एक बाजू अशीही!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Jun 2017 - 11:24 pm

काही दिवसांपूर्वी मला whatsapp वर एक लिंक आली होती. विषय होता'A LEGAL RAPIST'. एका विवाहित स्त्रीच्या मनातले विचार मांडले आहेत या लिंकमध्ये. 

नवरा कामावर असतो आणि ती घरी. तो घरासाठी कमावतो आहे आणि ती घर सांभाळते आहे. 'तो कमावतो आणि मी घराचे खर्च संभाळते', 'मी नोकरी करत नाही; पण आम्ही दोघेही कंपनीच चालवतो. तो बाहेर काम करून आणि मी घरी काम करून.' अशा काही वाक्यांमधून तिच्या मनात असलेल तिच स्वतंत्र आस्तित्व कुठेतरी जाणवत. याचा अर्थ ती एक सुशिक्षित स्त्री आहे. खोल कुठेतरी तिच्या मनात तिने जपलेल स्वत्रांत्य जाणवत. पण या विडीओ मध्ये पुढे तिनेच  एक घटना सांगितली आहे. ज्यातून खरा twist समजतो. 

शनिवार रात्र असते. नवरा कामावरून येतो त्यावेळी तिच डोकं दुखत असत. पण तो येतो म्हणून ती उठून त्याच्याकडे जाते. तो तिच्या जवळ येतो. तिची मासिक पाळी सुरु असते त्यामुळे तिची इच्छा नसते. परंतु तरीही तिचा नवरा तिच्याकडून जबरदस्ती शरीर सुख घेतो. घेतो काय ओरबाडतो! त्या त्याच्या एका कृतीनंतर मात्र तिची उद्व्यग्ता आणि तिच्या मनातली घुसमट व्यक्त झाली आहे. बर नसलं तरी; मासिक पाळी असली तरी; केवळ 'नवऱ्याची इच्छा' म्हणून स्त्रीने त्याला स्वतःच शरीर स्वाधीन करायचं? अनेक पिढ्या एक वाक्य मुलींना लहानपणापासून सांगितल जात... 'पतिला जर मुठीत ठेवायचं असेल तर त्याला नाही म्हणू नकोस.' मुळात पतिला मुठीत का ठेवायचं? आणि नाही म्हंटल तर तो त्याचा अपमान कसा? केवळ तो घरासाठी पैसे कमावतो आणि स्त्री घराबाहेर पडून नाही कमावून आणत म्हणून त्याला नाही म्हणायचा अधिकार तिला नाही? तो म्हणतो माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे... केवळ या 'खुप प्रेमा'साठी त्याची कुठलीही मागणी मनाविरुद्ध पूर्ण करायची? प्रसंगी त्याच्या शिव्या, त्याच्या घरच्या व्यक्तिंनी केलेले अपमान सहन करायचे? असे अनेक प्रश्न!!! स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सन्मान असे अनेक विषय या 'A LIGAL REP' विषयाशी निगडीत या विडीओमध्येआहेत. 

हेच विषय निगडीत असलेला अजून एक मुद्दा किंवा घटक आहे. मात्र आजवर मी याबद्दल फारशी चर्चा ऐकलेली नाही किंवा माझ्या वाचनात आलेल नाही. 

पतिची इच्छा असते म्हणून मनाविरुद्ध स्त्रीने त्याला शरीर स्वाधीन करायचं असत; हा विचार जितका घृणास्पद आहे तितकंच तिची शरीर सुखाची इच्छा असूनही केवळ त्याची इच्छा नाही म्हणून ते घडत नाही हे देखील स्त्रीला मानहानीकारक नाही का? दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागुन वर्ष अनेक नवरे केवळ जिच्याशी लग्न केल तिच्यावरच मन उडालं किंवा मन भरल म्हणून किंवा आता दुसरी कोणी आवडते म्हणून तिला शरीर सुख द्यायला नाकारतात. तरीही ती स्त्री मात्र आई, सून, आणि पत्नी म्हणून तिची सगळी कर्तव्य पूर्ण करत राहाते. दोघे एकाच खोलीत झोपतात... जगासमोर पती-पत्नीची भूमिका उत्तम वटवतात..... वर्षानुवर्ष एकत्र राहून 'so called' संसार जगतात... मात्र ती स्त्री आतमधून घुसमटत असते... तिच्यावर देखील तेच संस्कार असतात ना.... 'नवऱ्याची इच्छा!' तिचा आदर कर. 

कुटुंब सल्ला केंद्राच्या निमित्ताने मी अशा अनेक गरीब स्त्रियांना भेटले आहे ज्या म्हणतात 'काय करू आता त्यांना मी आवडत नाही.' 'माझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून ते माझ्याकडे आता बघत नाहीत.' या स्त्रिया किमान मनातली भावना शेजारणीकडे किंवा कुटुंब सल्ला केंद्रात येतात तेव्हा बोलून दाखवतात. परंतु मध्यम वर्गातील अशा अनेकजणी असतील ज्या आवश्यकता असते म्हणून घरासाठी कमावून आणतात. एक आई, एक सून म्हणून प्रत्येक जवाबदारी पूर्ण करतात...  तिचं तिच्या पतीवर मनापासून प्रेम असत मात्र पतीचा तिच्यातला इंटरेस्ट संपलेला असतो. त्यामुळे तो अगदी सहज तिला नाकारतो. अर्थात त्याला ती जरी प्रेयसी म्हणून नको असली तरी तिने त्याची पत्नी असण मात्र त्याला हव असत. मग तो बंद बेडरूम मध्ये तिचा कोणीच राहात नाही. तिला हवस असणार प्रेम... शरीरसुख... तो नाकारतो.  या नकारामुळे ती मनातून आयुष्यभर जळत राहाते. तरीही समाजात मात्र 'श्रीयुत आमके' यांची पत्नी म्हणून वावरत असते. कदाचित तिच्या मनात देखील 'मी आवडत नाही म्हणजे माझ्यातच काही कमी आहे'; हे येत असेल. या तिच्या मनाच्या घुसमटी बद्दल कधीच कोणीच बोलणार नाही का? आजही स्त्रीला शरीर सुखाची इच्छा झाली तरी त्याबाबतीत बोलण किंवा आपली इच्छा आपल्या पतीकडे व्यक्त करण देखील अवघड वाटत. त्यादोघांमध्ये याविषयातला मोकळेपणा असू नये का? 

कदाचित एक असाही विचार पुढे येईल या विषयात की तिची इच्छा असेल आणि नवरा ती पूर्ण करत नसेल तर तिने हे सुख बाहेर जाऊन मिळावावं. पण म्हणजे परत एकदा तिच्या पतीने तिला जे नाकारलं आहे ते मान्य केल जातंय अस नाही का?  दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तिच जितक तिच्या संसारावर प्रेम आहे तितकच तिच्या पतीवर प्रेम आहे. मग तिने बाहेर का जाव? दोघेही सुधृढ असूनही केवळ त्याची इच्छा नाही म्हणून तिने कुचंबणा सहन करायची हे किती अन्यायकारक आहे! अर्थात ज्याप्रमाणे 'पतीच्या इच्छेला नाही म्हणू नकोस;' हे स्त्रीला कायम सांगितल जात तसाच तिला हे देखील सांगितल जात की तुझ्या इच्छांना मुरड घालायला शिक. 

खर तर शरीरसुख हा तस बघितल तर वयक्तिक आणि तरीही चर्चेचा विषय आहे. पती-पत्नीसाठी वयक्तिक आणि तरीही पती-पतींमध्ये चर्चेचा! हे आपण समाज म्हणून स्वीकारलं आणि आपल्या मुलीला सांगितल की तुझी इच्छा दडपणे म्हणजे स्त्रीत्व नाही; तर कदाचित कुठेतरी बदल घडू शकतो. अलीकडे विविध स्तरांवर मुख्यत्वाने एक चर्चा घडते की  'इच्छा नसताना शरीरसुख घेतलं तर लग्न झालेलं असल तरीही तो  legal rep आहे', तसच 'इच्छा असूनही शरीरसुख दिल जात नाही' हे देखील 'legal harresment आहे' हा विचार देखील आपण मान्य करून चर्चेत आणला पाहिजे.

'माझी इच्छा नाही त्यामुळे तू माझ्या शरीराला हात लावायचा नाही', हे मोकळेपणी स्त्रीने सांगितले पाहिजे हा विचार जितका महत्वाचा आहे आणि अलीकडे तो सहजपणे मांडला जातो आहे; तितकाच 'माझी इच्छा आहे.. मला शरीरसुख हव आहे' हे देखील तिला स्पष्टपणे सांगण जमलं पाहिजे. तू नाकारू शकतेस... तो तुझा हक्क आहे! ही चर्चा जशी अलीकडे होताना दिसते; तसेच तू मागू शकतेस; तो देखील तुझा हक्क आहे! हा विचार देखील पुढे येणे गरजेचे आहे अस मला वाटत. 

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

सहमत आहे. या विषयावर अजून चर्चा व्हायला हवी.

पूर्ण एकतर्फी.

इत्यलम.

आदिजोशी's picture

12 Jun 2017 - 7:12 pm | आदिजोशी

नवर्‍याची इच्छा असताना स्त्रीने नाही म्हणणे का कॄरपणा नाही का? तसेच नवरे मर मर मरून घराला स्थैर्य प्राप्त करून देताना बायका फुसकट विषयांवरून नवर्‍यांच्या डोक्याची मंडई करतात त्यावर चकार शब्दही नाही.

उपेक्षित's picture

14 Jun 2017 - 11:41 am | उपेक्षित

अगदी सहमत आहे गवी, लेख पूर्ण एकतर्फी झालेला आहे स्त्रियांची मुस्कटदाबी होते हे मान्य पण पुरुषांची पण हल्ली जरा जास्तीच मुस्कटदाबी होते त्याचा नावाला पण उल्लेख नाहीये लेखात. शिवाय लग्नाचे आमिष दाखवून केलेले बलात्कार अशा केसेस बद्दल पण काही वेळा शंका वाटते.

पद्मावति's picture

12 Jun 2017 - 4:36 pm | पद्मावति

लेखाशी सहमत आहे.

'माझी इच्छा नाही त्यामुळे तू माझ्या शरीराला हात लावायचा नाही', हे मोकळेपणी स्त्रीने सांगितले पाहिजे.
'माझी इच्छा आहे.. मला शरीरसुख हव आहे' हे देखील तिला स्पष्टपणे सांगण जमलं पाहिजे.

पण कुणाला ?

मला वाटतं कवीतांमधुन व्यक्त होणं, आपली खंत फेसबुक, व्हॉटसअपमधुन मांडणं, डॉक्टरला सांगणे, मैत्रिणिला सांगणे यापेक्षा पती-पत्नींनी एकमेकांना थेट सांगावं. प्रश्नांना थेटपणे न भिडता गप्प बसणे, प्रश्नच टाळणे, दुसर्‍याने आपोआप समजुन घ्यावे अशी अपेक्षा बाळगणे, आडून आडून सुचविणे, त्रयस्थाकडून मध्यस्थी हे सगळे टाळले तर तर बरेच प्रश्न निकालात निघू शकतील. याउप्परही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी नसेल तरच मग इतर पर्याय.

जी गोष्ट आवडत नाही पण करावीच लागणार आहे ती पहिली करावी. जी भाजी आवडत नाही आणि ताटातून काढून ठेवणे शक्य नाही ती पहिली खावी. मानसिक द्वंदातून लवकर सुटका होते.

सचिन७३८'s picture

12 Jun 2017 - 7:00 pm | सचिन७३८

स्त्रीची इच्छा नसतांना तीच्यावर संबंध लादणे जेव्हढे चूक, तेव्हढेच पुरूषाची इच्छा नसतांना त्याला स्त्रीने संबंध ठेवण्यास सांगणे हे ही चूकच!

एमी's picture

14 Jun 2017 - 12:46 pm | एमी

+1.

पण प्रॉब्लेम हा आहे कि 'इच्छा असूनही शरीरसुख दिल जात नाही' हे कारण सांगून घटस्फोट मिळतो. 'लीगल रेपिस्ट' हे कायदेशीर आहेदेखील.

ज्योति अळवणी's picture

13 Jun 2017 - 7:05 am | ज्योति अळवणी

स्त्री ची इच्छा नसते तशी पुरुषाची पण नसू शकते हे मान्य. पण माझं म्हणणं आहे की स्त्री समाजासाठी पत्नी, आपल्या पालकांची सून आणि आपल्या मुलांची आई म्हणून हवी. पण बंद बेडरूम मध्ये ती प्रेयसी किंवा सेक्स पार्टनर म्हणून नाकारणे हा दुटप्पीपणा आहे.

दुसरा मुद्दा इथे नमूद करावासा वाटतो तो म्हणजे आजवर स्त्रिया 'नाही' म्हणायला शिकल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छा नसूनही त्यांना शरीर पतीच्या स्वाधीन करावे लागले. पण स्त्रियांना सेक्समध्ये आवड नसते; त्या केवळ पॅसिव्ह असतात असा सरसकट विचार असतो. पण ते खरं नाही. तिलाही सेक्स आवडू शकते आणि ती देखील ऍक्टिव्ह पार्टनर असू शकते. पण हे मनातले विचार कृतीत आणायला ती संकोचते. अगदी पतिकडे देखील. कारण आजवर नकळत समाजाने निर्माण केलेले जोखड.

त्यामुळे जर पत्नी सेक्स पार्टनर (प्रेयसी) म्हणून नको असेल तर केवळ 'समाजात मिरवण्यासाठी पत्नी, सून, आई म्हणून तिने जगावं ही अपेक्षा करणे चुकीचे. दुसरा मुद्दा तिने तिची इच्छा देखील मोकळेपणी व्यक्त करावी; हा विचार मांडण्याससाठी या लेखाचे प्रयोजन आहे.

संजय क्षीरसागर's picture

13 Jun 2017 - 12:09 pm | संजय क्षीरसागर

आपण ज्या सामाजिकस्तरात राहातो तिथे सगळं संगनमतानंच चालतं. ते तसं चालत नसेल तर पती-पत्नीत सामंजस्य नाही असा अर्थ होतो. इथे टफिंच्या पोस्टवर `विवाहांतर्गत बलात्कार' या विषयावर साद्यंत चर्चा झाली आहे त्यामुळे तो विषय पुन्हा नको.

जिथे स्त्रीला आपल्यावर बलात्कार होतो असं वाटतं तिथे एकतर तिचा पतीशी संवाद अपुरा आहे किंवा मग नको त्या व्यक्तींशी सदर स्त्री नको ती चर्चा करते आहे. थोडक्यात, जो विषय पतीशी बोलायचा तो पतीसोडून इतरांशी बोलून उपयोग नाही इतकी किमान समज तिला नाही आणि त्याची फळं ती भोगते आहे.

पार्ट टू पण सेमच आहे. जर पत्नीची इच्छा पती पूर्ण करु शकत नसेल तर तो ही विषय त्या दोघातला आहे आणि एकमेकांच्या संगनमतानं तो सोडवायचा आहे. कौंसेलरकडे असे विषय घेऊन दोघांनी गेलं तर तज्ञ सल्ला मिळू शकेल पण एकतर्फी तक्रार घेऊन कौंसेलर कडे जाणं हा बालीशपणा आहे कारण त्यातून प्रश्न सुटण्याची शक्यता शून्य.

ज्योति अळवणी's picture

13 Jun 2017 - 8:36 pm | ज्योति अळवणी

मला वाटतं मी जो मुद्दा मांडायचा प्रयत्न केला आहे तो सर्वांच्या लक्षात आलेला नाही. हे मान्य की सेक्स हा विषय खूप वयक्तिक असतो आणि तो पति-पत्नीमध्येच चर्चिला गेला पाहिजे. आपले होकार-नकार; इच्छा-अनिच्छा दोघांनी एकमेकांकडे सांगितली पाहिजे. परंतु मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की भारतीय परंपरेत आणि सामाजिक विचारसरणीमध्ये स्त्रीने आपल्या मनातील इच्छा-अनिच्छा बोलून दाखवली पाहिजे याची तिला कधी जाणीवच करून दिली जात नाही.

त्यामुळे तुझी इच्छा-अनिच्छा तुझ्या पतिकडे स्पष्ट शब्दात मांडू शकतेस हे प्रत्येक स्त्रीला जाणवून दिले पाहिजे.

अलीकडे 'तू नाकारू शकतेस' याची जशी तिला जाणीव करून देण्यासाठी अनेक चर्चा, youtube वरील व्हिडीओ, परिसंवाद, कायदे आहेत तसेच 'तू मागू शकतेस' या विचाराचा देखील मोकळ्या मनाने आणि अशाच विविध फोरम वर स्वीकार झाला पाहिजे; असे मला वाटते.

गामा पैलवान's picture

13 Jun 2017 - 9:10 pm | गामा पैलवान

ज्योतिताई,

तुमचं म्हणणं रास्त आहे. फक्त त्याचा कायदेशीर बलात्काराशी (म्हणजे लेखातल्या पहिल्या वाक्याशी) सुतराम संबंध नाही. का.ब.च्या उल्लेखाने गाडी भरकटते आहे.

आ.न.,
-गा.पै.

ज्योति अळवणी's picture

14 Jun 2017 - 11:20 am | ज्योति अळवणी

मला माझ्या whstsapp वर एक लिंक आली होती. त्या लिंकचा उल्लेख 'legal repist' असा होता. ज्यात केवळ लग्न झालेले असल्याने पती पत्नीची इच्छा नसताना जबरदस्ती शरीरसुख ओरबाडून घेत असेल तर तो 'legal repist ठरतो असा विचार मांडला होता. ही लिंक बघून मनात जे विचार आले ते मी इथे मांडले आहेत. तुमच्या माहितीसाठी ती लिंक देते इथे.

https://m.youtube.com/watch?v=BujVLSbUmG0&feature=youtu.be

गामा पैलवान's picture

14 Jun 2017 - 5:30 pm | गामा पैलवान

ज्योतिताई,

स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत स्त्रीची बाजू नेहमीच लंगडी असते हे मान्य. जर बाई नवऱ्याला दूर ठेवण्यात यशस्वी झाली तर उद्या नवरा दुसरीकडे जाऊ शकतो. मात्र स्त्री अशी घराबाहेर सुख शोधायला जाऊ शकंत नाही. कारण की स्त्री आणि पुरुष वेगवेगळ्या कारणासाठी एकमेकांशी लग्न करतात. म्हणूनंच एकमेकांच्या सहाय्याने या समस्येवर उपाय काढायला हवा.

पत्नीला स्वत:च्या मनाविरुद्ध पतीस शरीर वापरू द्यावं लागणं याला जर कायदेशीर बाजू प्राप्त करून दिली तर बेबनाव वाढण्याचा संभव अधिक. त्यामुळे माझ्या मते हा प्रकार जरी बलात्कारासम असला तरीही यांस बलात्कार म्हणू नये.

आ.न.,
-गा.पै.

ज्योति अळवणी's picture

16 Jun 2017 - 6:17 pm | ज्योति अळवणी

तुम्ही आणि मी म्हणावं किंवा म्हणू नये हा मुद्दाच नाही आहे. कायद्याने पत्नीला हा अधिकार दिला आहे की जर पती तिच्या इच्छे विरुद्ध तिला शरीरसुख द्यायला भाग पाडत असेल तर ती पोलिसांकडे जाऊ शकते. आणि पुढे कोर्टात केस देखील करू शकते.

गामा पैलवान's picture

16 Jun 2017 - 9:04 pm | गामा पैलवान

ज्योतिताई,

कायदा गाढव आहे. कायद्यानं दिलं म्हणून लगेच ओरबाडून घ्यायलाच पाहिजे का?

आ.न.,
-गा.पै.

ज्योति अळवणी's picture

16 Jun 2017 - 11:50 pm | ज्योति अळवणी

ओरबाडून? या शब्दाच प्रयोजन नाही कळल. माझ म्हणण फक्त इतकच आहे की तिची इच्छा नसेल तर ती पोलिसात/कोर्टात जाऊ शकते. तसा तिला अधिकार आहे. त्याच प्रमाणे त्याला ती प्रेयसी/sex partner म्हणून नको असेल तर त्याने देखील तिला पत्नी या नात्याच्या बंधनातून सोडले पाहिजे.

दुसरा मुद्धा जो मी लेखात मांडला आहे आणि जास्त महत्वाचा आहे की sex संदर्भातील इच्छा स्त्रीने मोकळेपणी बोलू नये असे आजवर तिच्यावर संस्कार झाले आहेत. त्यामुळे ती या विषयीची तिची आवड/इच्छा बोलू शकते... त्यात काही वावग नाही... याची तिला जाणीव करून दिली पाहिजे.

मला वाटत मी प्रत्येक उत्तरात हेच परत परत सांगते आहे.... त्यामुळे याहून जास्त काही सांगण्या सारख नाही.

आशा आहे आपण समजून घ्याल माझं म्हणण

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2017 - 12:49 am | संजय क्षीरसागर

तुमच्या साध्या आणि सरळ विचारसरणीबद्दल कायम आदर आहे पण तुमचे लेखात मांडलेले विचार वस्तुस्थितीशी विसंगत आहेत.

सुशिक्षित मध्यमवर्गीय स्त्री स्वतःच्या इच्छेविरुद्ध पतीची बळजबरी मान्य न करण्याच्या परिस्थितीप्रत केव्हाच येऊन पोहोचली आहे. तस्मात, (पुन्हा तेच लिहीतो) सुशिक्षित मध्यमवर्गीय स्त्रीच्याबाबतीत विवाहांतर्गत बलात्कार हा मुद्दा बाद ठरतो. स्त्रीनं सकाळी घरात नुसता आवाज चढवायचा आवकाश, की मध्यमवर्गीय पुरुष लोकलज्जेस्तव गप बसतो. (रात्री आणि ते ही बेडरुम मधली तर बातच सोडा) !

सुशिक्षित मध्यमवर्गीय स्त्री, सेक्स पतीला झुलवण्यासाठी वापरते असा सार्वत्रिक आणि समजमान्य अनुभव आहे. या परिस्थितीत जर ती स्वतः होऊन आपली इच्छा पतीकडे प्रकट करायला लागली तर तीचं डॉमिनेशन कमी होईल. सेक्स ही पुरुषाची गरज आहे आणि तो स्त्रीनं त्याच्यावर केलेला उपकार आहे या युगायुगांच्या धारणेला त्यामुळे शह बसेल. आणि स्त्री रिसिवींग एंडला जाईल त्यामुळे इतका धोका स्त्रीया पत्करणार नाहीत. तस्मात, तुमचा दुसरा मुद्दा ही बाद ठरतो.

कायद्याने पत्नीला हा अधिकार दिला आहे की जर पती तिच्या इच्छे विरुद्ध तिला शरीरसुख द्यायला भाग पाडत असेल तर ती पोलिसांकडे जाऊ शकते. आणि पुढे कोर्टात केस देखील करू शकते. >> कोणत्या देशातील कायद्याबद्दल बोलताय ? भारतात marital rape कायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या लेखातदेखील हेच लिहिलय ना ?

15+ वर्ष वयाच्या (प्लीज नोट द एज) बायकोसोबत पतीने केलेला सेक्स हा भारतात कधीच गुन्हा नसतो. ती यासाठी कधीच पोलिसांकडे जाऊ शकत नाही.

संजय क्षीरसागर's picture

14 Jun 2017 - 12:13 am | संजय क्षीरसागर

टू बी वेरी फ्रँक

१)अलीकडे 'तू नाकारू शकतेस' याची जशी तिला जाणीव करून देण्यासाठी अनेक चर्चा, youtube वरील व्हिडीओ, परिसंवाद, कायदे आहेत

हे अलीकडे नाही फार पूर्वीपासून, म्हणजे शिकवण्यापूर्वीपासून स्त्रीयांना माहिती आहे ! आणि सुशिक्षितात याचाच सर्रास वापर चालू असतो.

२) तसेच 'तू मागू शकतेस' या विचाराचा देखील मोकळ्या मनाने आणि अशाच विविध फोरम वर स्वीकार झाला पाहिजे;

तुम्ही कशावरनं हा निष्कर्श काढला माहिती नाही पण `ती मागते' हा दिवस कित्येक संसारात सुवर्ण क्षण असेल. पुरुष वेड्यासारखे पैश्यामागे धावायचे थांबतील, राजकारणात शिरुन लोकांना डॉमिनेट करण्याच्या फंदात पडणार नाहीत, अखिल कॉर्पोरेट सेक्टरमधले बॉसेस घरचा वैताग कंपनीत काढायचे थांबतील, उगीचच्या उगीच देशाचा सीमाविस्तार किंवा संरक्षणाच्या नांवाखाली जान की बाजी लावून युद्धात उड्या मारणार नाहीत.... इतकं सुख घरातंच मिळतंय म्हटल्यावर कोण नतद्रष्ट बाहेर पडतोयं ?

ज्योति अळवणी's picture

14 Jun 2017 - 11:29 am | ज्योति अळवणी

संजयजी

तुम्ही माझ्या मुद्द्याचा गैरसमज करून घेतला आहात. 'ती मागते' हा दिवस कित्येक संसारात सुवर्ण क्षण ठरेल... हे वाक्य वाचून तुमच्यस विचारांबद्दल नक्की काय म्हणायचं ते समजत नाही.

अहो मी हेच तर म्हणते आहे की तिला कदाचित इच्छा/आवड असेल. पण आजवर स्त्रीने सेक्स विषयी चर्चाच काय पण मनात विचारदेखील अनु नयेत असं कायम तिला सांगितलं गेलं आहे. तिने या विषयात कायम submissive असावं; ऍक्टिव्ह असू नये हाच विचार कायम तिला सांगितला गेला आहे. तुम्ही म्हणता तसा सुवर्ण क्षण/दिवस सर्व संसारांमध्ये यावा म्हणून तर तिने या विषयात मोकळेपणी विचार करावा, बोलावं आणि इच्छा व्यक्त करावी असा विचार मी या लेखात मांडला आहे.

मला नाही वाटत मी जे लिहिलं आहे ते समजायला इतकं अवघड किंवा क्लिष्ट आहे... असो!

संजय क्षीरसागर's picture

14 Jun 2017 - 12:26 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही सध्या गरीब आणि अती श्रीमंत हे दोन वर्ग बाजूला ठेवा कारण आपण त्यात बसत नाही. त्यामुळे सेक्स या विषयावरची चर्चा त्यांच्या संदर्भात निष्फळ आहे. झोपडपट्टीत काय होतं किंवा बंगल्यात काय चालतं हे विषय आपल्या उपयोगाचे नाहीत.

भारतीय मध्यमवर्गीय स्त्रीयांना, सेक्स हा पतीला झुलवत ठेवण्याचा विषय आहे, अशी शिकवण आहे. भारतीय परंपरेत सेक्स ही केवळ पुरुषाची गरज आहे अशी धारणा आहे. स्त्री उपकार केल्याप्रमाणे ती पुरवते . त्यामुळेच स्त्रीला कायद्यात सुद्धा झुकतं माप आहे. बलात्काराची तक्रार केवळ स्त्रीच करु शकते या कायद्यामागे सेक्स हा पुरुषांच्या गरजेचा विषय आहे हीच ठाम समजूत आहे. त्यामुळे स्त्रीया खुलेपणानं पतीला आमंत्रण द्यायला लागल्या तर पुरुष सुखावतील. त्यांना घरीच आनंदाचा ठेवा गवसेल. पती-पत्नीतला स्नेहभाव वाढेल. असा माझा मुद्दा आहे.

आता माझा या आधीचा प्रतिसाद तुमच्या लक्षात येईल.

स्त्री नाईलाजास्तव का होईना पण पतीच्या इच्छेखातर संबंध ठेवू (देऊ) शकते तरी.

पुरुष तर मनाविरुद्ध ते शारिरीकदृष्ट्या करुच शकत नाही.

ज्योति अळवणी's picture

16 Jun 2017 - 12:48 am | ज्योति अळवणी

अहो जर पत्नी प्रेयसी म्हणून नको असेल तर केवळ समाज बांधिलकीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी तिला अडकवून ठेवणे बरोबर आहे का? मनाविरुद्ध शरीरसुख द्या अस म्हणणं नाहीच. उलट पुरुषाला पत्नीला शरीर सुख द्यायचे नसेल तर तिला इतर बांधनातूनही मानाने आणि सत्य स्वीकारून मोकळे करावे; अस मला वाटत

गामा पैलवान's picture

17 Jun 2017 - 3:04 am | गामा पैलवान

ज्योतिताई,

१.

ओरबाडून? या शब्दाच प्रयोजन नाही कळल.

पुरुषाने स्त्रीसोबत मनमानी केली की ते ओरबाडणं झालं. तसंच स्त्रीने कायद्यासोबत मनमानी केली की ते कायद्याकडून ओरबाडून घेणं म्हंटलं पाहिजे, नाहीका?

२.

माझ म्हणण फक्त इतकच आहे की तिची इच्छा नसेल तर ती पोलिसात/कोर्टात जाऊ शकते. तसा तिला अधिकार आहे. त्याच प्रमाणे त्याला ती प्रेयसी/sex partner म्हणून नको असेल तर त्याने देखील तिला पत्नी या नात्याच्या बंधनातून सोडले पाहिजे.

अधिकार वापरायच्या तारतम्याचा स्पष्ट अभाव दिसतो आहे. पोलिसांत जायचं असेल तर लग्न न केलेलंच उत्तम.

आ.न.,
-गा.पै.