काल विजयादशमी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कालच्या दिवशी आपल्या दलित बांधवांसह बुद्धधम्म स्विकारला
म्हणुन या दिवसाला धम्मचक्र परिवर्तन दिन असही म्हणतात. त्या तथागतांची आठवण म्हणुन ही कविता.
मत्त हत्तीला माहूत करितो
संयमीत अंकूशाने
तसेच कर तू चित्त संयमित
प्रज्ञा विवेकाने
आलस्याचा त्याग करावा
व्हावे सत्यगामी
प्रमाद माने एक कलंक
तोच खरा सद् धर्मी
तुच तूझा रे बन पथदर्शि
नाही दुजा तारणहार
प्रज्ञा बोधी देइल मुक्ति
हाच बुद्धविचार
निर्वाण हेच आहे साध्य
नाही दुजा जीवनहेतु
तथागताचा मार्ग मध्यम
जाण तू , स्विकार तू
प्रतिक्रिया
11 Oct 2008 - 1:31 am | धनंजय
सुरुवातीला धम्मपदातल्या नागवग्गातल्या एका श्लोकांची आठवण झाली.
दन्तं नयन्ति समितिं दन्तं राजाऽभिरूहति ।
दन्तो सेट्ठो मनुस्सेसु योऽतिवाक्यं तितिक्खति ॥ ३२१
(युद्धात संयमी न्यावा, राजास गज संयमी ।
संयमी मानव श्रेष्ठ, दुर्लक्षे अपशब्द जो ॥)