आज प्रो.देसाई एका गृहस्थाना घेऊन आले होते आणि माझी ओळख करून देताना म्हणाले,
"हे गंगाधर अधिकारी,गेली वीस वर्ष हे कैदी म्हणून तुरंगात होते.साध्याश्या गुन्हाचं पुराव्याच्या आभावी,गाढव कायद्दाने आणि नियतीने त्यांच्यावर हा अत्याचार कला होता.सुटून आल्यावर ते स्वतः आता असिस्टंट जेलर म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यानी मानसशास्त्रावर अभ्यास करून पीएचडी मिळवली आहे.
आमच्या शेजार्यांचे ते नात्याचे आहेत.तुमच्या बरोबर ओळख करून देण्यासाठी मी मुद्दामच याना तळ्यावर घेऊन आलो."
त्यांच्याकडे पाहून मला खरोखरंच कुतुहल वाटत होतं.
पिळदार मिशी, घोगरा आवाज,मोठाले डोळे आणि चेहर्यावर किंचीतसं स्मित असलेले हे गृहस्थ खाकी शॉर्ट,त्यावर बरेच खिसे असलेला बुशशर्ट,हातात एक छोटीशी काठी असे हे व्यक्तीमत्व आणि त्यांचा पेहराव पाहून मला क्षणभर पु.लं च्या बटाट्याच्या चाळीतल्या कोचरेकर मास्तरांची आठवण आली.
"अग बाईss! हे आपले कोचरेकर मास्तर काss?मला वाटलं आपल्या चाळीचा गुरखाss!"
असं वरच्या मजल्यावरून चाळीतल्या बायका गॅलरीत येऊन कोचरेकर मास्तराना उद्देशून म्हणाल्याचे संवाद कानात उगाचच गर्दी करीत होते.
"हलो हाय" चे सोपास्कार झाल्यावर मी त्याना म्हणालो,
"तुमचं खरोखरंच कौतूक केलं पाहिजे.एखादा तुरंगातल्या अनुभवाचा किस्सा सांगाल का?"
हे ऐकून भाऊसाहेबानीच त्याना सुनावलं,
"तो तुमचा मला सांगितलेला मांजराचा किस्सा सांगा.मला पण परत ऐकायला बरं वाटेल"
त्यावर ते गृहस्थ सांगू लागले,
"जवळ जवळ वीस वर्ष तुरंगात राहून मला कळून चुकलं की दायाशील असणं हा काही प्रोत्साहित करण्या सारखा गुण न मानता बरेच वेळा ती कमजोरी समजली जाते.
एकदा एक पांढरं काटकूळं, अस्वच्छ मांजर चुकून तुरंगाच्या आवारात आलं,मीच पहिला होतो की त्या मांजराला जवळ घेऊन कुरवाळत बसलो होतो.
कुत्र्याला किंवा मांजराला गेल्या वीस वर्षात मला कधी हात लावायची संधी मिळाली नव्हती.जवळ जवळ मी त्या मांजराला वीस मिनटं,एका कचर्याच्या डब्याच्या बाजूला आणि भटारखान्य़ाच्या मागे लोळून मजा करताना कुतुहलाने न्याहाळत होतो.ते मांजर बाहेरून जे व्यक्त करीत होतं ते मी माझ्या अंतरातून अनूभवत होतो.
माझ्या जवळ बसलेल्या मांजराला पाहून मला तो एक प्रकारचा माझाच सन्मान वाटत होता जणू काय मी दुसर्या एका प्राण्याचं जीवन संपन्न करीत होतो.
मला वाटतं,एकाद्दाला देखभालीची आवश्यकता असताना तसं करणं ह्यातच खरी माणूसकी आहे.
पुढे काही दिवस मी इतर कैद्दाना त्या मांजराला सहाय्य देताना पहात होतो.जेव्हा एखादा कैद्दांचा ग्रुप बाहेर उन्हात येत असे त्यातले कैक जण त्या मांजराच्या अंगावरून आळीपाळीने हात फिरवीताना पहात होतो.बहुतांश हे कैदी एकमेकाशी कधी बोलताना दिसत नसायचे.बरेच वेळा जेलर सुद्धा नेहमीचा त्यांच्यावर दादागीरी करण्याची प्रवृती सोडून त्या कैद्दाना त्या मांजराच्या अंगावरून हात फिरवणार्याना पहात मजा घेत होता.
दुधाच्या वाट्याभ्ररून आणि पाण्याच्या वाट्याभरून येत होत्या.पावाचे तुकडे कचर्याच्या डब्याच्या बाजूला नीट मांडून कावळे खाणार नाहीत याची काळजी घेतली जात होती.मांजर्याच्या अंगावरचे केस नीट कात्रीने कापून काही तिची नीगा ठेवीत होते.
काही कैदी म्हणाले,
"मांजर योग्य जागी आल्याने त्याला राजा सारखी वागणूक मिळत आहे."
हे खरं होतं.पण मी ते स्रर्व न्याहळत असताना विचार करीत होतो की त्या मांजराने आपल्यासाठी काय केलं?
आमच्या कैद्दांच्या जीवनात काय त्रुटी आहेत ह्यावर खूप चर्चा होते.खरं म्हणजे आम्हाला सुधारण्याचे कार्यक्रम ठेवले पाहिजेत.मानसशास्त्र जाणारे लोक आमच्यासाठी आणले पाहिजेत.काही लोक अशीही चर्चा करतात की तुरंगातलं वातावरण दयाळू, सहनशिलतेचं, समजूतीने घेणारं असं असावं.पण मला वाटतं की हे सर्व गूण कैद्दातही असले पाहिजेत. जवळ जवळ वीस वर्ष तुरंगात राहून मला कळून चुकलं की दायाशील असणं हा काही प्रोत्साहित करण्यासारखा गुण न मानता बरेच वेळा ती कमजोरी आहे असं समजलं जातं.पण जनमानसात असं सांगितलं जातं की तुम्ही मान खाली घालून,इतर बाबतीत नाक न खूपसतां,तुम्ही तुम्हाला कमजोर न राहण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे.हे कसं शक्य आहे?
काही दिवसासाठी त्या जीर्ण-शीर्ण मांजराने त्या कैदखान्यातल्या वातावरणाच्या नियमाचा भंग केला होता.त्यानी ते मांजर आता इथून हलवलं होतं, बहूदा समुचित वातावरण असलेल्या घरात नेलं असावं.परंतु जाता जाता त्या मांजराने माझ्या आणि इतर कैद्दाच्या हृदयात चांगला प्रकाश टाकल्याचं पाहून बरं वाटतं.
ते काही पीएचडी झालेलं नव्हतं,किंवा अपराध-विज्ञानी नव्हतं,आणि मानसशास्त्री नव्हतंच नव्हतं.पण,
"मला कुणी इकडे मदत करेल कां?"
असा साधा प्रश्न विचारून ते मांजर आमच्यासाठी काहीतरी महत्वाची गोष्ट करून गेलं.त्याला आमची जरूरी होती आणि आम्हालाही त्या जरूरीची जरूरी होती.मला वाटतं आपणा सर्वांना तसं हवं असतं."
एका सद्गुणी माणसाबरोबर दोन घटका घालवून आयुष्यात काही तरी शिकायला मिळाल्याचं मला समाधान झालं.
श्रीकृष्ण सामंत