काही किस्से असे तसे !!! भाग १

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
6 May 2017 - 8:12 pm

पूर्वी आम्हाला ड्रायविंग ची फार हौस होती . म्हणजे गुजरात , कर्नाटक ,मध्य प्रदेश अश्या ठिकाणी कामासाठी जायचं असेल तर अगदी विमानाचं तिकीट कॅन्सल करून पेट्रोल च्या पैश्यात ते ऍडजेस्ट करून निवांत गाडी चालवत जायचो . (मित्र असताना तर लडाख पर्यंत पण गेलोय )हे एकटा असतानाचं सांगतोय. बाकी खर्च स्वतःचा गाडी चालवताना .पण मजा यायची निरीक्षण करत चालवायला .हॉटेल वैगरे बुक असायचीच कंपनी कडून .
तर एकदा चंद्रपूर च्या पॉवर प्लांट साठी माझ्यावर जबाबदारी आली . म्हणजे बाहेर जायचं परदेशात परत यायचं आठवड्याभरात मग चंद्रपूर ला जायचं .१-२ वेळा नागपूर ला विमानातून उतरून गेलो चंद्रपूर ला . कारण त्यावेळी बाहेरून तिकीट बुक होतं. तर १-२ दा असं झाल्यावर मी इकडेच होतो त्यामुळे आपण गाडी चालवत जाऊ अशी कल्पना डोक्यात आली नेहमीप्रमाणे .२-४ वाऱ्या चंद्रपूर ला एकट्याच्याच झाल्या गाडी चालवत . त्यानंतर एका हायफाय मैत्रिणीने मला सांगितलं कि मला आणि माझ्या ग्रुप ला पण यायचं एकदा .
आनंदवन पाहायला . आम्ही एनजीओ च्या प्रोजेक्ट वर काम करतोय ना सध्या . म्हटलं ये . पुढील वेळेस कळवतो .
वरोऱ्या जवळ आहे आनंदवन . मी ज्या ज्या वेळी चंद्रपूर ला जायचो त्या त्या वेळी आनंदवन मध्ये जाणे आणि ताडोबा ला जाणे हे माझं ठरलेलं असायचं . त्यामुळे आनंदवनात लोकं ओळखत होती काही तेव्हा .
तर मैत्रीण आणि तिचा चमू असे मिळून ३ एनजीओ साठी काम करणारे माझ्यासोबत निघाले .मैत्रिणीच्या आईकडे पिवळ्या दिव्याची गाडी होती त्यामुळे तीच घेऊन जाऊ असा तिचा आग्रह होता .काकी परदेशी अभ्यास दौऱ्यावर होत्या त्यामुळे .मुंबईपासून अर्धा तास चालवल्यावर ती बोर झाली . बोली वरुण आय डोन्ट लाईक टू ड्राइव्ह इन रूरल एरियाज. मग सगळी ८००-९०० किलोमीटर ची जबाबदारी माझ्यावर आली .कारण त्यांच्या चमूत एक मुलगा असून तो अखंड इंग्लिश मध्ये तत्वज्ञान देण्यात बिझी होता . एकंदरीत सामाजिक परिस्थितीवर. मध्येच त्यांनी बियर घेतल्या असं करत आम्ही रात्री पोचलो . सकाळी हॉटेल खाली दिव्याची गाडी पाहून ६ पासून फोन यायला सुरुवात झाले हॉटेल रूम वर .मालक माझ्या ओळखीचा होता . आणि मी एकटाच शुद्धीत होतो कारण मला काम होतं. एनजीओ च्या चमूने रात्रभर बरीच घेतली असल्याने ते काही उठणार नव्हते .
तर फोन आला खान बोल राहा हू .नीचे हॉटेल मै खडा हू .जरा नीचे आ सकते क्या आप . मै मलिक के साथ हि हू .
७ ची वेळ सकाळची त्यात खान म्हणून मला कोणी आठवत नव्हतं चंद्रपुरात . दिव्याची गाडी पहिली त्यामुळे काय प्रॉब्लेम असा काही विचार आला . पण एनजीओ चमू ला उठवून काही फायदा नव्हता .
जड चेहऱ्याने मी खाली गेलो . तर ३०-३२ जण स्वागताला उभे . वडाप आणि प्रायव्हेट बस ह्यांच्याशी असलेला एस टी वाल्यांचा संघर्ष ह्यावर निवेदन घेऊन आलेले . सगळ्यांनी सह्या वैग्रे केलेल्या .मला काहीच सुचेना त्या वेळी . बरं मैत्रिणीला बोलावलं तर व्हॉट इज वडाप(रिक्षा एक प्रकारच्या ) शो मी असं वैग्रे बोलून खान कपाळावर हात मारून घ्यायचा . त्यामुळे १५ मिनिटे मी चर्चा केली निवेदन स्वीकारलं त्याचा फोटो पण काढला त्यांनी . मी अगदी ग्वाही दिली कि ह्या प्रश्नावर विचार करू .तर अश्या रीतीने माझी ह्या प्रश्नापासून सुटका झाली .
मग माझं काम वैगरे आटपून मी १-२ च्या आसपास परतलो . त्यावेळी फ्रेश झालेल्या लोकांना आनंदवन पाहायचे होते . आनंदवनात त्यांच्या उत्साहाला उधाण आलं . अमर्याद फोटो काढले . पार प्राण्यांपासून ते माणसांचे .अखंड इंग्लिश चर्चा चालू . जे मूळ पाहायचं विचार, करायचा तो सोडून सगळं चालू होतं. माझ्या डोक्यात तिडीक जात होती पण ओळखीचे स्वयंसेवक सोबत असल्याने मी गप्प होतो . मजेच्या वेळी मजा आणि कामाच्या वेळी काम असा किमान त्या एनजीओ ग्रुप मध्ये माझी एकट्याचीच भूमिका होती .
पण ह्यांना सांगून काही फायदा नव्हता .नंतर एका समोरून येणाऱ्या माणसाला त्यांच्यापैकी अजून एकीने रिक्वेस्ट केली कि आमचा एकत्र फोटो काढा . वास्तविक स्वयंसेवक सोबत होते त्यांना विचारता आलं असत .पण सगळे सोबत असा छान फोटो तिला हवा होता . दुर्दैवाने ज्यांना विचारलं ते कुष्ठरोगी होते. म्हणजे अशीच काही गैरसमजुतीमुळे नीट जीवन जगू शकत नसलेली लोकंच असतात तिकडे . त्या माणसाने हात दाखवला .जिने विचारलं ती ओके बोलून पुढे गेली . मी त्यांना माफ करा बोलो आणि असच ५ मिनिट गप्पा मारल्या . त्यांनाही ह्यात काही विशेष जाणवलं नाही बहुधा असे पर्यटक येतात हि सवय असावी .
पुढे जाऊन मी खूप चिडलो मैत्रिणीवर . तिने माफी वैगरे मागितली . पण तेव्हापासून चंद्रपूर म्हटलं कि शरम वाटते .
यथावकाश त्यांची स्टोरी आंतरराष्ट्रीय मॅगझीन ने कव्हर केली . त्यांचा आनंदात मला फोन आला . पार्टी करते बोली .मी नको बिझी आहे बोलो .
(पुढचा एक ईशान्य भारतात ला किस्सा ).
आसाम ला होतो. काम चालू होतं. एक निनावी फोन आला . इंडियन ऑइल कडून त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट हवं होतं. अगदी छोटुसे . जे काम मी करूही शकणार नव्हतो . माझी काय ती लेव्हल नाही .कुठून कोण जाणे त्याला नंबर मिळाला आणि खोदकाम म्हणजे केबल टाकणे .आणि तेल शोधणे ह्याचा एकच संबंध आहे असे त्याला वाटत होते. नाही दिलं तर तुमचं काम थांबवू आणि तुम्हाला पण काहीतरी करू अश्या धमक्या .मी खूप समजावलं बाबारे त्या कंपनीशी माझा नाहीये संबंध . आणि मी त्या लेव्हल चा तर मुळीच नाही कॉन्ट्रॅक्ट वैग्रे देण्याच्या आता .
खूप रागावला गेस्ट हाऊस वर येतो बोला रात्री .
मी चूप १० हजार रेडी ठेवले पाकिटात . त्याला ३० एक लाखाच्या कॉन्ट्रॅक्ट ची गरज होती .
१० हजार घेतले . माझ्यासोबत प्यायला .अजून कोणालातरी आणलेलं त्याला ह्यांना म्हणजे मला उद्या लोकल जेवण दे अशी सूचना केली .आनंदाने गेला .
आज चांगला मित्र आहे आणि राजकारणात फार ऍक्टिव्ह आहे .आसामला .

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2017 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक आहेत किस्से ! अजून लिहा.

तुमच्या पोतडीतले अजून किस्से येऊ द्या.

पैसा's picture

6 May 2017 - 9:39 pm | पैसा

एकाहून एक भारी किस्से!

Ranapratap's picture

6 May 2017 - 9:45 pm | Ranapratap

येऊ धा अजून काही किस्से, साईट वर काम करायला मजा येते.

रोचक किस्से. पहिला किस्सा वाचून त्या तथाकथित एनजीओबद्दल संतापाची तिडीक दाटून आली मस्तकात. दुसरा किस्सा नीट कळला नाही.

अजून येऊ द्यात.

कुंदन's picture

6 May 2017 - 11:25 pm | कुंदन

>> आणि तुम्हाला पण काहीतरी करू अश्या धमक्या .

आता दुसरा किस्सा कळायला सोपे जाईल...

कुंदन's picture

6 May 2017 - 11:17 pm | कुंदन

लेख आवडला.

अवांतर : हा आय डी कोणी हॅक केला बे ?

वरुण मोहिते's picture

7 May 2017 - 3:31 pm | वरुण मोहिते

प्रोत्साहनच देत नाही नवोदितांना . टोमणे मारून .

जव्हेरगंज's picture

7 May 2017 - 10:05 am | जव्हेरगंज

भारी आहेत किस्से!!!

संजय पाटिल's picture

7 May 2017 - 12:08 pm | संजय पाटिल

भाग १

पुभाप्र!

दुर्गविहारी's picture

7 May 2017 - 2:06 pm | दुर्गविहारी

वरुण भाउ लई भारी. लवकर पुढचा भाग टाका.

राघवेंद्र's picture

7 May 2017 - 5:23 pm | राघवेंद्र

वरूण भाऊ एकदम सही आहे हे किस्से !!!

पु. भा. प्र .

प्रमोद देर्देकर's picture

15 May 2017 - 8:15 am | प्रमोद देर्देकर

तुमचे किस्से समजत नाही. बोला / बोली . हे जरा वाचताना अडखळंत.
शेवटच्या किश्य्यात मी चूप १० हजार रेडी ठेवले पाकिटात . त्याला ३० एक लाखाच्या कॉन्ट्रॅक्ट ची गरज होती .
१० हजार घेतले . माझ्यासोबत प्यायला , भाषा अशी अर्धवट सोडू नका राव, काही कळतंच नाही.

तुम्ही १० हजार पाकिटात ठेवले ते त्याला द्यायला की मग तुम्ही घेतले की त्याने घेतले ते स्पष्ट कळत नाही.

diggi12's picture

29 Jun 2019 - 1:32 am | diggi12

Dance baar series complete kara plz

नाखु's picture

2 Jul 2019 - 8:14 pm | नाखु

पुढचे भाग कुठे आहेत का