक असे कलाकार राजा व जनतेसमोर आपली कला सादर करत असत . शरावती व तिचे वडीलही दरवर्षी या महोत्सवात सहभागी होउन आपली गायनकला , नॄत्यकला सादर करीत असत . या सर्व कलाकारांचा राजाच्या हस्ते पारितोषिक देउन सत्कार केला जात असे .

अशाच एका वर्षी यात्रेमधे एकेक कलाकार राजा व जनता यांच्यापुढे येउन आपापली कला सादर करुन जात होते . अखेरीस शरावतीचे नाव पुकारले गेले . शरावतीने पुढे येउन आपल्या नृत्याला आरंभ केला . तिला यावर्षी तिच्या गुरुंनी मयुरनृत्य शिकवले होते . जंगलामधे पावसाची आतुरतेने वाट पाहणारा मयुर , पाउस पडु लागल्यावर आनंदाने आपला पिसारा फुलवुन थुई थुई नाचणारा मयुर अशा मयुराच्या अनेक छटा शरावतीने आपल्या मयुरनृत्यामधुन अत्यंत सुरेख रितीने आणी बारकाईने सादर केल्या . तिचे हे मयुरनृत्य पाहुन सर्व उपस्थित जन भानच विसरुन गेले . आपल्या समोर खरोखर एक मोरच नृत्य करतो आहे असाच त्यांना भास होउ लागला .

शरावतीचे मयुरनृत्य संपले आणी सर्वांनीच आनंदाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला . त्या वर्षी राजाच्या हस्ते उत्कृष्ट कलाकाराचे बक्षिस शरावतीलाच मिळाले . त्याचबरोबर राजाने तिच्या या मयुरनृत्याची कायमस्वरुपी आठवण म्हणुन जाहिर केले की " यापुढे या गावाचे नाव खेडा नसुन मयुरखेडा असेल . "

त्या दिवशी यात्रेमधे एक साधु आला होता . शरावतीचे मयुरनृत्य पाहुन तो खुप प्रभावित झाला . त्याच दिवशी त्याने शरावतीला भेटुन तीला आशीर्वाद दिला .

"बेटी , तुझे मयुरनृत्य , तुझी नृत्याप्रती असलेली निष्ठा पाहुन मी खुप भारावुन गेलो आहे . तुझ्यावर प्रत्यक्ष भगवान नटराजाची कृपा आहे . माझा तुला आशीर्वाद आहे की , मयुराचे तु नृत्यामधुन सच्चे सादरीकरण केलेस , म्हणुन प्रत्यक्ष मयुर बनुन मयुरनृत्य करण्याचा दिव्य अनुभव तु घेउ शकशील . यापुढे प्रत्येक पौर्णिमेला रात्री काही ठराविक प्रहरांसाठी तुझे एका सुंदर , डौलदार मयुरामधे रुपांतर होईल . आणी ख-या मयुराच्या रुपात मयुरनृत्याचा आनंद तुला घेता येईल ."

हे ऐकुन शरावतीने आनंदित होउन कृतज्ञतेने साधुमहाराजांना नमस्कार केला . त्याच वेळी साधुने तिला एक सावधगिरीचा इशाराही दिला .

"बेटी , पण एक लक्षात ठेव . हे रहस्य तु कधीही कुणालाही सांगु नकोस . जर सांगितलेस तर तुझ्याच जिवाला धोका निर्माण होईल . "

शरावतीने नम्रपणे साधुमहाराजांना नमस्कार करुन या सुचनेचे पालन करण्याची ग्वाही दिली . साधु प्रसन्नतेने आपल्या पुढील वाटचालीला निघुन गेला .

शरावतीचे सुरेख मयुरनृत्य पाहुन राजाही खुप प्रभावित झाला होता . त्याने शरावतीसाठी तिच्या वडीलांकडे मागणी घातली . थोड्याच दिवसांत शरावतीचे राजाशी लग्न झाले . आणी शरावती आता राणी शरावती झाली . तिच्या सुखाला , आनंदाला पारावार उरला नाही . तिचे एकेक दिवस आनंदात जाउ लागले .

राजाही खुप आनंदात होता . पण काही दिवसांमधे त्याला एक शंका सतत सतावु लागली . दर पौर्णिमेला रात्री काही ठराविक प्रहरांसाठी राणी शरावती अचानक राजवाड्यामधुन दिसेनाशी होत असे . अनेक दास , दासी , पहारेकरी तिचा शोध घेत असत , पण ती कुठेच दिसत नसे . पहाटे परत आपल्या महालामधे ती दिसुन येत असे .

या अजब प्रकारामुळे चक्रावलेल्या राजाने किंचीत रागानेच शरावतीला या प्रकाराचे कारण विचारले . राजा रागावलेला पाहुन शरावती त्या साधुने दिलेला सावधगिरीचा इशारा विसरली . अखेर शरावतीला आपल्याला साधु महाराजांनी दिलेल्या आशीर्वादाची घटना राजाला सांगावी लागली . राजाला सुरुवातीला हे खरेच वाटेना . पण त्याने जेव्हा पौर्णिमेला रात्रीच्या वेळी रानी शरावतीचे मयुरामधे रुपांतर होउन तिने मयुरनृत्य सादर करण्याचा हा अद्भुत प्रकार प्रत्यक्ष पाहिला . तेव्हा त्याची खात्री पटली .

राजा हा कलेचा भोक्ता होता . रानी शरावतीला लाभलेली हि विलक्षण नृत्यकला पाहुन तो खुप आनंदीत झाला . त्याने मोठ्या हौसेने मयुरखेडा गावाबाहेरील एका टेकडीवर एक सुरेख बगिचा उभारला . त्या बगिच्याच्या मधे कुशल कारागिरांकडुन एक भव्य संगमरवरी महाल बांधला . नामवंत चित्रकारांना बोलावुन महालाच्या संगमरवरी भिंतींवर , फरशीवर सगळीकडे पिसारा फुलवुन नाचत असलेल्या मोराची राजस्थानी शैलीतली अनेक सुरेख चित्रे रंगवुन घेतली . या महालाला त्याने कौतुकाने नाव दिले "रानी शरावतीका महल" .

प्रत्येक पौर्णिमेला राजा , राणी रात्री आपल्या काही निवडक शुर रक्षकांना घेउन या महाली जात असत . रात्री राणी शरावतीचे एका सुंदर मयुरामधे रुपांतर होउन तिचे विलक्षण मयुरनृत्य बघण्याचा अदुभुत अनुभव राजाला मिळत असे . रक्षकांचा कडेकोट पहारा असला तरीही कुठेतरी चोरपावलांनी ही घटना कमी अधिक प्रमाणात बाहेर पसरली . मनुष्यरुपातुन मयुररुपात परावर्तीत होउन बागेमधे नृत्य गायन करणारी एक अदुभुत मोरनी आपण पाहिल्याचे अनेकजण शपथांवर सांगु लागले .

या विलक्षण मोरनीवर आधारीत अनेक असली नकली कथा , लोककथा तयार झाल्या. अनेक लोकगीते , लोककाव्ये तयार झाली . देश विदेशी भ्रमण करणारे व्यापारी लोकांचे जथ्थे , समुहाने फिरणारे फिरस्ते , हातात एकतारा घेउन वाळवंटांमधे गात गात फिरणारे बंजारे , उंटांचे काफिले घेउन अनेक ठिकाणी व्यापार उदिमासाठी फिरणारे लमाणांचे तांडे यांच्यामार्फत या लोककथा , आणी लोकगीते यांचा अनेक ठिकाणी प्रचार झाला . दुरवर अफगाण , सिंध , पर्शिया , चीन , ब्रम्हदेश अशा अनेक ठिकाणी या चमत्कारीक मोरनीची चर्चा होउ लागली . लागेल तेवढे दिनार , सिक्के , सोने , चांदी , नाणी , रक्कम , हिरे मोती , दाग दागिने देउन त्या चमत्कारीक मोरनीला जिवंत अथवा मृत पकडण्यासाठी अनेक जमिनदार , राजे , बादशाह , सरदार तयार होउ लागले .

राजा राणीचे दिवस सुखांत चालले होते . पुढील काहि वर्षांमधे त्यांना एक मुलगा आणी एक मुलगी अशी मुले झाली . राणी शरावती आपल्या जीवनात खुप सुखी होती .

पण अखेरीस त्या साधुने दिलेला धोक्याचा इशारा खरा ठरला . एका पौर्णिमेला राजा आणी रानी "रानी शरावतीका महल" मधे गेले असताना , त्यांच्या हितशत्रुंनी त्यांच्यावर हल्ला केला . राजा आणी राणीच्या शुर अंगरक्षकांनी मोठ्या शौर्याने , आपल्या प्राणांचे बलिदान करुन तो हल्ला उधळुन लावला . पण या हल्ल्यामधे राणी शरावती खुप जखमी झाली . काहि दिवसांतच तिचा मृत्यु झाला . साधुने तिला दिलेला चमत्कारी वर हाच शेवटी तिच्या अंताचे कारण बनला . राजा खुप दु:खी झाला . पुढे राजाचाही काही कालावधीतच मृत्यु झाला .

आपल्या शेवटच्या दिवसांमधे दु:खात बुडुन गेलेला राजा प्रत्येक पौर्णिमेला रात्री एकटाच "रानी शरावतीका महल" मधे येत असे . दु:खामधेच रानी शरावतीच्या नावाने चहुकडे भ्रमिष्टासारखा हाका मारत असे . तिला मयुरनृत्य करण्यासाठी परत बोलावत असे . असे म्हणतात की , राजाचे हे हाल न बघवुन , रानी शरावतीचा आत्मा खरोखरच "रानी शरावतीका महल" मधे पौर्णिमेला रात्री येत असे . आणी एका सुंदर मयुरामधे रुपांतरीत होउन राजासमोर मयुरनृत्य सादर करीत असे . "

एवढे बोलुन तो गाईड थांबला . रानी शरावतीची हि अदुभुत कहाणी ऐकुन मयुरा , नेहा आणी राधा यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले . आत्ता या क्षणी आपण अशा ऐतिहासीक "रानी शरावतीका महल" मधेच उभे आहोत या विचाराने तर त्यांना काहिच सुचेना .

"खरोखर हि खुप अद्भुत , विलक्षण कथा .. लोककथा आहे . रानी शरावतीची आणी या रानी शरावतीका महलची . " त्या तिघीही एकाच वेळी म्हणाल्या .

"या कथेचा खरा अद्भुत भाग तर अजुन पुढेच आहे मैडमजी . " तो गाइड त्यांना गंभीरपणे म्हणाला .

"काय ? आम्हाला सांगा .." तिघीही उतावीळपणे म्हणाल्या .

"राजा आणी रानी शरावतीचे वंशज अजुनही राजस्थानमधे , जगात ठिकठिकाणी आहेत . असे म्हणतात की , कितीतरी शतके उलटली असली , तरी त्या साधुने दिलेल्या आशीर्वादामुळे रानी शरावतीला मिळालेली विलक्षण मयुरनृत्यकला तिच्या वंशजांनाही लाभली आहे . या आशीर्वादाच्या प्रभावामुळे या वंशजांपैकी कोणीतरी दर पौर्णिमेला रात्री आपले , जगाचे भान विसरुन या रानी शरावतीका महलमधे येतो . आणी त्याच प्रभावामधे काही ठराविक वेळेसाठी मयुरामधे रुपांतरीत होउन या महालामधे मयुरनृत्य करतो . पण तो कोण आहे , कधी येतो , कसा येतो आणी कधी जातो हे त्या आशीर्वादाच्या प्रभावामुळे आजपर्यंत कोणालाच समजलेले नाही . "

---------- क्रमशः------------------ भाग ३ समाप्त ------------ काल्पनीक --------------------

कथालेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

26 Jun 2017 - 11:44 pm | ज्योति अळवणी

छान. पुभालटा

छान.. उत्सुकता वाढत आहे.. पुभाप्र.

सिरुसेरि's picture

27 Jun 2017 - 10:21 am | सिरुसेरि

धन्यवाद

कंजूस's picture

27 Jun 2017 - 12:28 pm | कंजूस

:) ;) :)

सस्नेह's picture

27 Jun 2017 - 12:31 pm | सस्नेह

पुभाप्र.

लांडोरीला इंप्रेस करायसाठी मोर नाचतो, तर मग

शंका क्र १
शरावतीची लांडोर होईल ना मोर राजा चा व्हायला पायजे,
शंका क्र २
जर शरावती मोर आहे राजा लांडोर आहे तर अश्रु कोण पिनार?
शंका क्र ३
मग पिल्ल कोणाला झाली?

प्रीत-मोहर's picture

28 Jun 2017 - 3:19 pm | प्रीत-मोहर

मस्त. पुभाप्र.

वाचतोय! अजून थोडे काहीतरी राहिलं आहे असे वाटत आहे. पुढील भागाची वाट पाहतोय.