मारती तुकाराम भोईर
वय २७, रंग काला ,कडक हड्डी, बेरकी,
गूनईशेश : पक्का बेवडा
स्कील्स : अख्खा खंबा मारून ताट उबा रहानार
माजा चुलतभाउ. अंगात रगत कमी दारु जास्त. आज्याचीच देन आनी म्हुन आज्याचा लारका.
आज्यान ल्हानपनापासन बरोबर न्हेल्ता. आज्या टाईट झाल्याव उरलेली हा संपवाचा.
पन पक्का हजरजबाबी.यकदा क बोलाय लागला क आयकाचा न्हाई. कूनालाबी आरवा करनार.
यकदा सरपंचान त्याला समझवला व्हता "बाबा नूस्ता दारू पीवुन घरान परून रहातस जरा घरभायेर पड
मंग समझल दुनया क हाय ती" तर हा म्हन्ला
"सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला"
तर असा हा मारत्या
रोज दारु पीउन येनार न घरात तरास देनार. घरची सगली कंटालली बोल
ह्येचा क कराचा. ह्याची दारु कशी सोरवाची ? सगला लफराच झाला व्हता
येवड्यान खबर मिल्ली क बाजूचे गावान येका सादुबुवान आश्रम खोललाय (कंपनी खोलतान तसा?)
आनी सगल्यांची दारू बी सोरवतो त्यो. मंग काय सगल्यांनी ठरवला क मारत्याला सादुबुवाकड न्हेवाचा. माजे बा न जीम्मेदारी झेतली
न येके दीशी दोगव सादुबुवाकड नींगाले. रस्त्यावरच गूत्ता. मारत्या म्हनाला " काकूस उद्यापासन माजी दारू सूटनार. आज शेवटची पीवन झेवदे." रडाय लागला. तसा बा पातल झाला
"जा पोरा जा आज काय ता करुन झे."
मारत्या सूसाट गुत्त्यावर.धा मिन्टात टाईट.
दोगव आश्रमात पोचले.
मारत्या हालेडूले.
आरती झाली. समोर आरतीच ताट आल. मारत्यान ताटावरशी हात फिरवला तरी आरती वाला उबाच.
"क हाय र बाल्या ? " मारत्यान ईचारला
"दोन रूपए टाका आरतीत." मारत्यान बा कड बगीतल. बा म्हन्ला "अरे टाकाव लागतान. नेमच हाय तसा"
मारत्या भिरभिरला. पाकीटातून शंबराची नोट काडली घडी करून चीमटीत धरली आनी जूगारात शो द्याला उडीवतान तशी ताटान ऊडवली
"पूरे म्हैन्याचे झे. नंतर मागाचे नाय क बोल्तो ?"
आरतीवाला चीप मागारी गेला
सादुबुवाकड नंबर आला
"म्हाराज ह्याची दारू सोरवा. उपकार व्हतील" बा
"बाला जवल ये"
मारत्या सादुबुवाजवल गेला न तेला जांबई आली . सगला वास म्हाराजांचे तोंडाव
म्हाराज धा मिन्ट समाधीत
म्हाराज समाधीतून भायेर आले न काशाला म्हन्ले "हयाला पंदरा दीवस आश्रमात ठीवा. ह्याची दारु सोडाला जरा येल लागल"
मी पंदरा दीवसांनी येतो म्हाराज" बा घरी नीगुन आला
दुसरे दिवशी सकाली म्हाराजांनी मारत्याला बोलवला.
"बस. अरे दारू वाईट आस्ती. दारुनी लोकाचा आयुक्श बरबाद होत. तू आद्यात्मात रस घे, ध्यान कर, त्यानी तुज आयुश्य उजळुन निघेल."
"म्हाराज मना सांगा ध्यान करने चांगल कशावरून ?" मारत्या
"बाला मी ध्यानाचा अनूभव घेतलाय. स्व अनुभवानी सांगतोय." म्हाराज
"मंग दारूचा अनूभव न झेता कस सांगताव दारू वाईट म्हुन ? ध्यानात न दारूत कायव फरक नाय." मारत्या
"अरे ध्यान करून तू देवाशी संवाद साधतोस."
"दारुन पन. डायरेक कोन्ट्याक"
"ध्यानाने संसारात विरक्ती येते"
"दारुन पन. कायव ग्वाड लागत नाय"
"ध्यानाने लोभ, मत्सर ई. विकार दूर होतात"
"दारुन पन. मना दारू मिल्ली क मंग काय बी नको अस्त."
"ध्यानाने माणूस सत्याकडे जातो"
"दारुन पन. येकदा क दारू पोटान गेली क कोनीबी खोट बोलूच शकत नाय. पन मी क म्हन्तो तूमी आदी दारू पीवून बगा मंग सांगा. मी सोरतो."
"आस म्हनतोस ? ठीक आहे. तू घेऊन ये. मी अनूभव घेतो न मग सांगतो."
मारत्यान खीशातन चपटी कारली.
"मना म्हाईत व्हत, झेउनच आलुय."
म्हाराजांनी येक घोट झेतला न जोरात ठसका लागला.
हलू हलू. चन घ्या
म्हाराजांनी चने खाल्ले. "हूश.. बर वाटल" म्हाराज
आवो चन आस नाय खाच , यक चना तोंडान टाकाचा न साल पायाजवल थुकाचा.
प्रोसीजर शीकता शीकता म्हाराजांनी चपटी संपवली.
"आगदी सरगात गेल्यावानी वाटतय रे. उद्या पन अनूभव घेईन म्हणतो."
...
...
...
पंदरा दीवसांनी बा आश्रमात शीरला. नीस्ता दारूचा भपकारा. डावे सायटीला भक्त मंडली भट्टी लावन्यात जूडली व्हती न आतले खोलीन मारत्या आनी म्हाराज गल्यात गला घालून
डायरेक हॉटलाईनवर देवासंग काय बाय बरळत व्हते.
प्रतिक्रिया
9 Oct 2008 - 6:06 pm | यशोधरा
=))
9 Oct 2008 - 7:04 pm | टारझन
>> =))
असेच हसतो ... क बाला क लिवलाय ... जबरान... समझवला पग बाबाला तुझ्या मारत्यान्
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
13 Oct 2008 - 5:32 pm | नंदन
=)) - असेच हसतो
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
9 Oct 2008 - 6:07 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ठार मेलो.
9 Oct 2008 - 6:11 pm | बिपिन कार्यकर्ते
रे बाला....
मी फक्त लेखाचे नाव आणि लेखकाचे नाव वाचून हसतोय.... आता वाचून मग दुसरा प्रतिसाद देतो.
बिपिन.
9 Oct 2008 - 6:15 pm | अनामिक
लै भारी!!
हान तिज्या **ला!!!
=)) =)) =))
9 Oct 2008 - 6:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कं रे बाला, तू तर येकदम भारी लिवला. म्या आरवा परुन हासत व्हतो!
10 Oct 2008 - 10:23 pm | इनोबा म्हणे
हसून हसून येरा जालो. =))
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 Oct 2008 - 6:17 pm | शितल
=)) =)) =)) =))
हसुन हसुन पार वेडे व्हायची पाळी आली.
मस्त लिहिले आहे. :)
9 Oct 2008 - 6:19 pm | बिपिन कार्यकर्ते
कं लिवतो, कं लिवतो रे तू बाला... हासून हासून मेलो बोल.
हासून हासून सुपरा साफ जाला माजा...
बिपिन.
10 Oct 2008 - 1:06 am | संदीप चित्रे
मस्तच आहे लेख :)
अजून हसतोय.
>> म्हाराज धा मिन्ट समाधीत
काय एकेक नमुने काढले आहेत राव :)
9 Oct 2008 - 6:24 pm | येडा खवीस
येवड्यान खबर मिल्ली क बाजूचे गावान येका सादुबुवान आश्रम खोललाय (कंपनी खोलतान तसा?)
...ग्रेट ग्रेट... =))
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
9 Oct 2008 - 6:25 pm | ऋषिकेश
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
मस्त मजा आली.. लय भारी!!!!!!!
-( =)) ) ऋषिकेश
9 Oct 2008 - 7:45 pm | चतुरंग
एकदम पहिल्या धारेचं लिवलय रे बाला! =)) =))
वाचलं आन एकदम शीमोल्लंघनच झालं बग!!
चतुरंग
9 Oct 2008 - 6:26 pm | प्रमोद देव
लई झ्याक!
9 Oct 2008 - 6:29 pm | छोटा डॉन
हसुन हसुन मेलो बॉ !!!
ज ह ब ह र्या .....
=)) =)) =))
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
9 Oct 2008 - 6:44 pm | baba
काय मस्त लिवल रे बाल्या.. :)
....बाबा
9 Oct 2008 - 8:05 pm | संजय अभ्यंकर
लै भारी!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
10 Oct 2008 - 2:47 am | प्राजु
आई ग्गं!!
एकदम सह्ही!!! खूप हसले..
मजा आली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Oct 2008 - 8:46 pm | गणपा
खल्लास.....
द. मांच्या व्यंकूची शिकवणी आठवली.
-गणपा.
9 Oct 2008 - 9:02 pm | मन
खाली हसुन हसुन ................
जबरा रे...
आपलाच,
मनोबा
9 Oct 2008 - 10:20 pm | भाग्यश्री
खूप सही!! :)))
9 Oct 2008 - 11:20 pm | धनंजय
तळिराम खुश झाला.
9 Oct 2008 - 11:44 pm | विसोबा खेचर
रं बाला, मार्त्याची ष्टोरी लै भारी बोल..!
रोज संध्याकाली एक चपटी मारली की आद्यात्मिक अणुभव येतो बोल! कं बोल्तो? :)
अजून जाम लेख लिव. माज्याकरून रोज तुला एक चपटी बोल..:)
(रॉयलस्टॅगचा चपटीप्रेमी) तात्या,
अंजूर फाटा.
10 Oct 2008 - 12:16 am | मुक्तसुनीत
खि खि खि .... माणसाला रोग होतो तसा इथे अध्यात्माला मारत्या झालाय ! ;-)
मजा आली !
ही भाषा कुठली हो ? मालवणी ? कोकणी ? भन्नाट आहे !
10 Oct 2008 - 1:17 am | विसोबा खेचर
ही भाषा कुठली हो ? मालवणी ? कोकणी ? भन्नाट आहे !
ही आगरी भाषा आहे! :)
आपला,
(मुंब्र्याच्या खाडीतनं रेती चोरणारा) तात्या.
10 Oct 2008 - 3:15 am | पिवळा डांबिस
ही ठाणे जिल्ह्यातल्या भूमीपुत्रांची भाषा आहे.
बाकी बाल्या, झकास चाल्लांव! लय भारी!!
तू चालूंदे..
:)
तुजा,
(मुंब्र्याच्या खाडीतील भट्टीची पिणारा)
डांबिसदादूस
10 Oct 2008 - 4:43 pm | विसोबा खेचर
मुंब्र्याच्या खाडीतील भट्टीची पिणारा
हा हा हा! सह्ही रे डांबिसा... :)
आपला,
(गावठी दारूचे फुगे पुरवणारा) तात्या मोकल.
10 Oct 2008 - 2:29 am | सुक्या
गावाकडंच्या दारुचा असरच असा असतोय बगा. पयल्या धारंची मारली की समदे लायनी वर येत्यात. साधुम्हाराज पन आला ना लायनीवर? बाकी मारत्या म्हंजी लै ड्यांजर बेनं दिस्तय. आमच्या गावात पाठवा आवशीक त्येला. गावचं मास्तुर लई दारुबंदी दारुबंदी करतयं. मारत्या ची भेट घालुन देतु म्हंजी आमच्या गावचं मास्तुर बी सुधरन.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
10 Oct 2008 - 4:43 am | बेसनलाडू
यऽ भारी!
(वाचक)बेसनलाडू
10 Oct 2008 - 4:43 am | मदनबाण
का रं बाला काय मस्त लिवलास तु...:)
(आगरी दोस्त)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
10 Oct 2008 - 7:52 am | झकासराव
=))
र बाला तु क भारी लिवलास रं.
एकदम व्यंकुची शिकवणी आठवली. :)
<<वय २७, रंग काला ,कडक हड्डी, बेरकी,
गूनईशेश : पक्का बेवडा
स्कील्स : अख्खा खंबा मारून ताट उबा रहानार>>> =))
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
10 Oct 2008 - 8:06 am | अनिल हटेला
डायरेक हॉटलाईनवर देवासंग काय बाय बरळत व्हते.
सही !!!
मार्त्याची स्टोरी लै भारी बे !!!
हसून हसून दमलो !!!!
येउ देत अजुन पण !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
10 Oct 2008 - 8:43 am | सहज
मिथुनदाच्या छोट्या रंजक स्टोरी आवडतात. :-)
आता पुढे कोन्ते भोइर येणार बरे?
पुढचा भाग लवकर येउ द्या.
13 Oct 2008 - 12:12 pm | ब्रिटिश
नीस्ते भोईर खानदान नाय, आक्का खारपाडाच आनतो बोल
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
10 Oct 2008 - 8:55 am | प्रकाश घाटपांडे
आमच्याकं अशे बेवडे असत्यात. मला आमचा पोलीस शिपाई शेवाळे आठवला. आन बाबा म्हंजे सिंहगडाजवळील डोणज्याचा दारु सोडवणारा बाबा.
"काय शेवाळे काय म्हंतोय तुमचा बाबा"
"चाललाय त्येचा ट्राय"
[काही दिवसांनी]
"काय रे काय माळ घातली का नाई आता"
"कसली माळ"
"आरे सुटलि का नाई"
"क्वाँची"
"म्हन्जे"
"आमची सुटतीय व्हय मेजर"
"मग केल काय"
"आता बाबाच आमच्यात हाय"
प्रकाश घाटपांडे
10 Oct 2008 - 9:24 am | ऋचा
रं बाला तु काय भारी लिवतो रे... =))
हासुन हासुन वाट लागली नारे =)) =))
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
10 Oct 2008 - 11:35 am | विजुभाऊ
अध्यात्मीक गुरु
की मद्यात्मीक गुरु? =)) =)) =))
जै गुरुदेवा रं बाला
10 Oct 2008 - 7:17 pm | ब्रिटिश
>>मद्यात्मीक गुरु?
शॉलेट
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
11 Oct 2008 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै जोरदार लिव्हतोस !!! हहपुवा झाली. :)
11 Oct 2008 - 6:25 pm | भोचक
बाला, तू तर कल्ला केला
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
13 Oct 2008 - 12:39 pm | धमाल मुलगा
च्यामायला...
भर हापिसात ह्या मिथुननं लिहिलेलं आजिबात वाचायचं नाही असं ठरवूनही परत तीच चुक केली!
_/\_
द्येवा म्हाराजा...
तुजं पाय कुटायत रं? जरा फ्याक्स कर रे बाबा..
आयला, काय लिवलंय, काय लिवलंय! सक्काळसक्काळ भांगेची डब्बल गोळी लावून वर रबडी-जिलबी खाऊन आल्यासारखा नुसता खदाखदा हसत होतो रे हापिसात. लोकांना वाटलं 'ह्याला हिस्टेरिया झाला!' एका दोस्तानं तर सगळे बघतायत म्हणुन माझं तोंड दाबून ठेवलं...च्यायची पिडा, लिहितो का गंमत करतो रे भाऊ?
शॉल्लेट्ट!!!!
आन्, जल्ला सगला खारपाडा आन् तू! आमाला पन भेटव सगल्यांशी, बोल
14 Oct 2008 - 12:15 am | भडकमकर मास्तर
लै बेष्ट...
ती आधी एक सिगरेट की विडीची गोष्ट पण मस्त होती....
...
अजून येउद्यात बरंका गोष्टी असल्या....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
31 Dec 2008 - 4:52 am | भास्कर केन्डे
तर हा म्हन्ला "सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला"
=)) =))
पाकीटातून शंबराची नोट काडली घडी करून चीमटीत धरली आनी जूगारात शो द्याला उडीवतान तशी ताटान ऊडवली
"पूरे म्हैन्याचे झे. नंतर मागाचे नाय क बोल्तो ?"
पुरे पुरे.
सादुमहाराजांचे मारत्या सोबतचे संभाषण मस्तच रंगवले आहे. हसून हसून आतडे दुखायला लागले.
प्रोसीजर शीकता शीकता म्हाराजांनी चपटी संपवली.
=)) =))
पंदरा दीवसांनी बा आश्रमात शीरला. नीस्ता दारूचा भपकारा. डावे सायटीला भक्त मंडली भट्टी लावन्यात जूडली व्हती न आतले खोलीन मारत्या आनी म्हाराज गल्यात गला घालून
डायरेक हॉटलाईनवर देवासंग काय बाय बरळत व्हते.
आपन खल्लास... _/\_
आपला,
(पंखा) भास्कर
22 Jan 2016 - 5:23 pm | होबासराव
;)
22 Jan 2016 - 6:22 pm | चौथा कोनाडा
झक्कास !
23 Jan 2016 - 1:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ब्रिटीश दादूसचं सगळंच लेखन मजेशीर आहे.
23 Jan 2016 - 8:33 am | कविता१९७८
मस्त
23 Jan 2016 - 9:29 am | मनीषा
भलतेच आध्यात्मिक ... :)
28 Jan 2016 - 5:24 pm | विनू
दादूस जाम भारी बोल......
28 Jan 2016 - 5:29 pm | विनू
भाषा त आमचे उरण सारी वाट्त
25 Feb 2016 - 6:17 pm | होबासराव
गूनईशेश : पक्का बेवडा
स्कील्स : अख्खा खंबा मारून ताट उबा रहानार
25 Feb 2016 - 6:52 pm | विजुभाऊ
र बाला.इक्ता हशीवलास यकदम आरवा झालो ना मीया
26 Feb 2016 - 3:39 am | भरत्_पलुसकर
क लिव्लय क लिव्लय!
26 Feb 2016 - 10:22 am | अदि
झालं हा धागा वर काढला ते. मराठी भाषा दिनानिमित्ताने जी लेखमाला सुरु आहे, त्यात आगरी भाषेतून लेख नाही आहे.