चारू-वाक १

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 11:52 am

निद्रेपरी ना निद्रा, जागेपणी ना जाग
मनास अशांत जुंपणे, कोण हा अभाग \\१\\

शक्यतेचा थांबवून शोध, मनास नुसती गवसणी
मिळेल कोणसी माया, ना केलीस जरी मागणी \\२\\

ना करिसी, परी आपले बरे करिसी
शक्य तरी शांती सूख पाविसी \\३\\

चाराचे होता एक गूण, पाहसी डोळ्यात डोळे दोन
हरवले जरा पाहुणेपण, भेदास सार्‍या हरवून \\४\\

मधूर ते मिष्ठान्न , लोभ घेता मेळवून
क्षोभ टाकावा झाकून, होतसे शांत चित्त मन \\५\\

नको करूस हाव, परी हवी संपन्नतेसी धावे
ज्ञान-विज्ञान घेऊन पाव, देशो देशी जावे \\६\\

चारू-वाक २

नावारूपास यावे, आनंदे जगावे,
साजेसे सजवावे, सुखी समाधानी व्हावे \\७\\

जनसागरी कोठे भेद, मेळवावे एकात्मभाव
प्राप्त करावे इप्सित, साधीसी प्रेमभाव \\८\\

अशीच आहे गोष्ट, दृष्टीस भेटवी दृष्ट
आपलेची एकमेका भेट, करु जाणे इष्ट \\९\\

असा करूनी ध्यास, आपलेपणे रहावे
दिवा हाती जपून, रूपे एकाएक मिसळावे \\१०\\

कधी मौन, कधी गुजगोष्टी
जाणून रचनासृष्टी, मिलनात जिवन तुष्टी \\११\\

स्वतःत पाहतो तैसे, दुजा अंतरात पहावे
मिष्ठान्नात रूची जैसे, रूप प्रत्ययास यावे \\१२\\

कविता माझीकालगंगाशांतरसकविता

प्रतिक्रिया

शार्दुल_हातोळकर's picture

18 Apr 2017 - 4:19 pm | शार्दुल_हातोळकर

मस्त !!