कृतार्थ जोडी

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
10 Oct 2008 - 9:36 pm

कृतार्थ जोडी
====================

त्या तिकडच्या ग्रहमालेत
एक सूर्य विझायला आलाय
जळून जळून फुललेला निखारा
अंमळ जरा पसरलाय.

आतापर्यंत जळतच राहिलो
आतापर्यंत जाळतच राहिलो
मनातल्या मनात उजळणी करतोय
गरगर फिरणारी पृथ्वी
कौतुकाने पहातोय.

त्याच्याच वयाची म्हातारी ती
चाल तिची ही मंदावलीये
खूप फिरले म्हणत
तीही जरा टेकलीये
तुझ्या भोवती फिरणारी
मी ही भिंगरीच होते
एक फेरा घेता घेता
शेकडो वेळा गरगरले
म्हणत कबुली देतीये.

पिल्ल पाखरं उडून गेली
त्यांनी त्यांची दिशा धरली
कृतार्थ जोडी बोलतीये
उरले सुरेल क्षण संगतीने जगतीये
त्या तिकडच्या सूर्यमालेतली रात्र
केव्हाच मागे पडलीये.

=====================
स्वाती फडणीस ............. १०-१०-२००८

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

मीनल's picture

11 Oct 2008 - 7:31 pm | मीनल

छानच आहे .
अर्थ कळायला जरा वेळ लागला.पण मग दोन जोड्यांच साम्य लक्षात आल.
आवडली कविता.
मीनल.

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Oct 2008 - 9:03 pm | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली.
माझ्या "कालाय तस्मै नमः "ह्या कवितेची आशय म्हणून आठवण आली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धनंजय's picture

13 Oct 2008 - 10:03 pm | धनंजय

आवडली.