:SS
जीवन म्हणजे नक्की काय असतं ?
जीव न म्ह णजे
कुणाला माहित नसणारं
प्रत्येकाचं निरनिराळं
एक गोष्टीचं पुस्तक असतं
जन्म त्याची सुरुवात
मृत्यू त्याचा शेवट
दररोज त्याचं लिहितं एक पानं
कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित
हार-जीत, राग-प्रेम यांना
असतं यात स्थान
सुख-दु:ख यांचे चढाव यात फार
हसायचं नसलं तरी हसावं लागतं
रडायला आलं तरी आवरावं लागतं
जीव न म्ह णजे
एक गोष्टीचं पुस्तक असतं
आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं
भातुकलीच्या डावासारखं
अर्धवट सोडायचं नसतं..........................
प्रतिक्रिया
14 Oct 2008 - 1:32 pm | बाला
खरच यालाच जीवन म्हनतात ?????????????????????????? होय.............................
14 Oct 2008 - 5:02 pm | विसोबा खेचर
वा! जीवनविषयक पुस्तक आवडलं! :)
15 Oct 2008 - 10:01 pm | मंदार
जीवनविषयक कवी कल्पना आवडली.
16 Oct 2008 - 12:17 pm | क्षितिजा
वा! मस्त!!
4 Jan 2009 - 12:39 pm | विचित्र विर
सुन्दर , तु ठाण्याची का? ब्रा. सो. ?
4 Jan 2009 - 1:46 pm | अविनाशकुलकर्णी
जिवन म्हणजे पुस्तक असत..
त्याच्या घटना,त्यानेच
क्रमवार लिहिल्या असतात.
आपण त्याने लिहिलेल पान
फक्त वाचयच असत....
त्याने लिहिलेले मान्य करायच असत..
ते पुर्ण वाचायच कि निम्म
हेहि त्याने ठरवल असत...
काय घटना होणार/घडणार
सारे त्याने ठरवले असते....
आपण फक्त निमित्त असतो
......अविनाश....
4 Jan 2009 - 6:50 pm | मीनल
शर्मीला, छान आणि सत्य लिहिल आहेस.
मीनल.