पावसावर कविता? नाय नो नेव्हर!

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
14 Jun 2017 - 11:56 am

आता पाऊस आला की,
सगळे कविता करतील
पावसावर, प्रेमावर,
शहारलेल्या भेटींवर.
तुम्हाला सांगते,
आम्हा (सो कॉल्ड) कवीलोकांना,
निमित्त हवं असतं उगा.
सेंटीमेंटल कविता लिहून,
मजा घेत असतो तुमची.

हळवे कोपरे, हळवे क्षण,
एक पाऊस पडून गेला,
की सगळं कसं हुळहुळतं,
आम्ही त्याचीच वाट बघतो.
मग काहीबाही लिहून,
जखमेवर एक फुंकर मारतो,
गरम चहाचे भुरके घेत,
पावसाला एन्जॉय करतो.

मी नाही हा असं करणार
पावसाबिवसावर कविता?
लिहून लिहून काय लिहणार?
कसा बाहेर पाऊस पडताना
मी आत कोरडीठक्क.
फारफार तर बाहेरचा पाऊस आत,
आतला पाऊस बाहेर!
खिडकीत बसून आठवलेली
पावसातली पहिली भेट.
मग जनरली त्याच किंवा
त्याच्या पुढच्या वर्षीच्या
पावसातच भिजत भिजत
कळवलेला नकार.
मग थांबलेलं जग,
कोसळलेला पाऊस
अजून काय?
हेच, हेच असतं ना पाऊस म्हणजे?
पाऊस, प्रेयसी, आणि नकार
कवितेचा टीआरपी डायरेक ढगात.

श्या पुरे झालं आता,
आपण तर नाही बाबा,
असलं काही लिहिणार.
किती पाऊस पडला तरी,
न विसरता छत्री घेऊन जाणार.
अहो किती झालं तरी,
निसर्गातला एक ऋतू तो.
नेमेची येणारा आणि,
नेमेची रडवणार्या पावसाला
मी आता वाकुल्या दाखवणारं.
यंदाच्या पावसाळ्यात,
पाऊस कसा ओव्हररेटेड आहे
हेच मला सांगायचंय.
पण त्यासाठी पावसावर
कविताबिविता अजिबात नाही करणार!

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

14 Jun 2017 - 12:14 pm | चांदणे संदीप

कविताबिविता अजिबात नाही करणार!

कविता मस्तच, आवडली!

Sandy

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Jun 2017 - 12:29 pm | माम्लेदारचा पन्खा

छान कल्पना !

तुमचं काव्यकौशल्य मात्र अंडररेटेड आहे हा! ;-) पुकप्र. :-D

अनन्त्_यात्री's picture

14 Jun 2017 - 4:21 pm | अनन्त्_यात्री

भावली !

प्राची अश्विनी's picture

14 Jun 2017 - 4:32 pm | प्राची अश्विनी

आवडली.

पद्मावति's picture

14 Jun 2017 - 5:13 pm | पद्मावति

मस्तच :)

अभ्या..'s picture

14 Jun 2017 - 5:26 pm | अभ्या..

हेहेहे
जा तिकडंच

मुक्त विहारि's picture

14 Jun 2017 - 5:33 pm | मुक्त विहारि

तुम्ही पण पावसावर कविता केलीच की...

अगदी पार, "अगं अगं न्हशी......" सारखी अवस्था बर्‍याच जणांची होते.

बादवे,

"अगं अगं न्हशी......" ही म्हण आहे, उगाच म्हशींचा अपमान करायचा आमचा हेतू नाही.

रातराणी's picture

14 Jun 2017 - 11:13 pm | रातराणी

सर्वांना धन्यवाद :)

प्रचेतस's picture

15 Jun 2017 - 9:10 am | प्रचेतस

मस्तच.

पिशी अबोली's picture

15 Jun 2017 - 10:38 am | पिशी अबोली

मस्त!

चिनार's picture

15 Jun 2017 - 11:17 am | चिनार

मस्त !

सतिश गावडे's picture

15 Jun 2017 - 11:29 am | सतिश गावडे

नाय नाय म्हनून तुमी पन पावसावरच कविता लिवलीव. पन मस्त लिवलीव.

नीलमोहर's picture

15 Jun 2017 - 3:49 pm | नीलमोहर

ते उगाच, अशा या पाऊसवेळी, तू नसता जवळी, किंवा पाऊस माझ्या मनीचा, तुझ्या डोळ्यांत झरेल का, वगैरे हळवं दवणीय वाचून असं हसायला येतं ना, वाटतं त्या कवीला गदागदा हलवून म्हणावं, जा ना बाबा कामं कर ना,

तुम्ही मात्र तसं काही केलं नाहीत ते खूप आवडलं,

मस्त..

मरो तो पावसाळा...

सत्यजित...'s picture

21 Jun 2017 - 12:36 am | सत्यजित...

खूप छान! मस्तंच!

अभिजीत अवलिया's picture

21 Jun 2017 - 9:54 am | अभिजीत अवलिया

कविता आवडली.