खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच !
खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं.
१) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते.
२) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य ! याचा अर्थ तुमच्याकडे करोडो रुपये हवेत असा नाही. तर तुम्हाला हव्या त्या सुविधा, स्वतःच्या सृजनात्मकतेसाठी असणारी मोकळीक...कधी वाटलं तर बाहेर जाऊन जेवणं, एखादा सिनेमा, समुद्र किनारी किंवा डोंगर-दरीतली एखादी सहल करण्याइतपत तरी तुमची आर्थिक ऐपत हवी. आर्थिक चणचण तुम्हाला हतोत्साह करु शकते. आणि उधारी किंवा कर्ज तुम्हाला एकप्रकारचा अवमानकारक फिल देऊ शकते.
३) खुशवंत म्हणतात : स्वतःच घर असणं हा एक मोठा सुखाचा भाग आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला आपलेपणा आणि निर्धास्तता वाटत नाही. जर तुमच्या घराशी छोटीशी का होईना, बाग फुलवली तर उत्तम ! स्वतः लावलेली झाडं मोठी होतांना आणि बहरतांना बघणं, सृष्टीशी एकतानता साधण्याचा आनंद देतं.
४) एक समंजस सहचारिणी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती तुमची पत्नी असो, जिच्याशी शारिरीक जवळीक आहे अशी मैत्रिण असो की नुसती मैत्रिण असो. जर (सहचारिणीशी ) कमालीचे मतभेद असतील तर तुमचा मनोभंग होईल. मतभेद विसरुन एकमेकांचा स्वीकर करत कलहविरहीत जगणं कधीही बरं !
५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा.
६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल.
७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे .
८) रोज सकाळी आणि संध्याकाळी, दहा/दहा मिनीटं ध्यान किंवा सिंहावलोकनाला ठेवा. सकाळच्या १० मिनीटांपैकी ५ मिनीटं नुसतं शांत बसा. आणि ५ मिनीटं दिवसभरात काय करायचं ते ठरवा. संध्याकाळी सुद्धा ५ मिनीटं नुसत शांत बसा. आणि उरलेल्या ५ मिनीटात आपण ठरवलेल्या कामातली किती पार पाडली याचा आढावा घ्या.
९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला.
१०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसायला हवा किंवा तुमची कुणाविषयी काहीही तक्रार नको !
___________________________________
स्वतःचा मृत्यू-लेख खुशवंत सिंगांनी असा लिहीला आहे :
Here lies one who spared neither man nor God;
Waste not your tears on him, he was a sod;
Writing nasty things he regarded as great fun;
Thank the Lord he is dead, this son of a gun
या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही,
याच्या मृत्यूचा शोक करु नका,
हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता.
प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता.
हा गेला ते देवाचे उपकार आहेत....
हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
प्रतिक्रिया
7 May 2017 - 4:28 am | अमेरिकन त्रिशंकू
Thank the Lord he is dead, this son of a gun
हा माणूस बंदुकीची औलाद होता !
असा शब्दशः अनुवाद बघून गहिवरून आलं.
7 May 2017 - 9:11 am | मोदक
हा हा हा..!!
7 May 2017 - 7:50 am | सतिश गावडे
हे खुप महत्वाचे आहे ;)
7 May 2017 - 7:52 am | भाकरी
"हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता" हा तर कहर आहे!!!!!
पण म्हणा संक्षीनी केलाय तो म्हणजे अगदि योग्य आहे. :-P
7 May 2017 - 8:09 am | सतिश गावडे
"हा एक गवतपट्टा होता" कसे वाटते?
7 May 2017 - 12:50 pm | खेडूत
नको..मगरपट्टा आठवतो! =))
त्यापेक्षा नुसती हिरवळ ठीकै.
.
.
सारांश आवडला. यादीतल्या जवळजवळ सर्व सिद्धी अता प्राप्त होत आल्यात असं वाटतंय..
एकूणात त्यांचे वृत्तपत्रीय स्तंभ जास्त वाचलेत.
बाकी खुशवंतसिंगांनी हळुवार लेखनही केलंय.
अकरावीला त्यांच्या आजीवर लिहीलेले ' पोर्ट्रेट ओफ अ लेडी' नावाचे सुरेख व्यक्तिचित्र होते!
7 May 2017 - 7:52 pm | Ranapratap
हा धडा आठवायचा प्रयत्न करत होतो. फार सुंदर व्यक्ती चित्रण आहे. यामुळे इंग्रजी लिहिणारे भारतीय लेखकांची पुस्तके वाचायची संवय लागली.
7 May 2017 - 9:21 am | संजय क्षीरसागर
तर सगळी पोस्टच अनुवाद आहे !
अनुवाद तांत्रिकदृष्टीनं किती योग्य आहे यापेक्षा तो ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो की नाही आणि एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत.
7 May 2017 - 9:53 am | सतिश गावडे
एक ते दहा मुद्दे चांगले भाषांतरीत केलेत तुम्ही.
मात्र मृत्यू लेखाचा अनुवाद वाईट फसला आहे. तुमचे मृत्यू लेखाचे भाषांतर वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याऐवजी विनोदी झाले आहे. :)
7 May 2017 - 1:46 pm | मोदक
अनुवाद तांत्रिकदृष्टीनं किती योग्य आहे यापेक्षा तो ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो की नाही आणि एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत.
एखाद्याने वरील निकषांनुसार लेखन केले असेल तर तुम्ही त्याची बाजू समजून घेऊन संयतपणे प्रतिसाद द्याल की खिल्ली उडवाल..?
(निकषांचे गोलपोस्ट सोयीस्करपणे न बदलणारा) मोदक.
7 May 2017 - 6:24 pm | अमेरिकन त्रिशंकू
एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत.
तुमचा अनुवाद हे करतो असं तुम्हाला खरच वाटतं का? असेल तर मी इथेच थांबतो.
8 May 2017 - 12:21 am | भाकरी
मूळ ईंग्रजी एपिटाफचे तुमचे मराठी भाषांतर "अर्थाला धक्का न लावता वाचकांपर्यंत प्रभावी पोचतय" असं तुम्हाला वाटते?? उत्तर दिलेच पाहीजे असे नाही काही. कारण 'नाही नीट जमले' हे काही तुमच्याकडून आले नाही यात सगळे आले !!
7 May 2017 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
चांगल्या लेखाचे छान भाषांतर. इपिटाफचे भाषांतर फसले आहे याबद्दल सहमती.
हा मुद्दा कळीचा आहे...
५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा.
"Comparisons are odious." असं कोणीतरी १५व्या शतकातच लिहून ठेवलेलं आहे !
7 May 2017 - 1:06 pm | अनुप ढेरे
sod चा शब्दशः अर्थ जरी गवताचा पट्टा असला तरी तो शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतात. सोडोमाइट वरून आलेला असावी ही शिवी.
सन ऑफ गनचा अनुवाद देखील मजेशीर.
7 May 2017 - 1:13 pm | यशोधरा
खुशवंत सिंग माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. त्यांची आठवण काढल्याबद्दल आभार.
7 May 2017 - 3:22 pm | मारवा
अस्ल्याने त्यांचे सेक्सी लिखाण अधिक वाचनीय आहे. वरील लेख्न दुबळ्या अवस्थेतील वाईट काळातले असेल.
7 May 2017 - 3:29 pm | वरुण मोहिते
पण ते विद्वान होते . मला आवडतं त्यांनी लिहिलेलं .
7 May 2017 - 4:54 pm | कंजूस
अपनुवाद आणखी सोज्वळ कसा करणार म्हणा मराठी संस्थळासाठी.
चारपाच पुस्तकं वाचली आहेत. भारी अन रोखठोक. दिल्ली,आत्मचरित्र,ट्रेन टु पाकिस्तान
7 May 2017 - 4:55 pm | कंजूस
अपनुवाद आणखी सोज्वळ कसा करणार म्हणा मराठी संस्थळासाठी.
चारपाच पुस्तकं वाचली आहेत. भारी अन रोखठोक. दिल्ली,आत्मचरित्र,ट्रेन टु पाकिस्तान
7 May 2017 - 5:56 pm | पैसा
लेख वाचला आणि मग लेखकाचे नाव हेमंत लाटकर नाही ना याची पुन्हा खात्री केली. खरे तर शीर्षकातच ठेचकाळले कारण लेखकाला 'live' हा शब्द अभिप्रेत असेल तर त्याचा उच्चार 'लिव्ह' असा करतात आणि 'लीव' असा दीर्घ उच्चार 'leave' या शब्दाचा करतात. बाकी सूत्रांचे भाषांतर ठीकठाक. फक्त ते अमलात कोणी आणायचे हा मोठ्ठा प्रश्न आहे. मृत्युलेखाचे भाषांतर बदललेत तर बरे होईल. नाहीतर ते मिपावर 'मोकलाया दाही दिशा'च्या पंक्तीत जाऊन बसेल.
8 May 2017 - 6:24 am | अभिजीत अवलिया
आपकी पारखी नजर !!!
10 May 2017 - 7:44 am | पैसा
इथे फक्त 'सुपर'च आहे!
9 May 2017 - 11:23 pm | शिवोऽहम्
मीही तिथेच ठेचकाळलो.
पण नंतर 'सॉड'चे शब्दशः केलेले भाषांतर पाहून 'सावर'लो (म्हणजे तोंड आंबट झाले).
10 May 2017 - 7:43 am | पैसा
=))
10 May 2017 - 11:31 am | संजय क्षीरसागर
आपण भाषांतर हास्यास्पद आहे वगैरे कमेंट मारल्या आहेत. जरा भाषांतर करुन प्रतिभा दाखवली तर बोलता येईल.
10 May 2017 - 11:38 am | पैसा
तुम्ही मनमुराद हसवलंत हे खरं आहे. त्याबद्दल धन्यवाद! मी काय लिहू शकते हे तुर्तास बाजूला राहू दे. तुम्ही लिहिताय त्याच चालीत बोलायचे तर डॉ खरे यांनी स्त्रियांच्या रोगांबद्दल लिहू नये असे म्हणता येईल. म्हणजेच ते एखाद्या पुरुष गायनॅकला आधी बाळंत व्हा आणि मग प्रसूतीबद्दल बोला असे म्हणण्यासारखे होईल.
अभावित विनोद झाला म्हणून तुम्ही स्वतःवर कधी हसत नाही का?
10 May 2017 - 12:00 pm | संजय क्षीरसागर
हसायला काय काहीही चालतं कारण त्याला काही कळायला पाहिजे असं नाही. एकतर तुम्हाला काय की त्रिशंकूंना काय अनुवाद जमत नाही हे उघड आहे. बाळंत होण्याची तुलना, जे स्वतःला (किमान मराठीचे तरी) तज्ञ समजतात त्यांनी, मराठी अनुवाद करण्याशी जोडणं हा खरा हास्यास्पद प्रकार आहे आणि अर्थातच उघड पलायनवाद आहे.
10 May 2017 - 12:06 pm | पैसा
=))
10 May 2017 - 12:22 pm | सुबोध खरे
ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा सकाळी न्याहारी करत असताना एक कवी महाशय आले आणि त्याना म्हणाले कि मी तुम्हाला माझ्या काही कविता वाचून दाखवतो. डॉ. हो म्हणाले. कवी महाशयांनी त्यांना तीन कविता वाचून दाखवल्या आणि आशेने विचारले कि कशा आहेत . डॉ केतकर म्हणाले "अगदी भिकार"
यावर कवी महाशय संतापून म्हणाले तुम्ही ज्ञानकोशच लिहा कविता म्हणजे काय ते तुम्हाला कसे कळणार?
यावर डॉ केतकरानी न्याहारीच्या टेबलवर असलेले एक उकडलेले अंडे उचलले आणि ते हसत म्हणाले," हे पहा, हे अंडे काही मी दिलेले नाही. पण हे किती रुचकर लागते ते मी कोंबडीच्या पेक्षा जास्त चांगले सांगू शकतो." हे ऐकून कवी महाशय आपले कवितेचे बाड उचलून पसार झाले .
10 May 2017 - 12:27 pm | पैसा
=))
10 May 2017 - 12:33 pm | संजय क्षीरसागर
विनोद म्हणून त्यावेळी चालून गेला असेल. पण ज्याला कवितेत नक्की काय चूक आहे ते दाखवता येत नाही त्यानं अंडं आणि कोंबडीच्या चवीच्या ज्ञानाशी स्वतःची तुलना करणं हास्यास्पद आहे.
10 May 2017 - 12:43 pm | सुबोध खरे
पण ज्याला कवितेत नक्की काय चूक आहे ते दाखवता येत नाही त्यानं अंडं आणि कोंबडीच्या चवीच्या ज्ञानाशी स्वतःची तुलना करणं हास्यास्पद आहे.
संक्षी
तुमचा अहं दुखावला गेला आहे म्हणून अस वितंडवाद घालता आहात.
मला गाण्यातील ओ का ठो कळत नाही तरीही एखादा साधारण गायक बेसूर झाला आहे एवढं तरी नक्की समजतं. कोणता सूर चुकला आहे हे समजत नसेल तरीही.
चूक झाली तर ती प्रांजळपणे कबुल करण्याचं धारिष्ट्य किंवा प्रामाणिकपणा असावा माणसात.
10 May 2017 - 1:57 pm | संजय क्षीरसागर
तुमचा अहं दुखावला गेला आहे म्हणून अस वितंडवाद घालता आहात.
अहं एकदा मधे आणला की सगळे धन्य झाले !
आहो, मी लेखात बदल केला आहेच आणि तो स्वतःच्या शब्दानं केला आहे. चर्चा करता येत नाही तिथे अहंकार म्हटलं की झालं !
आणि इथे गाण्याचा प्रश्नच येत नाही. मराठीच येत नसेल तर मग कमेंट मारायचीच कशाला ?
10 May 2017 - 7:13 pm | सुबोध खरे
एक साधा सरळ मुद्दा आहे तुम्ही पैसाताईंना म्हणाला कि "जरा भाषांतर करुन प्रतिभा दाखवली तर बोलता येईल."
याचा साधा अर्थ ज्याला भाषांतर करता येत नाही त्याने बोलू नये. म्हणजेच तुमच्या म्हणण्याप्रमाणे " तुम्हाला गाणं म्हणता येत नसेल तर गाण्याच्या सुराबद्दल टीका करू नका" किंवा "अंडं घालता येत नसेल तर त्याच्या स्वादाबद्दल बोलू नका".
चूक मान्य करण्याइतका प्रामाणिकपणा किंवा धारिष्ट्य असावे लागते हे मी एवढ्यासाठीच म्हटले होते.
मराठीच येत नसेल तर मग कमेंट मारायचीच कशाला ?
असे लिहून तुम्ही फक्त ते अट्टाहासाने सिद्ध करून दाखवता आहात.
इथे येणार किंवा लिहिणारा प्रत्येक अन थोडीफार तरी मराठी येते म्हणूनच आलेला आहे एवढेच लक्षात ठेवा. मराठीचा गंधहि नसलेला माणूस मिपावर दाखवून द्या
10 May 2017 - 12:24 pm | संजय क्षीरसागर
स्मायली टाकायला किंवा हसायला काही समजलंच पाहिजे असं नाही.
10 May 2017 - 12:28 pm | सुबोध खरे
अंडं रुचकर लागतं हे समजायला अंडं द्यावं लागत नाही. ते खाऊन पाहिलं कि झालं.
10 May 2017 - 12:31 pm | दशानन
=))
10 May 2017 - 12:34 pm | मितान
हे बरोबर
चित्र चांगलं की वाईट हे कळण्यासाठी स्वतःला चित्र काढता आलेच पाहिजे असं नाही असं परवाच एक सर म्हणत होते ! :)
10 May 2017 - 12:39 pm | पैसा
नको ते बरं आठवतं तुला नको तिथे! =))
10 May 2017 - 1:09 pm | मोदक
गरीब बिचार्या स्वामीना
सगळे टपले छळण्याला.
कंपुबाजीचा निषेध असो.
10 May 2017 - 1:45 pm | अनुप ढेरे
=))
सही पकडे है!
10 May 2017 - 1:51 pm | संजय क्षीरसागर
पुन्हा खरेंचाच विनोद !
मराठी संकेतस्थळावर आपण लिहीतो (शिवाय हास्यास्पद वगैरे कमेंट मारतो) याचा अर्थ आपल्याला नक्की काय हास्यास्पद आहे आणि त्या जागी काय असायला पाहिजे इतपत तरी समज हवी. अन्यथा हसणं हा वेडगळपणा होईल. त्या गोष्टीची चित्र काढता येणं आणि त्याहून थोर म्हणजे बाळंत होता येणं याच्याशी सांगड घालणं हे खरं तर हास्यास्पद आहे . शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का सुमार आहेत याची मी कारणं दिली होती, याकडे दुर्लक्ष करणं हा सोयिस्करपणा नेहेमीचाच आहे.
10 May 2017 - 2:47 pm | अनुप ढेरे
लोकांचे मूळ आक्शेप लेखाबद्द्ल नसून त्या एपिटाफच्या तुम्ही केलेल्या सुमार आणि धादांत चूक भाषांतराबद्दल आहेत. त्यात काय चुकलय हे देखील लोकांनी सांगितलं आहे. एकदोन लोकांनी छाना रुपांतर करून देखील दाखवलय.
10 May 2017 - 2:54 pm | दशानन
शुउउ !!!
असे नका लिहू "तात्या कावतो"
10 May 2017 - 3:52 pm | संजय क्षीरसागर
प्रतिसाद खाली दिला आहे.
10 May 2017 - 1:34 pm | खेडूत
ते जौदे, पण केतकरांच्या न्याहारीत अंडे? शी...!
10 May 2017 - 3:12 pm | मितान
Lol !!!!!! :))
10 May 2017 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
जरा भाषांतर करुन प्रतिभा दाखवली तर बोलता येईल.
ट्युलिप पेंटिंगवर तुम्ही टीका केली होतीत तेव्हा "तुमची चित्रे मिपावर टाका" असे म्हटले तर तुम्हाला ते हास्यास्पद आणि विचित्र :-~ वाटले होते... त्यामुळे, हे वाक्य पाहून आता कोणाला तसेच वाटले तर आश्चर्य वाटायला नको, नाही का ?!![](http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/facepalm-smiley-emoticon.gif)
(लोका सांगे तत्वज्ञान... ची आठवण आली. पण वाद
नको म्हणून ते सांगणार नाही. ;) :) )
10 May 2017 - 3:10 pm | दशानन
ते जग प्रसिद्ध वाक्य माझेच होते.
दहा तोंडे असून देखील,
आपला नम्र,
दशानन
10 May 2017 - 3:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
खुद्द स्वघोषित स्वामींनी ते वाक्य इथे लिहिलेले असल्याने, ते जगाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत अजून दुसर्या कोणाचे होऊच्च शकत नाही... अगदी स्वामिने त्याविरुद्ध कर्म केले तरीसुद्धा ! काय समजलात ;) :)
10 May 2017 - 3:58 pm | संजय क्षीरसागर
ढेरेंना दिलेला प्रतिसाद वाचावा. शक्यतो मुद्याला धरुन बोललात तर चर्चेतून काही तरी निष्पन्न होईल. भाषा आणि चित्रकला यातला किमान फरकच समजत नसेल तर पुढे काही बोलणंच संपलं!
10 May 2017 - 4:20 pm | दशानन
एक आगाऊ प्रश्न "तुम्हाला समजत नाही असा विषय कुठला?"
11 May 2017 - 8:45 pm | कुटस्थ
हाहाहा ! हा प्रश्न वाचुन Big Bang Theory मधल्या Sheldon Cooper ची आठवण झाली :)
10 May 2017 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
संक्षी किती हसवणार आता ?! पोट दुखायला लागलं =)) =)) =))
आता तुम्ही काहीएक म्हटले म्हणजे तुम्ही इतर काही मानणार नाहीच. तरीही समजतंय का ते पहा...
मुद्दा असा आहे : जसे, तुमच्या मते, इथे भाषांतरावर टीका करण्यासाठी भाषांतराचे कौशल्य आवश्यक आहे, त्याच नियमाने तिथे चित्रावर टीका करायला चित्रकलेचे प्राविण्य असणे जरूर असायला हवे, नाही का ?
मात्र, "या जगात, तुम्हाला वेगळे नियम असतात आणि बाकी सर्व ब्रम्हांडाला वेगळे नियम असतात", असे काही तुम्हाला वाटत असेल तर मात्र गोष्ट वेगळी... आणि उपायही वेगळे असतील.
7 May 2017 - 9:33 pm | मूकवाचक
Here lies one who spared neither man nor God;
Waste not your tears on him, he was a sod;
Writing nasty things he regarded as great fun;
Thank the Lord he is dead, this son of a gun
स्पष्टपणे वाभाडे काढताना ज्याने ना माणसाला मोकळे सोडले ना ईश्वराला, तो आज इथे मृत्युच्या कुशीत विसावला आहे
तुमच्या अमूल्य आसवांची त्याच्यासाठी नासाडी करू नका, तो सगळ्यांना अप्रिय असण्यातच धन्यता मानणारा महाभाग होता
प्रक्षोभक गोष्टी लिहीणे ही त्याच्या लेखी एक भन्नाट मौजेची बाब होती
अशा भंपक कलंदराला शेवटी मृत्युने गाठले याबद्दल ईश्वराला मनोमन धन्यवाद द्या ...
7 May 2017 - 9:41 pm | सतिश गावडे
सुरेख जमला आहे भावानुवाद !!
7 May 2017 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
यातला "भंपक" या एका शब्दाचा अपवाद सोडता भावानुवाद उत्तम जमला आहे.
Son of a gun हा वाक्प्रचार कमीपणा दाखविण्यासाठी किंवा अपमानास्पद पद्धतिने न वापरता काहिश्या कौतुकानेच वापरला जातो.
Son of a gun is an exclamation or a noun in American and British English. It can be used encouragingly or to compliment, as in "You son of a gun, you did it!"
7 May 2017 - 10:17 pm | मोदक
जम्या जम्या..
7 May 2017 - 10:22 pm | मितान
हे मस्त जमलंय !!! खुशवंत सिंग मराठी बोलणारे असते तर ते असंच काहीसं बोलले असते !
8 May 2017 - 6:25 am | अभिजीत अवलिया
वा !!! याला म्हणायचा अनुवाद.
7 May 2017 - 10:29 pm | सुबोध खरे
एक वेगळा विचार
खुशवंत सिंह यांनी लिहिलेल्या पहिल्या चारहि मुद्द्यांची तुमचे नशीब अतिशय चांगले असणे आवश्यक आहे.
याबद्दल त्यांचे स्वतःचे नशीब चांगले होते म्हणून ठीक आहे.
गणपत वाणी बिडी बापुडा पिता पिताना मरून गेला असेच बहुसंख्य व्यक्तींचे होते.
बाकी सहा गोष्टी त्यांनी स्वतः किती पाळल्या याबद्दल शंकाच आहे.
अवांतर -- त्यांचे लेखन चांगले होते.
आपण मिठाई खावी
कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये
श्री व्यंकटेश माडगूळकर (१९४६)
7 May 2017 - 10:31 pm | संदीप डांगे
Here lies one who spared neither man nor God;
Waste not your tears on him, he was a sod;
Writing nasty things he regarded as great fun;
Thank the Lord he is dead, this son of a gun
इथं पहुडलाय तो, ज्याने ना माणसाला सोडले ना देवाला;
तुमची आसवं ह्याच्यासाठी नका गाळू, हा एक हरामी साला.
त्रासदायक लिहिणं ह्याला वाटे लय भारीच मजेचं;
उपकार माना देवाचे, मेलंय आता हे कार्टं शिंदळीचं
(थोडासा यमकहरामीपणा)
8 May 2017 - 9:30 am | कंजूस
हेच बरोबर.
sod चा अनुवाद शक्य नाही तो शिंदळमधून बराचसा जमलाय. मुळात लैंगिकतेचे निरनिराळे उटपटांग प्रकार भूमध्य समुद्राच्या आसपास फारच प्रचलित होते ते तिकडच्या लोकांकडून इकडे भरतवर्षा माहित झाले. एवढंच काय ते प्रकार इतके वाढलेले की मोझेसच्या दहा आज्ञांपैकी एक असं करू नका ही आहे. खुशवंतला इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक गटात टाकता येणार नाही कारण ती भाषा पिऊन शिकलाय वाचून लिहून नाही.
8 May 2017 - 12:25 pm | रातराणी
हम्म. हे सगळं वाचताना छान वाटतं, जेव्हा वागायचं असतं तेव्हा विसरतं.
8 May 2017 - 12:43 pm | संजय क्षीरसागर
सदस्यांनी (नेहेमीप्रमाणे), एपिटाफकडे चर्चा वळवली आहे !
तरीही असो, एकेक वाक्य घेऊन अनुवाद पाहू :
१)
Here lies one who spared neither man nor God;
या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही,
(हा अनुवाद तर निर्विवाद आहे कारण खुशवंत नास्तिक तर होतेच पण कधीही आणि कुणाही विरुद्ध रोखठोक लिहायचे)
२)
Waste not your tears on him, he was a sod;
याच्या मृत्यूचा शोक करु नका,
हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता.
(Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots)
त्यामुळे हा अनुवाद सुद्धा एकदम पर्फेक्ट आहे.
तो जमीनीशी इमान (डाऊन टू अर्थनेस) आणि हिरवेपणा (खुशवंत सिंगांचा रोमँटिसिझम) दर्शवतो).
३)
Writing nasty things he regarded as great fun;
प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता.
(nasty चा शब्दशः अर्थ Very bad or unpleasant असला तरी तो इथे अभिप्रेत नाही).
त्यामुळे अनुवाद एकदम यथोचित आहे.
४)
Thank the Lord he is dead, this son of a gun
हा गेला ते देवाचे उपकार आहेत....
हा माणूस बंदुकीची औलाद होता !
इथे मला मूळ शब्द रचनाच इतकी आवडली की मी शब्दश : भाषांतर केलं !
अर्थात त्या शब्दरचनेचा अर्थ असा आहे : usually used as a mild or euphemistic alternative to son of a bitch ; sometimes used interjectionally to express surprise or disappointment.
कुणाला फारच अणखर वाटत असेल तर माझ्याच शैलीत थोडा बदल करतो :
हा गेला ते देवाचे उपकार आहेत....
हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
मला वाटतं एका शब्दानं फारसा गहजब झालेला नाही किंवा जगण्याच्या सूत्रांना तर कदापीही धक्का पोहोचलेला नाही.
8 May 2017 - 1:30 pm | गब्रिएल
(मीमीमी सोडून) अख्ख्या होल दुनिया, तूच्च बेशर्त चूक हाईस. गपचीप चूप्प र्हा. मीच्च न्हेमीच्च ब्ररोब्रच्च आस्तोच्च, म्हाय्त नाय्का ?
8 May 2017 - 2:24 pm | संजय क्षीरसागर
तुम्हाला लिहीता येत नसेल तर त्याचा राग माझ्यावर काढून, तुम्ही स्वतःचच हसं करुन घेतायं.
9 May 2017 - 10:09 pm | गब्रिएल
लिवलेल्य 'तांत्रिकदृष्टीनं किती योग्य आहे' यापरिस (मूळ आर्थाला धक्का न मार्ता) त्येचा आर्थ वाचकान्पर्यंत प्ररभावीपणे पोच्चतो की नाय आन आर्थ काय काय बयाँ कर्तो की नाय हे निकष लै म्हत्वाच्ये हाहेत.
8 May 2017 - 4:34 pm | अमेरिकन त्रिशंकू
गिरे तो भी टांग उपर...
8 May 2017 - 6:28 pm | संजय क्षीरसागर
मुद्दा तुम्ही काढलायं, मी माझ्याबाजूनं स्पष्टीकरण दिलंय. ते गिरे वगैरे नेहेमीचंय.... तुम्ही (किंवा त्या हास्यास्पदवाल्या विदुषी) अनुवाद करु शकतील का ? दोघांपैकी कुणीही एकदा अनुवाद करुन तर पाहा अनुवाद, फार मजा येईल !
8 May 2017 - 5:35 pm | सतिश गावडे
हा अनुवाद तर निर्विवाद आहे
त्यामुळे हा अनुवाद सुद्धा एकदम पर्फेक्ट आहे
त्यामुळे अनुवाद एकदम यथोचित आहे
रच्याकने अणखर आणि आचपेच म्हणजे काय?
हे शब्द कधी ऐकले नाहीत.
8 May 2017 - 1:27 pm | संदीप डांगे
संजयजी, मी तुमच्याइतका व्यासंगी नाही, ज्ञानी तर अजिबात नाही. पण माझ्या कवडीमूल्य आकलनानुसार एपिटाफ हा फार विचारपूर्वक लिहिलेला असतो, त्याच्यातला शब्द आणि शब्द चपखल असतो. त्यात संदर्भ सोडून काहीही नसते. संबंधित माणसाचे सर्व आयुष्य त्या दोन चार ओळीत बसवणे फारच कौशल्याचे व हुशारीचे काम असते. तेव्हा अनुवाद करतांना आपल्या मनाला वाटेल तो संदर्भ आणि तो पर्यायी शब्द घेता येत नसतो. ते मग लॉस्ट इन ट्रान्सलेशन होऊन जातं.
सॉड चा तुमचा अर्थ हिरवळ, जमिनीसे जुडा हुआ आदमी वगैरे म्हणजे एकदम कैच्याकै आहे. उदा: उद्या माझ्या एपिटाफवर "ह्या माणसाने सगळ्यांची वाट लावली" असा वाक्यप्रयोग असेल तर त्याचा अर्थ "ह्या माणसाने सगळ्यांना योग्य मार्गदर्शन केले, योग्य वाटेवर आणले" असा काढल्यासारखे होईल. रोमॅण्टीसिझम, हिरवटपणा म्हणजे अगदी कैच्याकै. साक्षात सिंगसाब वरुन उतरुन खाली आले तरी तुम्ही त्यांनाही हाच अनुवाद बरोबर आहे असे ठणकावून सांगायला कमी करणार नाहीत याची खात्री आहे.
सॉड चा योग्य अर्थ हा त्याच्या आधी कोणते शब्दप्रयोग केले आहेत त्यावरुन सहज कळतो. तो नक्कीच सन्मानदर्शक नाही. शिवाय स्वतःची स्तुती स्वतःच खुशवंतसिंग करत नाहीयेत हे संपूर्ण एपिटाफमध्ये दिसतंय. "याच्यावर अश्रू गाळू नका कारण हा माणूस मातीशी जुळलेला आहे" हा अनुवाद पाहून डोक्यावर हात मारुन घेत असतील सिंगसाहेब. एखाद्या नालायक, हरामी, बदमाश माणसावरच अश्रू गाळू नका असे म्हटले जाते. डाउन टू अर्थ माणसाला सन्मान दिला जातो हे तर अगदी बेसिक आहे. तुमच्यासारख्या परमज्ञानी व्यक्तीस काय सांगावे?
-------------------------
सन ऑफ अ बिच म्हणण्याऐवजी सन ऑफ अ गन हे अंमळ मैत्रीपूर्ण पद्धतीने, आपण मित्राला शिव्या घालतो (आमच्याकडे मित्राला 'काबे भोसडीच्या' - सन ऑफ अ गन सारखेच- असे उद्देशले जाते) तसे म्हटले जाते. त्याला बंदुकीची औलाद वगैरे म्हणणे तर टूमच आहे. प्रत्येक भाषेचे सांस्कृतिक संदर्भ असतात, ते आपल्याला समजतीलच असे नसते. त्यामुळे असे गुगल ट्रान्सलेशन हमखास फसते.
-------------------------
आपली चूक खरोखर झाली असेल तर मान्य करण्यापेक्षा दुसरा मोठेपणा जगात नाही. पहिल्याच फटक्यात समजून उमजून चूक मान्य केली असती तर एवढं कोणी ताणले नसते. पण आता तुम्ही इतके इरेला पेटलात. सगळं हास्यास्पद झालेलं आहे. तुमची चूक उघड झाली आहे. आता प्रतिसादांमधून वेळ वाया घालवू नका अशी माझी मैत्रीपूर्ण विनंती आहे. एखाद्यावेळेस चुकतो माणूस, त्यात काय एवढे मनाला लावून घ्यायचे. इट्स ओके.
धन्यवाद!
8 May 2017 - 1:42 pm | अनुप ढेरे
'सॉड'ला प्रतिशब्द हवा असल्यास गांडु/हरामी हा शब्द वापरावा. मित्राला अशी प्रेमळ हाक अनेकदा मारतात.
8 May 2017 - 2:17 pm | संजय क्षीरसागर
प्रश्न चूक आणि बरोबर असा कुठेय ? काँटेक्स्टचा प्रश्न आहे. एक शब्द जसाच्या तसा अनुवादित केला तो सुद्धा दुरुस्त केलायं इतकंच !
अत्रे हे जवळजवळ खुशवंतजींच्यासारखं मराठी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा हा मृत्यूलेख पाहा :
"उद्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा- हा माणूस मूर्ख असेल,याच्या हातून अनेक चुका झाल्या असतील ; पण हा कृतघ्न मात्र कधीही नव्हता!” - प्रल्हाद केशव अत्रे
याचा अर्थ अत्रे स्वतःला `मूर्ख आणि बावळट' म्हणतात असा अर्थ इथल्या सदस्यांनी काढला (कारण तसेच अनुवाद तुम्ही आणि इतरांनी केलेत!).... तर तो ज्योक होईल. कारण सगळा फोकस
कृतघ्न मात्र कधीही नव्हता
वर आहे.त्यामुळे जसे अत्रे स्वतःला कमी लेखत नाहीत तर `कृतज्ञता' ही वॅल्यू `मूर्ख आणि बावळटाच्या' वर आहे हे सांगतायंत.
तद्वत खुशवंत सिंगांनी स्वतःला कमी लेखलेलं नाही (जे तुम्ही आणि इतर सदस्य डोक्यात धरुन अनुवाद करण्याचा प्रयत्न करतायं), फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातले (समाजाला वाटलेले न्यूनत्व) त्यांना स्वतःच्या `आचपेच न ठेवता बोलणं आणि अक्करमाशेपणापेक्षा' प्रिय होते असंच दर्शवतात.
तस्मात, अनुवाद ती मूळ विचारधारा गृहित धरुन केला आहे.
8 May 2017 - 2:06 pm | उपेक्षित
बर्र काय ठरला मंग ?
8 May 2017 - 4:45 pm | मोदक
मिस लवंगलतिका - बंदुक की आवाज फेम
आणि
मिस्टर खुशवंत सिंग - बंदुक की औलाद फेम...
11 May 2017 - 9:20 pm | उपेक्षित
साला ये प्रतिसाद मैने बघ्याच नय :P :) :P
8 May 2017 - 5:39 pm | इरसाल
सॉड च्या ऐवजी सांड (खुला) असं म्हटलं तर चालुन जावं.
8 May 2017 - 8:06 pm | अभ्या..
जो मझा, पंच आणि चुरचुरीतपणा "बंदुकीची औलाद" ह्या युनिक कन्सेप्टमध्ये होता त्याचा एक शतांशही "अक्करमाश्या" हा शब्द पेलू शकत नाही हे नमूद करु इच्छितो.
8 May 2017 - 8:22 pm | मोदक
लै वेळा सहमत..!!
8 May 2017 - 8:26 pm | संजय क्षीरसागर
पण जनरेट्यापुढे, केवळ त्या एका शब्दापायी वाद नको म्हणून, पर्यायवाची शब्द दिला.
8 May 2017 - 8:12 pm | कंजूस
पुढे चला अन खुशवंतचं बोला.
8 May 2017 - 8:28 pm | संजय क्षीरसागर
हेच सांगतोयं !
9 May 2017 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले
लेख परत एकदा वाचला ! मजा आली !!
७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे .
>>> हे एकदम सत्य आहे , आजवर आमच्या ट्रेकच्या छंदाने आयुष्यत अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत ते आठवले
:)
अवांतर : ह्यावरुन मला ओशो च्या १० कमांडमेन्ट्स ची आठवण झाली :
१.Never obey anyone's command unless it is coming from within you also.
२.There is no God other than life itself.
३.Truth is within you, do not search for it elsewhere.
४.Love is prayer.
५.To become a nothingness is the door to truth. Nothingness itself is the means, the goal and attainment.
६.Life is now and here.
७.Live wakefully.
८.Do not swim—float.
९.Die each moment so that you can be new each moment.
१०.Do not search. That which is, is. Stop and see.
ह्यातील आठ नंबर तर एकदम अफाट आहे !!
11 May 2017 - 1:26 pm | अर्धवटराव
मला तर सगळेच भन्नाट वाटले.
9 May 2017 - 8:58 pm | ट्रेड मार्क
एवढी महान व्यक्ती इथे मिपावर येऊन आपल्याला फुकट ज्ञानामृत पाजत आहे आणि तुम्ही उगाच एक शब्द घेऊन बसलात. नंतर हेच ज्ञान तुम्हाला सरांच्या वेबसाईट वर पैसे भरून घ्यायला लागेल. सरांनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य म्हणजे ब्रम्हवाक्य असतं. त्यातून नसते अर्थ काढायचे नसतात. जरी ते आपल्या धाग्यांचा आशय लक्षात न घेता आपल्या धाग्याचं काश्मीर करत असले तरी ते आपलं भाग्य आहे. त्यांच्या धाग्यांवर येऊन तिथला स्कोअर सेटल करायचा प्रयत्न करू नये. सर स्थलकालातीत आहेत, त्यामुळे हा अनुवाद सरांना प्रत्यक्ष खुशवंतसिंगांनीच सांगितलेला असू शकतो. जो सांगायला त्यांना १ तास लागला असेल तो सरांनी आपल्याला ५ मिनटात समजावून सांगितला आहे, उगाच फाटे फोडून काला(?)पव्यय करू नये. नाहीतर नंतर सरांनी अपमान केल्यावर कांगावा करू नये.
9 May 2017 - 11:24 pm | अभिदेश
काहीही हा ट्रे. मा. ... :-)
10 May 2017 - 12:05 pm | मराठी_माणूस
एका लेखात, छ. शिवाजी महारांजा बद्दल लिहलेले विसरु शकत नाही.
10 May 2017 - 3:52 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही सर्व प्रतिसाद वाचलेत का ते आधी बघा !
१)
sod आणि son of a gun या दोन शब्दांवर आक्षेप होता
अ) पैकी sod चा अर्थ असा आहे : Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots or another piece of thin material. जर sod हा शब्द स्लँग म्हणून वापरला तर त्याचा अर्थ : something or someone considered unpleasant or difficult: ( तो डायरेक्ट `शिवी' म्हणून गणला जात नाही)
मी तो शब्द स्लँग न धरता आहे तसा धरला. त्यामुळे "हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता." हा अनुवाद योग्य आहे. तस्मात, तो विषय संपला.
बाय द वे, सदस्यांनी केलेले `छान अनुवाद' पाहा ! (१) "गवतपट्टा" (२) "तो शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतात. सोडोमाइट वरून आलेला असावी ही शिवी." (हा तुमचा स्वतःचा ज्योक !)
ब) son of a gun हा तिथला स्लँग आहे आणि त्याचा अर्थ असा आहे : Son of a gun is an exclamation or a noun in American and British English. It can be used encouragingly or to compliment, as in "You son of a gun, you did it!" Or may be used sarcastically, as in "You son of a gun, that's not how you do it!"
बोली भाषेतल्या अनौपचारिक शब्दाचा अनुवाद संस्कृतीपरत्वे बदलतो. मी सुरुवातीला केलेली शब्दयोजना जरी खुशवंतसिंगांच्या व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ वर्णन करणारी होती तरी ती अपेक्षित स्लँगला तितकीशी मिळती जुळती नव्हती (त्यात सुमार, धादांत-चूक किंवा हास्यास्पद असं काही वाटणं म्हणजे अनाकलनाची पातळी आहे). तरीही मी ते मान्य करुन लेखात योग्य तो बदल केला.
सदस्य जो अहं चा (नेहेमीचा) उद्घोष लावतायंत तो विनोदी आहे. मी फक्त इतकंच म्हणतोयं की ज्यांना Live चा साधा उच्चार सुद्धा माहिती नाही त्यांनी तो इथे ऐकावा त्यामुळे त्यांना कशाचंही हसू येईल, त्यात काही नवल नाही. पण वर गॅब्रियल यांचा प्रतिसाद आणि इतर सदस्यांचे प्रतिसाद (जे स्वतःला मराठीचा अभिमान आहे वगैरे समजतात) त्यात थोडा तरी फरक असावा. थोडक्यात, प्रश्न सही अनुवादाचा आहे, अहं चा नाही इतपत समज येईल तो सुदीन !
आणि त्याही पुढे जाऊन, लेखातल्या कंटेंटवर चर्चा होऊ शकली तर तो मिपाचा भाग्योदय !
10 May 2017 - 4:24 pm | दशानन
आयला तुम्ही पण विकी पंडित का?
मग चालू द्या! अगदी निवांत!!