"मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं."
"मला वाटतं मी मनुष्याच्या अंगातल्या अगणीत स्वभावगुणधर्मावर जास्त केंद्रीत असतो."
"असं का तू म्हणतोस?"
असं मी मला संगीतात मदत करणाऱ्या सहकाऱ्याला विचारल्यावर तो मला म्हणाला,
"मी देशाच्या तिन निरनीराळ्या प्रांततल्या रीतिरिवाजात वाढलो आहे.हे माझ्या म्हणण्याचं कारण आहे.माझे आईवडिल कलकत्याचे,मी गुजराथ मधे जन्मलो,आणि महाराष्ट्रात, मुंबई मधे वाढलो.
मी ज्यावेळी तरूण होतो,त्यावेळी हे सगळं मला जरा गोंधळात टाकायचं.प्रत्येक प्रांतातले लोक त्यांचे रीतिरिवाज उच्च आहेत असं म्हणायचे.पण माझी खात्री होती की त्यांचं म्हणणं सर्वच काही बरोबर नव्हतं.
मला वाटत होतं जो तो समजायचा की मी बंगाली,गुजराथी किंवा मराठी असावा.बरीच वर्ष मी तिन्हीतही स्वारस्य घ्यायचो.प्रत्येका सारखं व्हायचा प्रयत्न करायचो परंतु एकातही समाधान वाटत नव्हत.मला वाटतं मी माझी निवड कुणा एकात करण्याची जरूरी नव्हती,आणि निवड ते काय याचा अर्थही मला कळत नव्हता आणि निवड न करणं म्हणजे काय हे ही मला समजत नव्हतं.
तरीपण प्रत्येकाचे रीतिरिवाज समजून घेताना मी बरंच काही शिकत होतो.प्रत्येकात सामावून घेण्याच्या माझ्या धडपडीत मला दिसून आलं की प्रत्येकजण आपआपल्यापरीने विशेष आहेत.
असं करताना माझी खात्री झाली की एकाच्या रीतिरिवाजाची निवड करताना दुसऱ्याचा दुरावा करण्याची जरुरी नाही.उलटपक्षी तिन्ही मधून निवड करणं मला जास्त उचीत वाटत होतं. आणि एका पेक्षां दुसरं चांगलं म्हणण्याची जरूरीही नव्हती.
बंगाली संस्कारातून मी त्यांच्या साहित्यीक प्रगतीचा,आणि टागोरांच्या रविंद्र संगीतातल्या सरशीचा सन्मान करतो,गुजराथी संस्कारातल्या त्यांच्या बिझीनेस बद्दलची वेडी चुरस करण्याचे गुण आणि कुणालाही प्रेमाने आणि आदराने " भाय किंवा भेन "म्हणून संबोधण्याच्या रिवाजाचा सन्मान करतो,तसंच मराठी संस्कारातील शिवाजीमहाराजांच्या मर्दुमकीची परंपरा,आणि लोकांचे संगीत नाटकाचे वेड ह्याचाही सन्मान करतो.
ह्यामुळे एकाच संस्कारात जखडून घेण्यापेक्षा मी आता सरमिसळ तिन्ही रीतिरिवाजातून मिळणाऱ्या मौल्यावर प्रेम करू लागलो.प्रत्येक दिवशी मला जे कळत नाही ते कळण्यासाठी ते जवळून न्याहाळतो आणि ही अशी भटकंती करीत असताना अपघाताने मला कांही नवीन शिकायला मिळतं. त्याशिवाय माझ्या आयुष्याला एक आकार पण येतो.
संगीत क्षेत्रात काम करत असताना,हीच कल्पना अंगीकारतो.जे संगीत मी करतो ते माझ्या सारखंच आहे ते काही एकाच रिवाजाचं नसतं, अलिकडे मी संगीतातले पण खूप रिवाज पडताळून पाहिले आहेत.असं करीत असताना माझी अनेक संगीतकारांची ओळख झाली आणि ते पण मानतात की संगीत निर्मीतीच्या क्षमतेचा उगम हा अशाच संस्कारांच्या
सरमिसळतेतच असतो.हे संगीतकार एकाअर्थी ह्या रिवाजांचे माझे गुरूंच झाले आहेत.किती आभार मानू त्यांचे आणि त्यांच्या संगीताचे,कारण माझ्याच संगीतामधे मला हा एक नवीन अर्थ गवसला.
खरोखर हे किती चमत्कारीक आहे की हे लोक ,आणि त्यांचं संगीत आणि त्यांचे रिवाज ह्यांत कसे आपसूप सुधारणा करीत आहेत.जो अनुभव मिळतो आणि जो मार्ग ते स्विकारतात ते खरं तर वाखाणण्या सारखं असतं.आपलं कुटुंब, शेजार, रीतिरिवाज,आणि प्रांत ह्याने याला आकार मिळतो,आपण प्रत्येकजण शेवटी ह्या पद्धतीतून जात असताना कोणा कडून किती शिकत असतो आणि शेवटी आपलं पण कशात परिवर्तन करून घेतो हे लक्षात ठेवण्या सारखं आहे.
मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं."
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
14 Oct 2008 - 7:53 pm | अन्वय
आपलं कुटुंब, शेजार, रीतिरिवाज,आणि प्रांत ह्याने याला आकार मिळतो,आपण प्रत्येकजण शेवटी ह्या पद्धतीतून जात असताना कोणा कडून किती शिकत असतो आणि शेवटी आपलं पण कशात परिवर्तन करून घेतो हे लक्षात ठेवण्या सारखं आहे.
अगदी सहमत. पण अनेकांना हे मान्य नसते. त्यांना "माणूसदरिद्री' म्हणता येईल नाही का?
मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं."
अप्रतिम विचार. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. संगीत हीच एक अशी गोष्टी आहे, की ती आपल्याला स्वत्वाची जाणीव करून देते. तुम्ही जी जागा शोधायला सांगता आहात, ती एखाद्या खूप संवेदनशील संगीतवेड्यालाच शोधता येऊ शकेल. किंबहुना ती जागा शोधण्याचा तो एकटाचा प्रयत्न करू शकतो, असे मला वाटते. येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे.
14 Oct 2008 - 10:04 pm | श्रीकृष्ण सामंत
अन्वय,
आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
आप्ल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com