माझाही अनुभव ....(तो प्रसंग कधीच विसरु शकलो नाही...)

राम दादा's picture
राम दादा in जनातलं, मनातलं
7 Oct 2008 - 4:51 pm

नमस्कार मित्रांनो..तुमचे अनुभवाचे लेख वाचुन मला माझ्याही जीवनातील एक प्रसंग आठवला..तेव्हा मी लहान होतो...माझी आई मला नेहमी सांगायची कि आपण एखाद्याला मदद करावी..पण मी लहान होतो..जास्त लक्ष देत नव्हतो.पण आईचे संस्कार अंगिकारले होते..

....दहावीची परिक्षा जवळ आली होती ..फक्त एकच दिवस बाकी होता..आदल्या दिवशी मी दिवसभर घराबाहेर निघालो नाही..काही महत्वाचे मुद्दे वाचुन काढ्ले..डोक्यामध्ये फुल टेन्शन्..परिक्षेचा पहिला दिवस उजडला..आईने सकाळी लवकर उठवले..बाहेरच्या चुलीवर मस्तपैकी पाणी गरम केले..छान आंघोळ केली..पहिला पेपर मराठीचा होता..त्यामुळे जादा दडपण नव्हते..

हायस्कुल घरापासुन बरोबर ६ किमी अंतरावर होते..मी सायकल वरुन जायचो..आंघोळ झाल्यानंतर जेवन केले.आईच्या पाया पडलो..आणि ९.३० ला घरातुन निघालो. पेपरची वेळ ११ ची होती..एकदम फ्रेश होतो..घरापासुन सायकलवर बसलो आणि तीन चार किमी गेल्यावर सायकल पंक्चर!!! उन्हामुळे घाम सुटला होता..पण वेळ भरपुर होता .ठरवले भरभर चालत जाऊया...१०.३० ला तालुक्याला पोचलो..गावात एंट्री केली की लगेच सायकल चे दुकान होते..तो दुकानवाला ओळखीचा होता..त्याला म्हणालो..माझी सायकल पंक्चर झाली आहे..मला दुसरी सायकल दे .दुपारी परत करतो.माझ्या सायकलचे पंक्चर काढ्...त्याच्याकडे पण खुप गर्दी होती..
त्याला समजवायला १० मिनिटे गेली..त्याने परिक्षा असल्यामुळे मला सायकल दिली..तो पर्यंत सगळी मुले पण पाठीमागुन आली..वर्गातलीच दोस्त मंडळी असल्यामुळे जरा बरे वाटले..सायकल वरुन गेलो तर शाळेत १५ मिनिटात पोहोचणार होतो..त्यामुळे निम्म्यापेक्षा जादा टेंन्शन कमी झाले..उन खुप होते..घाम खुप येत होता..शाळेच्या अगोदर पंचायत समितिचे कार्यालय होते.तिथे आलो आणि एक अपंग माणुस मुलांना मदतीसाठी विनंती करत होता..त्याचे पाय खुप लहान होते..तो व्यवस्थित चालुच शकत नव्ह्ता हातात कुबड्यापण नव्ह्त्या.फक्त हातात एक काठी होती...तो मुलांना हाका मारत होता..त्याचा चेहरा फार सुकला होता.आणि त्यात मुले त्याच्याकडे बघुन हसत होती आणि पुढे निघुन जात होती..पेपर असल्यामुळे कोण जास्त लक्ष देत नव्हते..सगळे भरभर शाळेकडे जात होती..
१०.४५ वाजले होते..आमचा घोळ्का त्या माणसापाशी आला आणि तो माणुस प्रविण ला म्हणाला मला जरा एस.टी. टेशन वर सोड रे बाळा..परव्या न ऐकता पुढे निघुन गेला..

मला त्या माणसाची दया आली..पण पेपरची वेळ झाली होती...म्हणुन कोनच थांबत नव्हता..मी म्हटले काय झालं मामा..कुटं जायाच हाय तुमाला..तो म्हणाला सलगर ला.मला स्ट्यांड्जवळ सोड्..तिथे आमचे गाववाले हायेत ..मी जाईन घरी तिथुन .
मी एकदा घडाळाकडे पाहिले..आणि शाळे़कडे पाहिले..शाळा स्पष्ट्पणे दिसत होती...आणि आश्चर्य म्हणजे..पुढे गेलेली माझी सगळी दोस्त मंड्ळी बघत उभी होती..आणि त्यांच्याबरोबर्.बाकीची पोरं पण ...आमच्या दोघाकडे बघत उभे होते..

माणुस साधारण २८ ते २९ वयाचा असावा..आणि त्याला सायकलवर स्वतःला बसता पण येत नव्हते..तेव्हढ्यात एक वर्गातला दोस्त सायकल वरुन जाताना दिसला..त्याला हाक मारली...ये बबल्या ..आरं जरा हिकडं यी..जरा धरू लाग बाबा..त्ये पण कारटं न थांबता पुढेच गेले....मनात कसेतरी झाले..मग मी ताकद लावुन त्याला सायकल वर पुढच्या नळीवर बसवला..आणि आणि पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले..तर काय्..सगळी पोरं माझ्याकडे बघत उभी होती...आणि पहिली गजर बेल वाजली..मग मला समजले १५ मिनिटांनी पेपर चालु होणार्..सगळी पोरं वर्गाकडे धावली.. मी सायकल स्टँड़कडे वळवली..पाच ते सात मिनिटात स्टँडवर पोचलो..त्याला खाली उतरवला..त्याने मला जास्त काहीच नाही विचारले..म्हणाला बाळ तुझं नाव काय्..मी म्हणालो ..माझे नाव राम...तु मला लय मदद कीलीस बघ्..सरकारी कामं लवकर व्हत व्हाईत बघ ..पेन्सल मिळावी म्हुन पंचायतीत आलु व्हतु..मी म्हणालो. आता मी जातो..माझा पेपर हाय्..उशीर हुईल मला..त्याचा चेहरा माझ्याकडे पाहुन खुप समाधानी होत होता...मी शाळेकडे सायकल मारली..फुल स्पीड ने..शाळेत आलो..शाळेसमोरील मैदानात कोणीच मुले दिसत नव्हती..छातीत धडधडत होते...पहिलीच बोर्डाची परिक्षा आणि हा सगळा प्रकार आजच झाला होता..घामाने फुल भिजुन निघालो होतो..पण तसाच वर्गाच्या दारासमोर गेलो..सिट नंबर बी ब्लॉक मध्ये होता हे आधीच माहित होते..बहुतेक पेपर चालु होता..असा अंदाज लागला..मला वाटले आता शिक्षकाने कारण विचारले तर काय सागायचे...पण माझी घामाने भिजलेली अवस्था पाहुन तो शिक्षक काहिच बोलला नाहि...
मला प्रश्न पत्रिका दिली आणि मी हळुहळु दबक्या पायाने हात गेलो..सगळी पोरं माझ्याकडे पेपर लिहता तिरका डोळा करुन बघत होती..मी माझा मोकळा बाक कुठे आहे ते पाहत होतो..आणि सचिन ने हात वरती केला.माझी जागा सापडली...प्रश्नपत्रिकेवर एकदा नजर फिरवली..पेपर सोपा वाटला..सगळा पेपर व्यवस्थीत लिहला..सगळ्यात शेवटी मी पेपर सबमीट केला..पेपर चांगला गेला याचे समाधान वाटले..डोक्याचा ताण कमी झाला होता..मग माझी सायकल आठवली..शाळेतुन जोरात सायकल वरुन निघालो..दोस्त मंडळी गप्पा मारत आरामात येत होती..मी न थांबता सायकल दुकानाकडे गेलो..सायकल परत करुन त्याला म्हणालो..तु जर आज मला सायकल दिली नसतीस तर मी माझा पेपर लिहलाच नसता....तो पण गंभीरपणे म्हणाला..आरं आमीबी शाळत जात हुतु की लेकाच्या..असु दे असुदे ..३ रु दे .अन तुझी सायकल घिऊन जा..

मी त्याला पैसे दिले आणि घरी निघालो..घरी गेल्या गेल्या आईने विचारले ..झाला का पयला पेपर..बरा हुता नव्ह,,,मी म्हणालो ..सोपा गेला.
आईला खुप बरे वाटले..मग मला आईने मला जेवायला वाडले..मी जेवत जेवत आईला सगळा प्रकार सांगितला..आईच्या डोळ्यातुन पाणी आले..आई म्हणाली तुला एवढी अक्कल आली कुठुन्...आईला खुप आनंद झाला होता..आणि मलाही आईचे आनंदाश्रु पहायला मिळाले..सुट्टीचे दिवस असेच निघुन गेले..आणि मी तो प्रसंग पुर्णपणे विसरुन गेलो होतो..

आणि तो दिवस उजाडला.त्या दिवशी परिक्षेचा निकाल होता...मी परिक्षा खुप प्रामाणिकपणे दिली होती.विशेष म्हणजे कॉपी न करता ..तसा लहानपणा पासुन शाळेत हुशार होतो .शाळेत सगळी दोस्त मंड्ळी भेटली..सवे मुलाना शाळेच्या व्हरांड्यात बसवले..शिदे सर सर्वांचे लाडके होते..ते निकाल वाटत होते..पास झालेल्या मुलांची टक्केवारी आणि नावे सांगत ...मुले आपापले नाव वाचले की शांतपणे निकालपत्रक घेऊन परत जागेवर बसत्..माझे नाव वाचले..काळीज धडधड करु लागले..आणि कानावर आले..५३ टक्के मिळाले पास झाला...मग जरा मी शांत झालो..शेतकर्‍याचा मुलगा होतो.शेतातली कामे करुन आभ्यास केला होता..त्यामुळे मिळालेल्या गुणामघ्ये समाधान होतो..सगळ्यांचा निकाल समजला..माझ्या ग्रुप मध्ये मीच टॉप होतो..बाकी सगळी पोरं ४५..४४..३८. टक्के ह्या लेवल मध्ये होती..

आणि बरीच मुले नापास झाली होती..तेवढ्यात विकास आला ..आणि तो नापास झाला होता..तो म्हणाला.."आयला रामानं त्या पांगळ्या माणसाला मदद केल्यामुळे ..त्याच्या आशिर्वादाने हा पास झाला बघ."..आणि मला तो सगळा प्रसंग पुन्हा आठवला..
ती गोष्ट मी आजपर्यंत विसरलेलो नाही..
जेव्हा जेव्हा मला त्या प्रसंगाची आठवण येते..मनाला समाधान वाटते.......तो प्रसंग मनात घर करुन बसला आहे......आणि आज मिपामुळे मला पुन्हा हा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला..

मिपामुळे मला खुप चांगले लेख वाचायला मिळतात..
मी मि.पा. चा मनापासुन आभारी आहे..

राम दादा..

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

7 Oct 2008 - 5:06 pm | घाशीराम कोतवाल १.२

.."आयला रामानं त्या पांगळ्या मानसाला मदद केल्यामुळे ..त्याच्य आशिर्वादाने हा पास झाला बघ."

खरच आजच्या जगात अशी मदत कोणीही करत नाही कोणाला कोणाकडे पाहयला वेळ नाही तर मदत कोठुन करणार

मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2008 - 6:49 pm | प्रभाकर पेठकर

गरजवंतास केव्हाही मदत करावीच. अभिनंदन.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

मनस्वी's picture

7 Oct 2008 - 6:57 pm | मनस्वी

अभिनंदन.

मनस्वी

प्राजु's picture

7 Oct 2008 - 9:22 pm | प्राजु

आपला अनुभव एक समाधान देऊन गेला. कशाचं ते नाही सांगता येणार. पण आपलं कौतुक वाटलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

7 Oct 2008 - 9:37 pm | संदीप चित्रे

सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

रेवती's picture

7 Oct 2008 - 11:37 pm | रेवती

धाडसच म्हणायला हवं. दहावीची परिक्षा भल्याभल्यांची घाबरगुंडी उडवते. इतर करतात त्यापेक्षा आपण केलेला वेगळा विचार आवडला.
ह्यावरून एक गोष्टं आठवते. माझ्या मैत्रिणीचे वडील दहावीच्या परिक्षेला तीला शाळेत सोडायला स्कूटरवरून निघाले. त्यांना हिच्या परिक्षेचं इतकं टेंशन होतं कि मुलीला बरोबर न घेताच निघाले. मैत्रिण आपली ओरडत मागून पळत होती. शेवटी तिने रिक्षा केली व वडीलांना पुढच्या चौकात गाठले.

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2008 - 12:05 am | बिपिन कार्यकर्ते

ठ्ठो.....

५ मिनिटं झाली वाचून .... अजून हसतो आहे... जबरी.

शेवटी तिने रिक्षा केली व वडीलांना पुढच्या चौकात गाठले.

बिपिन.

प्रमोद देव's picture

7 Oct 2008 - 11:47 pm | प्रमोद देव

रामदादा लई छान काम केलंस बग! आनी आटवन बी लय झ्याक लिवलीया.
माला भरून आलं!

विसोबा खेचर's picture

8 Oct 2008 - 12:35 am | विसोबा खेचर

.."आयला रामानं त्या पांगळ्या माणसाला मदद केल्यामुळे ..त्याच्या आशिर्वादाने हा पास झाला बघ."..आणि मला तो सगळा प्रसंग पुन्हा आठवला..
ती गोष्ट मी आजपर्यंत विसरलेलो नाही..

वा! सुंदर..!

मिपामुळे मला खुप चांगले लेख वाचायला मिळतात..
मी मि.पा. चा मनापासुन आभारी आहे..

आपण मिपाचे आहात अन् मिपाही आपलेच आहे! :)

तात्या.

भिंगरि's picture

8 Oct 2008 - 12:43 am | भिंगरि

खुप मोठ मन आहे तुमच. हा अनुभव आमच्यापर्यन्त पोहचवल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

राम दादा's picture

8 Oct 2008 - 9:33 am | राम दादा

प्रिय मित्रांनो..
तुम्हा सर्वांच्या छान प्रतिक्रिया वाचुन मला खुप बरे वाटले..

तुम्ही पण तुमचा अनुभव सांगावा..आम्हा मिपाकरांना त्यातुन खुप काही शिकायला मिळेल..

धन्यवाद.
राम दादा..

मदनबाण's picture

8 Oct 2008 - 10:48 am | मदनबाण

मस्त अनुभव...
असाच एक माझाही अनुभव आहे..

ठाणे ते दादर असा माझा रोजचा प्रवास सुरु होता..एक संगणकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी मी रोज दादरला येत असे..
एक दिवस क्लास संपल्यानंतर मी घरी जाण्यास निघालो...मी आपल्याच धुंदीत चालत होत्..दादर स्टेशनकडे जाण्यासाठी निघालो..रस्त्यावर तशी बरीच गर्दी होती ...मी माझ्या घड्याळात वेळ पाहिली..काही वेळानेच असलेली जलद लोकल मला पकडायची होती !!..गर्दीतुन वाट काढत काढत जात असताना अचानक कोणीतरी माझा हात घट्ट धरला..अशाप्रकारे कोणीतरी माझा हात घट्ट पकडल्याने मी जरा भांबावलो..माझा हात पकडणार्‍या त्या व्यक्तीकडे मी पाहिले.. ती व्यक्ती अंध होती..व त्या व्यक्तीच्या दुसर्‍या हातात अंधांकडे असणारी फोल्डेबल काठी होती..
मी त्या अंध व्यक्तीला विचारले काय झालं तुम्हाला ? काही मदत हवी आहे का ?तो मला म्हणाला की प्लीज मला कोलो फोटो स्टुडिओ मधे घेऊन चला...मी त्याला विचारले की तुम्हाला पत्ता माहित आहे का? तो मला म्हणाला इथचं आस पास कुठे तरी तो स्टुडिओ आहे..मी मनात विचार केला की एका अंध व्यक्तीला फोटो स्टुडिओ मधे काय काम असेल्?जाऊंदे ..काही तरी असेल त्याच काम !!असा विचार करुन मी त्याचा हात धरुन रस्ता ओलांडला..पण मला तो स्टुडिओ काही केल्या सापडेना..शेवटी समोर असलेल्या एका दुकानदारालाच आपण हा स्टुडिओ कुठं आहे असे विचारायच ठरवल्..त्या अंध व्यक्तीचा हात धरुन मी त्या दुकानदाराकडे गेलो..तो दुकानदार मला म्हणाला की मी विरुध्द्द दिशेला आलो आहे..त्याने मला तो स्टुडिओ कुठ आहे ते सांगितल्..आता त्या अंध व्यक्तीचा हात धरुन मी स्टुडिओ च्या दिशेने चालायला सुरुवात केली.. माझ्या मनात परत तोच विचार आला की ज्या व्यक्तीला प्रकाश म्हणजे काय हेच ठाऊक नसत..त्या व्यक्तीला फोटो स्टुडिओ मधे काय काम असेल ?शेवटी हा प्रश्न मी त्याला विचारालाच की तुम्हाला फोटो स्टुडिओ मधे कशासाठी जायचे आहे ? त्यावर तो म्हणाला की काही दिवसा पुर्वी तो दादरच्या पादचारी पुलावरुन जात असताना त्या गर्दी मधे कोणी तरी त्याच्या हातातील छोटी ब्याग मारली होती...त्यात त्याची काही कागदपत्र आणि एक आयडी कार्ड होते..त्या आयडी कार्ड वर त्याचा फोटो होता...व आता नवीन आयडी कार्ड साठी त्याला नविन फोटो काढायचा होता..
मला हे ऐकुन फार वाईट वाटल्..ज्या लोकांना आजन्म अंधारातच चाचपडंतच जगाव लागत आणि काठी हाच ज्यांचा आधार असतो अशा त्या व्यक्तीला हा खडतर अनुभव आला होता..मनातल्या मनात मी त्याची ब्याग मारणार्‍या माणसाला शिव्यां घातल्या..
शेवटी तो फोटो स्टुडिओ मला सापडला...तिथे मी त्याला सोडले व विचारले की अजुन कुठे तुम्हाला जायचे असल्यास मी तिथे तुम्हाला सोडावयास तयार आहे..तो म्हणाला नाही अजुन कुठेही मला जायचे नाही पण इथं आणुन सोडल्या बद्दल धन्यवाद!!!
खरचं सागतो त्या दिवशी मला त्या व्यक्तीला मदत करुन जो आनंद मिळाला त्याला तोड नाही !!

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

जयवी's picture

8 Oct 2008 - 11:14 am | जयवी

तुमच्या धाडसाचं कौतुक वाटतं.
बोर्डाची परीक्षा असूनही तुम्ही हे पाऊल उचललं...... !!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

8 Oct 2008 - 11:59 am | घाशीराम कोतवाल १.२

बाण मदन खुप मस्त होता तुझा अनुभव मस्त
तुसुधा मदत करोतस
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?