जो दिल हारा वोह सब जीता

स्वोन्नती's picture
स्वोन्नती in जनातलं, मनातलं
11 Apr 2017 - 11:47 am

मीं खोल‌ खोल‌ कोस‌ळ‌त‌ अस‌तेवेळी, तुझी भूमिका न‌क्की काय‌ होती? फ‌क्त एक त‌ट‌स्थ ख‌र‌ं त‌र‌ उदासिन प्रेक्ष‌काची की अशा एका मित्राची ज्याला म‌ला ख‌र‌ं पाह‌ता हात देऊन व‌र‌ ओढाय‌चे होते प‌ण त‌से क‌र‌णे ज‌म‌त न‌व्ह‌ते, ब‌घ्याची अस‌हाय भूमिका क‌र‌ण्याप‌लीक‌डे काहीही क‌र‌ता येत‌ न‌व्ह‌ते? की त‌ळ्याच्या काठाव‌र‌ ब‌सून बुड‌णाऱ्याची म‌जा प‌हाण्याचा आसुरी आन‌ंद‌ मिळ‌व‌णाऱ्या सेडिस्ट‌च्या भूमिकेत तू होतास्? म‌ला क‌ळ‌त‌च नाही. तू बोल‌त‌ नाहीस आणि माझ्याक‌डे त‌री कुठे अशी जादूची कांडी आहे की म‌ला तुझ्या म‌नात‌ले ओळ‌ख‌ता यावे? हां क‌दाचित तू अत्य‌ंत‌ उदासीन‌तेने, पॅसिव्ह‌ निर्विकार‌तेने, माझा अध्:पात प‌हात राहीला अस‌शील, या भुमिकेतून की याप‌लीकडे काही क‌र‌ता येणे श‌क्य‌ नाही, माझ्या ह‌ट्टी स्व‌भावासा औष‌ध नाही?
नात्याला किती आयाम‌ असावेत, किती खोली असावी याब‌द्द‌ल‌च्या माझ्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना पुरुन तू उर‌लास म्ह‌णुन आन‌ंद‌ मानावा की मी क‌मी प‌ड‌ले, क‌दाचित‌ मी तुला ते स‌माधान देऊ श‌क‌ले नाही याची ख‌ंत‌ बाळ‌गावी? तू माझ्याव‌र‌ती ख‌र‌च प्रेम‌ केल‌स की मी भ्र‌म‍-आभासांच्या खोट्या मृग‌ज‌ळामागे धाव‌त‌ राहीले? प‌ण मृग‌ज‌ळामागे धाव‌ताना, मृग‌ थ‌क‌तो नाही का रे. थ‌कुन , तोंडाला फेस‌ येऊन धारातीर्थी प‌ड‌तो. माझे त‌र‌ त‌से काहीही झाले नाही. मी न‌व‌न‌वोन्मेषाने ब‌ह‌र‌त राहीले, ज‌णू अमृत‌पान‌च क‌र‌त‌ राहीले. म‌ला ब‌ळ‌च मिळ‌त‌ गेल‌ं. म‌ला न‌वी पाल‌वी फुट‌त‌ राहीली. न‌व्या धुमाऱ्यांनी ही ध‌र‌ती उसास‌त‌च राहीली, न‌वीन रोप‍वेली-फुलांनी शृंगार‌त‌च राहीली? कुठुन आण‌लास हा जीव‌न‌र‌स‌? कुठ‌ला भूमिग‌त‌ पाण‌झ‌रा तुझ्यात‌ आहे, जो प्र‌त्येक‌ वेळी दुप्प‌ट जोमाने म‌ला जीव‌न‌र‌स‌ ब‌हाल‌ क‌र‌त‌ राहीला? प‌ण म‌ग‌ मी पॅरॅसाईट‌ नाही का रे? जी तुझ्यातून ज‌ग‌ण्याचे ब‌ळ‌ घेउन जिजीविषेने फुल‌त‌ राहीली? म‌ला फुल‌व‌णारा तू, कोण‌त्या ऋणानुब‌ंधाने माझ्याशी ज‌ख‌ड‌ला गेलास्? ते ऋण फेड‌त‌ राहीलास्? का म‌ला प्रेम‌ दिल‌स?
प‌क्ष्यांनासुद्धा अक्क‌ल‌ अस‌ते आप‌ल्या मोठ्या झालेल्या पिल्लांना ते खुशाल घ‌र‌ट्याबाहेर‌ हुस‌काऊन‌ लाव‌तात, स्व‌त:च्या ताक‌दीव‌र‌ती अन्न‌ मिळ‌विण्यास भाग‌ पाड‌तात. म‌ला एव‌ढीही अक्क‌ल‌ न‌सावी की ज्या व्य‌क्तीने फ‌क्त प्रेम‌च देऊच केले तिला मुक्त‌ क‌रावे? तिला ज‌ख‌डून‌ ठेऊ न‌ये. प‌ण मी ज‌ख‌ड‌ले तुला की रात्री क‌म‌ळात आप‌ण‌ होऊन ब‌ंदिस्त‌ होणाऱ्या भ्र‌म‌रास‌म‌ तू या प्रेम‌धाग्यांत‌ स्व‌त:ला गुर‌फ‌ट‌वुन घेत‌ गेलास्? असा क‌सा तू पॅसिव्ह‌? का नाही भुंग्याला कुर‌त‌ड‌ता येत क‌म‌ळ, का नाही त्याला मुक्त‌ होता येत? स्वात‌ंत्र्य‌ हे उच्च मूल्य‌ आहे हे निर्विवाद‌ स‌त्य‌ भुंग्याला क‌ळ‌त‌ न‌सेल का? का क‌धी क‌धी जिंक‌ण्यापेक्षा ह‌र‌ण्यात अधिक‌ गोडी.अस‌ते?

इस‌ प्यार‌ की बाझी मे ह‌ंस‌क‌र‌
जो दिल‌ हारा वोह‌ स‌ब‌ जीता,
जो दिल‌ हारा वोह‌ स‌ब‌ जीता.

मी ह‌र‌ले.तू जिंक‌लास यात‌ म‌ला आन‌ंद‌ आहे. पुन्हा क‌धीत‌री खेळात मी जिंकेन आणि तू हारुन‌ जिंक‌. यावेळेस मात्र मी हारुन‌ जिंक‌णार हा यावेळ‌चा निय‌म‌. त‌र्क‌ जिथे चाल‌त‌ नाही, बुद्धी जिथे निकामी होते, एक‌रुप‌ता-स‌म‌र्प‌ण हेच ज्या खेळाचे निय‌म‌ आहेत त्या खेळात हार‍जीत‌ शोध‌ण‌ं केव‌ळ वेडेप‌णा नाही का? ते गाण‌ं आठ‌व‌त‌ं? -

ओ श‌मा मुझे फुंक‌ दे, मै ना मै र‌हूं
तू ना तू र‌हे ,
य‌ही प्यार‌ का है द‌स्तुर‌, य‌ही इष्क‌ का है द‌स्तुर‌

कितीदा मी तुला हे गाणे ऐक‌व‌ले आहे आठ‌व‌ते? आप‌ल्या प्रेमाची हे गाण‌ं सिग्नेच‌र ट्युन‌ आहे. : ) -

आप‌ से प्यार‌ हुआ जाता है, दिल‌ गिर‌फ्तार हुआ जाता है
दिल जो हर क़ैद से घबराता था, घबराता था ख़ुद ही
गिर‌फ्तार हुआ जाता है

ब‌घ‌ गेले ना मी प‌र‌त‌ वाह‌व‌त‌. प‌ण असे वाह‌व‌त‌ जाण्यात ,या प्र‌वाहात क‌मालीचा गोड‌वा आहे. तुझ्याम‌ध्ये विरुन‌ जावेसे वाट‌ते. तुझ्या हृद‌यात क‌म‌ळ ब‌नुन‌ ह‌जारो पाक‌ळ्यांनी उम‌लुन‌ यावेसे वाट‌ते. तुला सुख‌वण्याक‌र‌ता.
https://lh3.googleusercontent.com/uLmGJtlFHOKC02xc8RrI9Q3xfG301gysruATya8sctClQC8dI2xpxiQXassLCi8ef66d25OwCu17f3EBSABx4d4JpFbdZh3xC42GEvg1WgF7PWUFWwTl9lhTdGbn8lZqvsI7ZV-8TyQvFOUpH-lclugMxJNv0Wsmf9nT4Ip_Dbd5Jx7dsU_5EI7BeJ4tDyuKmiY2ioizTepLlVm6gu6sBXvqYng5tn8KLJl9Q670TNNawilSRL04IKz-bh6arPISaC6wOxESWGXpDvvoVDU6ioi3WyByRTh37IffvdmSiD_vZKmj9hiIr2YlNDf2R8fbchBL57XNuDGAgEG_wufEDktU2nFbXYyDxbGVjiKb_Dt6PGRJX2__6_XHVKEWvGQPXSlBgK-wNUxGuAjJI9RSX24E47ZLPC7Gf8Rv3i2s9NiPeOwGbWu6ryQ2r5kntfrkYOanMNIxw-cTqTWzLIQnv48OoG4zCYPzKM_Njoq-UgbD7hVqgtH8RvI0-O4XuA5b_2lF_qKFihotLGVXorQFb6WhDmgOLnR5cs-gL4R8qtQrbEN_P-r3-tA73AK3CQQlAjGhoQrlvLFNNc8XKJvmSbmo3BH1S-FFB81hI3_IMtf3oOACOtR57_kxUmSGIoMJxMbHSpcI3SgaemII-wrE3MIDdf_xznHmus03HtgdEXw=w736-h536-no
.
शेव‌टी हेच‌ ख‌र‌ं -

तुमने क्यों प्यार से देखा मुझको
दर्द बेज़ार हुआ जाता है

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

11 Apr 2017 - 7:54 pm | चौकटराजा

प्रेम हे कौतुकाचे अपत्य असून कौतूक हे प्रेमाचे मूळ आहे असा माझा निष्कर्ष आहे. जिथे कवतिक पैदा होते तिथे प्रेम जन्म घेते. आईला आपले मूल कितीही दुर्गुणी असले तरी त्याबद्द्ल माया असल्याचे आपल्याला दिसते. ते प्रेम नव्हे . प्रेम म्हणजे दुसर्‍याचे गुणी मूल पाहून आपल्याला त्याविषयी आकर्षण उत्पन्न होणे. अशा रीतीने आपण जगात कशावरही प्रेम करतो. एखादे शहर एखादी जागा, एखादा गंध अनेक चीजा. त्यात आपल्या आधी काही तरी मिळालेले असते त्याची दाद म्हणजे प्रेम. आपल्याला अशी दाद देण्याची प्रेरणा मोडून काढणारा महान शत्रू म्हणजे आपला अहंकार. तो मोडून पडला की आपण "दिल" हारला म्हणतो. व जगात दुसर्याचे कौतुक वाटणे यासारखी जीत नाही. म्हणून जो दिल( अहंकार) हारा वो सब जीता.

स्वोन्नती's picture

11 Apr 2017 - 8:31 pm | स्वोन्नती

आपल्याला अशी दाद देण्याची प्रेरणा मोडून काढणारा महान शत्रू म्हणजे आपला अहंकार. तो मोडून पडला की आपण "दिल" हारला म्हणतो. व जगात दुसर्याचे कौतुक वाटणे यासारखी जीत नाही. म्हणून जो दिल( अहंकार) हारा वो सब जीता.

छानच स्पिन दिलात आपण. फार सुंदरशन्ब्दात मांडलत चौराफकापण फक्त दाद दिली नाहीत तर भर घातलीत. हे मुक्तक आपल्या प्रतिसादाने, अधिक समृद्ध केलेत. अनेक आभार.

स्वोन्नती's picture

11 Apr 2017 - 9:30 pm | स्वोन्नती

काका टायपो बद्दल माफ करा :(

पैसा's picture

11 Apr 2017 - 10:50 pm | पैसा

तुमची भाषा छान आहे. लिहीत रहा.

वेल्लाभट's picture

11 Apr 2017 - 11:39 pm | वेल्लाभट

सुरेख लिहिता ! मस्त.

आनंदयात्री's picture

11 Apr 2017 - 11:51 pm | आनंदयात्री

चौकटराजांचा प्रतिसाद आणि तुमचे हे मुक्तक अतिशय आवडले. त्यात दडलेल्या कथेचा शोध घ्यायचाही प्रयत्न केला. असे ललित अजूनही वाचायला आवडेल.

स्वोन्नती's picture

11 Apr 2017 - 11:56 pm | स्वोन्नती

पैसातै, वेल्लाभट आणि आनंदयात्री ॑आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी हुरुप वाढला. खूप आभार.

प्राची अश्विनी's picture

12 Apr 2017 - 8:06 am | प्राची अश्विनी

मुक्तक आवडलं आणि चौरांचा प्रतिसाद सुद्धा.