नमस्कार मिपाकरहो,
'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. यावर्षी स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.
मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी होता. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले गुणांकन ग्राह्य धरले आहे.
आलेल्या गुणांकनातून प्रथम क्रमांक दिलेल्या कथांना ५ गुण दिले आहेत. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांना अनुक्रमे ३ आणि १ असे गुण दिले आहेत. आणि या गुणांकन पद्धतीनुसार प्रथम आलेल्या पाच कथा खालीलप्रमाणे आहेत.
पहिल्या दोन्ही कथांनी मिळवलेल्या समान गुणांमुळे प्रथम क्रमांक विभागून देत आहोत.
प्रथम क्रमांकः आम्ही येतोय (लेखक : अॅस्ट्रोनाट विनय)
प्रथम क्रमांकः ऑक्टोबर- मार्च (लेखक : मराठी कथालेखक)
तृतीय क्रमांकः वेट अ मिनिट! (लेखक : जव्हेरगंज)
चतुर्थ क्रमांकः ईश्वराचा शोधं (लेखक : भृशुंडी)
पाचवा क्रमांकः ईमारत (लेखक : चिनार)
वरील विजेत्या कथांव्यतिरिक्त आलेल्या इतर सर्वच कथा एकापेक्षा एक सरस होत्या, आणि त्या आपण सगळ्यांनी बघितल्याच आहेत. पण स्पर्धा म्हटलं की चुरस, चुरस म्हटलं की विजेतेपद हे सगळं आलंच. त्यामुळे मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक. विजेत्यांना व्यनितून त्यांचं प्रशस्तीपत्रक धाडण्यात येईल.
सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.
प्रतिक्रिया
26 Mar 2017 - 8:10 pm | अॅस्ट्रोनाट विनय
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
26 Mar 2017 - 8:12 pm | तुषार काळभोर
पहिला क्रमांक विभागून दिलाय, म्हणजे जबराट चुरस झाली!
विजेत्यांचे अभिनंदन , मान्यवरांचे आभार , स्पर्धक, आयोजक, वाचक, मतदार या सर्वांचे कौतुक!
26 Mar 2017 - 8:15 pm | वरुण मोहिते
एकापेक्षा एक सरस कथा देण्यासाठी . सर्व विजेत्यांचे .
26 Mar 2017 - 8:16 pm | किसन शिंदे
सर्व विजेत्यांचे जोरदार अभिनंदन.!!
पहिल्या क्रमांक पटकवलेल्या कथेच्या लेखकाने त्याचे आयडी नाम सार्थ ठरवले हे नमूद करू इच्छितो.
बाकी ठरलेल्या दिवशी निकाल मिपाकरांसमोर आणल्याबद्द संपूर्ण साहित्य संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार!!
26 Mar 2017 - 10:54 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद :)
27 Mar 2017 - 8:20 am | अॅस्ट्रोनाट विनय
>> ही कमेन्ट नेमकी कोणाबद्दल म्हणायची :))
27 Mar 2017 - 2:13 pm | किसन शिंदे
दोन्ही आयडींसाठी :)
26 Mar 2017 - 8:36 pm | पैसा
सर्व विजेते आणि सहभागी लेखकांचे अभिनंदन! अनेक कथा वेगवेगळ्या प्रकारे आवडल्याने कोणाला पहिले क्रमांक द्यावते हे समजले नाही त्यामुळे मतदान केले नाही.
विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!
26 Mar 2017 - 8:58 pm | जव्हेरगंज
जोरदार अभिनंदन!!!!!!
अशा स्पर्धा मिपावर वारंवार होवो. अनेक नवलेखकांच्या कथा वाचण्यात खास मज्जा आली!!
26 Mar 2017 - 9:00 pm | यशोधरा
विजेत्यांचे अभिनंदन!
26 Mar 2017 - 9:27 pm | एस
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेल्या साहित्य संपादकांचे आभार.
26 Mar 2017 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
26 Mar 2017 - 10:25 pm | वेल्लाभट
जबर स्पर्धा; जबर कथा; जबर निकाल
वाह ! मजा आली.
पुढच्या वेळी माझी कथा निकालात चमकेल असा स्वतःलाच विश्वास देतोय :)
26 Mar 2017 - 10:29 pm | संजय क्षीरसागर
माझी कथा (कांचनमृग) सर्वात नीटस बांधलेली वाटली .....पण तिला एकही वोट मिळालं नाही !
याचा अर्थ काय असू शकतो ? हा एक लेखक म्हणून विचार करतोयं.
27 Mar 2017 - 2:32 pm | मोदक
वाईट झाले हो स्वामीजी.
(एक वाचक म्हणून मांडलेले मत.)
27 Mar 2017 - 2:48 pm | आदूबाळ
कदाचित शरीरसौष्ठव या निकषावर वाचकांनी मतं दिली नसावीत.
27 Mar 2017 - 3:05 pm | संजय क्षीरसागर
बट आय मीन, कथेत कोणताही कच्चा दुवा नाही की शेवटात संभ्रम नाही (जी गोष्ट मला इतर कथात जाणवली).
27 Mar 2017 - 3:21 pm | एमी
हा हा हा अहो काळा पैसावाले नोटबंदीच्या कचाट्यातून अलगद सुळकन सुटले; किंबहुना त्यांचा फायदाच झाला अशा गोष्टीला मिपावर मतं कशी मिळतील?? त्याऐवजी काळा पैसावाल्यांचं कसं वाट्टोळ्ळं वाट्टोळ्ळं झालं अशा विशफुल स्वप्नरंजनाला प्रथम क्रमांक मिळतो, मुस्लिम दहशतवाद्यांचा बागुलबुवा उभा करणार्या कथेला तृतिय क्रमांक मिळतो. असो. मक आणि जव्हेरगंज दोघेही मला लेखक म्हणून आवडतात. पण या कथा अजेंडायुक्त आहेत त्यामुळे मी त्यांना मत दिले नाही.
एनीवे भाजपेयी मोदीभक्तांना किंवा इतर कोणत्याच उपप्रतिसादांना उत्तर मिळणार नाही.
बादवे सासं, आता प्रत्येक शशक धागा त्या त्या लेखकाच्या नावे करुन टाकता येइल का?
27 Mar 2017 - 3:49 pm | संजय क्षीरसागर
राजकीय विचारसरणीचा प्रश्न बाजूला ठेवू.
कथाविषय, मांडणी, कल्पना नाविन्य, आशय थेट पोहोचणं या निर्वैयक्तिक निकषांविषयी मी बोलतोयं.
27 Mar 2017 - 6:05 pm | एमी
Ok. May be my bad/goggle. Sorry didnt mean harm.
27 Mar 2017 - 3:21 pm | चिनार
संजयजी अनुमती असल्यास वाचक म्हणून आपल्या कथेवर व्यनीतून प्रतिक्रिया देऊ इच्छितो
27 Mar 2017 - 3:27 pm | संजय क्षीरसागर
पण मला खरंच कुतुहल आहे. कुणी इथे प्रतिसाद दिले तरी हरकत नाही.
27 Mar 2017 - 6:01 pm | यशोधरा
संक्षी, तुमची कथा मला समजली नाही. माझ्या तोकड्या बुद्धीचा दोष असू शकेल. मला फायनान्स विषयात गती नाही आणि आवड नाही त्यामुळे माझ्यासारख्या त्या विषयाबद्दल नावडीमुळे अनभिज्ञ असलेल्या व्यक्तीला लगेच लक्षात येण्यासारखी ती कथा नाही. उत्तम असेल, नाही म्हणत नाही पण बारकाव्यांसकट कळली नाही, तर प्रतिसाद कसा देणार ना? कदाचित हे कारण असू शकेल काही जणांच्या बाबतीत तरी.
27 Mar 2017 - 6:16 pm | किसन शिंदे
एग्जाटली!!
जेव्हा बोर्डावर टाकली तेव्हा वाचली होतीच, पण आताही वर लिंक दिल्यानंतर पुन्हा जाऊन वाचली. पण तरीही शेवटाकडे कळाली नाही. त्यामुळेच कदाचित लोकांची मते पडली नसावीत.
27 Mar 2017 - 9:06 pm | संजय क्षीरसागर
मला ही एक्झॅक्टली हेच वाटलं की मी आशय पोहोचवू शकलो नाही ! कारण निर्णय कायम असला तरी नक्की काय झोल झाला इतकंच जाणून घ्यायचं होतं.
तुम्हा सर्वांची टेक्निकल डिफिकल्टी मान्य आहे पण शशकमधे हे सगळं बसवणं असभंव होतं. एनी वे, तुम्ही सरळपणानं सांगितलंत, सो तुमच्यासाठी हा उलगडा !
इट इज धिस वे :
शेटनी सदाला काही वर्षांपूर्वी ६ लाख कॅश कर्ज दिलंय (हे सगळे व्यावहार विनाकागदपत्राचे आणि रोखीत होतात. शेट इतका पॉवरफुल असतो की घेणारा पलटी मारु शकत नाही). सदा आज कर्ज सव्याज परत करायला १० लाख घेऊन आलायं. निर्चलनीकरण झालं नसतं तर सदा आज संपूर्ण कर्जमुक्त होणार होता. सर्व व्यावहार रोखीतच असल्यानं शेटला सुद्धा अदरवाइज आनंदच होता.
पण सद्य स्थितीत पैसे असूनही सदा मुक्त होऊ शकत नाही आणि शेटलाही समोर आलेल्या लक्ष्मीचा मोह सुटत नाही.... हा प्लॉट आहे !
मग शेट नामी शक्कल लढवतो. तो सदाला पाच पॅनकार्डस आणि त्या व्यक्तींचे साइन्ड ब्लँक चेक्स आणायला सांगतो. सदाला काहीच प्रॉब्लम नसतो कारण ज्यांच्या खात्यात पैसेच नाहीत अशा व्यक्तींचे चेक्स घेऊन शेट काय करणार ?
शेट, सदाचे दहा लाख त्या लोकांच्या खात्यात भरतो. त्यांचे चेक्स सोनाराला देऊन त्यांच्या नांवाच्या पावत्या करुन घेतो (अॅज इफ दे हॅव परचेसड द गोल्ड). थोडक्यात सदाच्या पैश्याचे (बाद नोटा) वॅलीड कागद होतात (सोनाराच्या पावत्या).
आणि शेट सोनाराकडून ....दहा लाखाचं सोनं घेऊन टाकतो !
तर असा हा कांचनमृग !
मग शेट म्हणाला ’ सदा एक काम कर. पाच पॅनकार्डच्या झेरॉक्स आणि त्या लोकांचे चेक घेऊन ये’
दहा दिवसांनी शेटनी सदाला पॅनकार्डवाल्यांच्या नांवच्या सोनाराच्या पावत्या दिल्या.
सदा पाहातच राहीला....
त्याच्या पैशाचे कागद झाले होते.... आणि
शेटनी कचर्याचं सोनं केलं होतं!
27 Mar 2017 - 9:17 pm | यशोधरा
ओके, आभार उलगडल्याबद्दल. हा पंच बिगर फायनान्स वाल्यांना पोचणार नाही.
27 Mar 2017 - 10:36 pm | किसन शिंदे
उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद संक्षी.
27 Mar 2017 - 6:13 pm | प्राची अश्विनी
मला सुद्धा नीट कळली नाही. म्हणून मत दिले नाही.
28 Mar 2017 - 11:41 pm | पिलीयन रायडर
बघा संक्षी.. तुमच्या कथेला मी एकटीने निसंधिग्धपणे आवडली म्हणलंय..
काय म्हणावं ह्या योगाला?! =))
मी मतदान केलं असतं तर तुम्हाला नक्की मत दिलं असतं..
29 Mar 2017 - 12:33 am | संजय क्षीरसागर
विचार विरोधी असले तरी ठाम असले तर कधी ना कधी एकवाक्यता होते !
१) विनयच्या कथेतील शेवटावर, स्त्रुजाचा हा प्रतिसाद
दही सुद्धा लागायची मारामार असं झालं तर !
फार बोलका आहे.२) मकलेंची कथा `बॅड सफर्स बॅडली' स्टाईलची आहे.
३) जंगची कथा मला अजूनही कळली नाही.
४) भृशुंडी काय म्हणतात कुणाला कळलं असेल तर नक्की कळवा.
५) चिनार एंडस ऑन अ पॅथेटिक नोट (आय एम रिअली सॉरी चिनार)
वरच्या मतांचा माझी कथा विजेती न ठरण्याशी सुतराम संबंध नाही.
29 Mar 2017 - 5:03 am | एमी
भृशुंडीची कथा आवडली मला.
५) चिनार एंडस ऑन अ पॅथेटिक नोट (आय एम रिअली सॉरी चिनार) >> यालामात्र +1.
29 Mar 2017 - 2:43 pm | मृत्युन्जय
चालायचच संक्षी. मला तर माझी कथाच सर्वोत्कृष्ट वाटली होती. पण वाचकांना त्यात काही राम दिसलेला दिसत नाही. वाचकांच्या मनोभूमिकेत १००% शिरुन लेखक लिहिता होउ शकला तर मग प्रत्येक लेखकाचे प्रत्येक पुस्तक / लेख सुपरहिट्ट ठरेल की.
29 Mar 2017 - 3:11 pm | मराठी कथालेखक
बाकी सगळं ठीक आहे. पण तुम्ही मतदान का नाही केलंत ? एकूणातच अनेक स्पर्धकांनीही मतदान का नाही केलं हे जाणून घ्यायला आवडेल,
29 Mar 2017 - 4:40 pm | विनिता००२
कथा वाचली की लगेच मत देणे सोपे जाते. एकदा वाचून मग परत मतदानाच्या वेळी परत वाचणे होत नाही. आजकाल तेवढा वेळ मला वाटते, कोणाकडे नाहीये.
माझ्यावरुन सांगतेय. वाचून प्रतिसाद दिले गेले. पण मतदानाच्या वेळी मार्चच्या कामात व्यस्त असल्याने परत उघडून वाचणे जमले नाही.
मतदान राहून गेले.
26 Mar 2017 - 10:44 pm | मराठी कथालेखक
सर्व वाचक आणि मतदात्यांना मनःपुर्वक धन्यवाद.
इतर सर्व विजेत्यांचे अभिनंदन
आणि स्पर्धेत चुरस आणि रंगत वाढवल्याबद्दल सहस्पर्धकांचे मनःपुर्वक आभार
आणि सर्वात महत्वाचे, आयोजक व संपादक मंडळाचे आभार..लेखकाचे नाव उघड न करता कथा प्रसिद्ध करण्याचा निर्णय खूप योग्य होता. धन्यवाद.
26 Mar 2017 - 10:44 pm | अभ्या..
सर्वंच लेखकांचे अन विजेत्यांचे अभिनंदन.
अगदी अप्रतिम अशा कथा सर्वच नाहीत पण आगमी लेखनाबद्दल आशा बाळगाव्यात असे लेखक या स्पर्धेने मिळताहेत ही खूप छान गोष्ट आहे.
कमीतकमी शब्दात एखादे कथासूत्र सादर करणे हे चॅलेंजिंगच, त्यातल्या त्यात मला आकाराने छोट्या पण आशयाने संपन्न कथा आवडतात. अशा कथा रेग्युलरली मिपावर येऊ लागल्या तर त्यापेक्षा भारी कै नै.
27 Mar 2017 - 12:08 am | अॅस्ट्रोनाट विनय
माझ्याकडून येतील असा शब्द देतो.
27 Mar 2017 - 6:04 am | एमी
विजेत्यांचे अभिनंदन!!
आम्ही येतोय (लेखक : अॅस्ट्रोनाट विनय) >> :-)
ऑक्टोबर- मार्च (लेखक : मराठी कथालेखक) >> :O
27 Mar 2017 - 9:34 am | प्राची अश्विनी
विजेत्यांचे अभिनंदन!!
27 Mar 2017 - 9:42 am | शब्दबम्बाळ
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
जव्हेरगंज याचे लिखाण आवडत असले तरी ही शशक "मराठी" म्हणण्यासारखी नव्हती असे वाटले... जो कि स्पर्धेचा निकष असायला हवा होता..
27 Mar 2017 - 11:12 am | बबन ताम्बे
साहित्यसंपादक मंडळ आणि मतदाते, वाचक यांचे ही आभार. माझ्या शशक कथेलाही (अडनड ) काही वाचकांनी गुण दिले हे पाहून आनंद झाला.
27 Mar 2017 - 4:01 pm | नीलमोहर
सर्व विजेते, स्पर्धकांचे अभिनंदन, सा सं, मालकांचे आभार.
27 Mar 2017 - 5:53 pm | पद्मावति
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मस्तं झाली स्पर्धा.
29 Mar 2017 - 10:35 am | विनिता००२
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
29 Mar 2017 - 10:54 am | बापू नारू
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन .
आयोजकांचेही आभार_/\_
29 Mar 2017 - 12:26 pm | संजय पाटिल
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!
29 Mar 2017 - 1:57 pm | अभ्या..
एक अपेक्षाय,
कितीतरी नवीन लेखक दिसताहेत, काही गणमान्यही आहेत पण या सर्वांनी केवळ स्पर्धा आहे ह्यापेक्षा रेग्युलरली मिपावर शशकच नव्हे तर लघुकथा, दिर्घकथा, ललित अशा प्रकारचे लेखन चालू ठेवावे. दर आठ्वड्याची/महिन्याची कथा, कविता, शशक अशे गौरव मिपाप्रशासनाने दिले तर लेखकांना अजून प्रोत्साहन मिळेल असे वाटते. ह्यातल्या विजेत्यांच्या कलाकॄतींचे पण मिपापुस्तक बनवता येऊ शकते. शिवाय वाचकांना मेजवानी मिळत जाईल हे बोनसच.
29 Mar 2017 - 3:43 pm | सिरुसेरि
शतशब्दकथा स्पर्धा २०१७ झाली . आता , द्विशतशब्दकथा स्पर्धेच्या प्रतिक्षेत .
30 Mar 2017 - 12:30 am | भिंगरी
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!
1 Apr 2017 - 5:08 am | इडली डोसा
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
1 Apr 2017 - 12:46 pm | विअर्ड विक्स
सर्व विजेत्यांचे अभिनंदन . वेगळ्या कथा वाचून आनंद मिळाला. माझ्या प्रतिक्रिया नंबरातील कथांवर पुढीलप्रमाणे
१. हि कथा मी स्वतः एक सूक्ष्मजीवशास्त्र पदवीधर असल्यामुळे पटलेली नाही
२. पंच आवडला . लाचप्रतिबंधक अधिकारी नि ८ कोटी विरोधाभास आवडला
३. जबरदस्त !!! वाचल्या क्षणीच कळले कि हि नंबरात येणार
४. विलक्षण कल्पकता !!!! त्या प्रकाश चित्रावर कथा लिहिणे फार कठीण होते. पर मान गाये !!!!!
५. कथा आवडली असे म्हणू शकत नाही कारण यात दाहक वास्तव होते.
माझ्या कथेला कोणाची साथ (साथ)मिळाली नाही. असुदे. पुढच्या वेळी नंबरात यायचा प्रयत्न करू .
3 Feb 2019 - 7:02 pm | आनन्दा
http://www.misalpav.com/node/38720
ही कथा यापूर्वी वाचलेय.. कदाचित शशक नसेल, पण कथावस्तू तीच होती.
4 Feb 2019 - 4:46 pm | मराठी कथालेखक
ही कथा पुर्णतः माझीच आहे. स्पर्धेकरिता दिलेल्या चित्रावरुन उत्स्फुर्तपणे सुचलेली. योगायोगाने आणखी कुणाला सुचली असल्याची शक्यता नाकारत नाही तरी तुम्ही म्हणताय त्या कथेचा दुवा देवू शकता का ?
3 Feb 2019 - 11:17 pm | आनन्दा
हे 2017 चे धागे शिफारस मध्ये का आले अचानक?