द क्लिफ !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
6 Mar 2017 - 5:07 pm

या वेळी लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचं हा निर्णय घ्यायला अर्धांगिनीनी अक्षम्य वेळ लावला त्यामुळे जिथेजिथे फोन केले तिथेतिथे `वी आर ऑलरेडी सोल्ड आऊट, सर !' असा गोड प्रतिसाद मिळाला. पण वस्तुस्थिती कायम निर्वैयक्तिक असते, आपण तिच्याकडे पॉजिटीवली बघितलं तर ती संधी होते नाही तर अडचण ठरते हा बेसिकच फंडाये. त्यामुळे नवं डेस्टीनेशन ट्राय करु या म्हटलं. अँड इट रिअली टर्न्ड आऊट टू बी अ ग्रेट सरप्राईज !

1

भूगावच्या फॉरेस्ट ट्रेल स्कीममधे हे रिसॉर्ट आहे. पुण्यापासून फारतर सोळा/ सतरा किलोमिटर्स असेल. पण एकदा आत गेलात की ती एक वेगळीच आणि एकदम निवांत दुनिया आहे. रिसॉर्टच्या पार्कींगपासून पुढे आल्यावर उजव्या बाजूला केलेलं हे मोहक लँडस्केपींग

2

आणि हा दर्शनी भाग

3

इथल्या रुम्स केवळ अप्रतिम आहेत. रुमच्या एकाबाजूला संपूर्ण ग्लासवॉल आणि बाल्कनी आहे.

4

रुममधून बाहेरच्या विस्तीर्ण आकाशाशी कायम संपर्क राहातो. मग ते सकाळचं कोवळं आकाश असो, दुपारचं अनंत आकाश असो की रात्रीचं चांदण्यांची शाल पांघरलेलं आकाश असो. बाल्कनीत बसून आकाशाशी आणि एकमेकांशी निमग्न होण्यात वेळेचं भान संपूर्ण हरवून जातं...

5

6

इथला स्विमींग पूल फारसा मोठा नसला तरी इतका स्वच्छ आणि सुंदर आहे की आकाशाच्या घुमटाखाली तासंतास पोहत राहीलं तरी मन भरत नाही.

7

मला सगळ्यात काय आवडलं असेल तर इथली दोन्ही रेस्टॉरंटस. बाहेरच्या बाजूला असलेलं हे ओपन रेस्टॉरंट. इथे सकाळची कॉफी आणि ब्रेकफास्ट जाम एंजॉय करता येतो.

8

9

आणि हे कायम निवांत असलेलं इन-डोअर रेस्टॉरंट. इथे सकाळचं आणि रात्रीचं जेवण त्या भव्यतेचा आणि तिथल्या एकसोएक पदार्थांचा आस्वाद घेत मनमुरादपणे करता येतं.

10

दुपारच्या वेळी कधी गप्पा मारत बसायचं असेल, सकाळी योगा करायचा असेल, संध्याकाळी एखादं वाद्य वाजवत बसायचं असेल किंवा नुसतं जरी निवांत बसायचं असेल तर इथे एक मस्त गझेबो केलायं.

11

12

हे रिसॉर्ट जरी तिथल्या मेंबर्सच्या गेस्टसाठी असलं आणि त्यानी केल्याशिवाय रुम्स बुक करता येत नसल्या तरी रेस्टॉरंट दिवसभर सर्वांसाठी खुलं आहे. फूड क्वालिटी खरंच उत्तम आहे आणि किंमती इतर रिसॉर्टसारख्याच आहेत. एखाद्या वर्कींग डे ला पत्नीबरोबर सकाळी ब्रेकफास्ट प्लस लंच किंवा संध्याकाळी स्नॅक्स प्लस डिनर मस्त एंजॉय होईल.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Mar 2017 - 6:55 pm | प्रचेतस

क्या बात है संक्षी, निव्वळ लव्हली.

एवढा डेमो दिलाय संजयजींनी.
उपयोग करा माहीतीचा. फोटोलाच लव्हली करत बसू नकात. ;)

संजय क्षीरसागर's picture

7 Mar 2017 - 7:59 pm | संजय क्षीरसागर

लोक्स जसे लांबच्या ट्रीपा पार प्लानींग वगैरे करून काढतात तसा एखादा उनाड दिवस अचानक का जगून पाहात नाहीत ? इटस अ थ्रील ! .... इटस अ मोस्ट प्रॅक्टीकल वे टू एंजॉय लाईफ इन अ शॉर्ट रन .

सतिश गावडे's picture

7 Mar 2017 - 9:11 pm | सतिश गावडे

कल्पना खुपच अफलातून आहे. अशी एखादी बहारदार अनप्लान्ड ट्रीप काढली तर धमाल येईल.

आनंदयात्री's picture

7 Mar 2017 - 9:24 pm | आनंदयात्री

>>एखादा उनाड दिवस अचानक का जगून पाहात नाहीत ? इटस अ थ्रील ! .... इटस

परफेक्ट. प्रचेतसरावांनी असा एक उनाड दिवस जागून आयुष्याचा उत्सव साजरा करावा या प्रस्तावाला अनुमोदन देतो.

प्रचेतस's picture

7 Mar 2017 - 10:08 pm | प्रचेतस

उनाड दिवस भरपूर जगलोय पण ते दगडधोंड्यात.

संक्षी म्हणतात तसे जगून आयुष्याचा एका तरी दिवस सार्थकी लावायला हवा.

संजय क्षीरसागर's picture

7 Mar 2017 - 11:06 pm | संजय क्षीरसागर

तिथली थाई करी (राइस काँप्लिमेंटरी) आणि रशीयन सॅलड एकदम धमाल आहे.

धोणी's picture

8 Mar 2017 - 12:07 pm | धोणी

तुम्हीही नेहमीच अशा हुच्हभृ ठिकाणी कचकून पैसे उडव्ण्याऐवजी कधीतरी प्रचेतस रावान्सोबत का नाही जात लेणी बघायला ?

इटस अ थ्रील ! .... इटस अ मोस्ट प्रॅक्टीकल वे टू एंजॉय लाईफ इन अ शॉर्ट रन .

रोजचा दिनक्रम आहेत त्यामुळे गड-गिरीकंदरे पूर्वी भटकायचो पण आता तशी आवश्यकता भासत नाही. शिवाय मिळवलेल्या पैशांची खर्चिक ट्रीप करण्यापेक्षा जाण्या-येण्याचे श्रम, बुकींगचा व्याप, तिकिटाचा खर्च, खाण्या (आणि मुख्य म्हणजे पिण्या) चे हाल इत्यादी करण्यापेक्षा असे सहज-सोपे पर्याय जास्त आनंद देतात.

प्रचेतस's picture

8 Mar 2017 - 7:20 pm | प्रचेतस

खर्चिक???
उलट खूप स्वस्तात होतात हो.

संजय क्षीरसागर's picture

8 Mar 2017 - 9:38 pm | संजय क्षीरसागर

ट्रीप्स म्हणतोयं मी. तिकीट आणि हॉटेल बुकींग वगैरे त्या संदर्भात लिहिलंय. ... सॉलीड खर्चिक असतात त्या.

अनुप ढेरे's picture

9 Mar 2017 - 11:38 am | अनुप ढेरे

उनाड दिवस

गेली चारपाच वर्ष हा प्रकार करतो आम्ही ३-४ मित्र. नेहेमी भेटता येत नाही आणि आलं तरी कमी वेळासाठी. त्यामुळे सहा महिन्यातून एकदा वर्किंङ डेला सुट्टी टाकायची सगळ्यांनी. सकाळी हपिसच्या वेळेला बाहेर पडायचं. दिवसभर हुंदडायचं कुठेही, खायचं, प्यायचं आणि संध्याकाळी नेहेमीच्या वेळेला घरी परत. शेड्युल अजिबात बदलू न देता, फ्यामिलीला काहीही फरक न पडू देता दोस्तांबरोबर उनाडक्या करायला लय मजा येते. वर्किंग डे असल्याने कुठेही गर्दी नसते हा प्लस पॉईंट.

सुबोध खरे's picture

9 Mar 2017 - 11:48 am | सुबोध खरे

आम्ही( मी आणि पत्नी) असे एक दिवसाच्या सहलीसाठी रविवारी सकाळी जाऊन सोमवारी संध्याकाळी परत येतो. बऱ्याच वेळेस रविवारी दुपारपासून हॉटेल मध्ये आम्ही सोडून दुसरं कुणीच नसतं. त्यामुळे पाहिजे तेवढा आराम आणि शिवाय उत्कृष्ट सेवाही मिळते.रविवार संध्याकाळ आणि सोमवार सकाळ अतिशय आरामात काढता येते. अजून एक मोठा फायदा म्हणजे रविवारी सकाळी रस्त्यावर रहदारी नगण्य असते तसेच सोमवारी दुपारीही रस्ते बऱ्यापैकी रिकामे असतात.
दवाखाना एक दिवस बंद ठेवायचा तर तो शनिवारच्या ऐवजी सोमवारी बंद ठेवतो

पद्मावति's picture

7 Mar 2017 - 8:57 pm | पद्मावति

मस्तच.

वरुण मोहिते's picture

7 Mar 2017 - 9:07 pm | वरुण मोहिते

मस्त !!!आवडलं

झक्कास धागा. धन्स हो संक्षी..!!

नुसतं धन्स म्हणून गप्प काय बसता ? आयुष्य सार्थकी नाही लावणार ?

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2017 - 10:16 pm | पिलीयन रायडर

हे मला तर फार सामान्य वाटलं बुवा. काहीच स्पेशल नाही. तुम्हाला हे आवडलं असेल तर मग तुम्हाला अ‍ॅग्रो टुरिझम पण आवडतील. आम्ही एकदा विश्वकिर्ती ह्या ठिकाणी गेलो होतो. अगदी फार भारी नसलं तरी १ दिवस शांतता हवी असेल तर चांगलंय. काही आवाजच नाहीत. समोर एक छोटासा तलाव आहे.

जेवण उत्तम आहे अगदी. हॉटेल सारखे १०० पदार्थ नसले तरी घरचं जेवण असावं तसं. गरम गरम भाकर्‍या - पिठलं - वांग्याची भाजी वगैरे मेन्यु असतो. मला हॉटेल पेक्षा हे आवडतं.

http://www.vishwakirti.com/

अजुन एक करण कृषि पर्यटन केंद्र म्हणुन आहे - http://www.karanagritourism.com/

हे अजुनच स्वस्त आहे. इथे माझे आई वडील गेले होते. हे ही अगदी घरगुती आणि उत्तम जेवण. पण रहाण्याची सोय थोडी साधीच.

शिवाय ते नगरजवळ आहे. हा भाग एकदम ड्राय आहे कारण तिकडे आजोळ असल्यानं त्या भागाचा परिचय आहे. एक दिवसाच्या ट्रीपसाठी इतकी यातायात होणे नाही.

एखादं ठिकाण आवडलं तर आम्ही दोन/तीन/चार दिवस तिथेच राहातो. त्या दृष्टीनं मला तरी हे प्रपोजल फारसं आकर्षक वाटलं नाही.

अप्पा जोगळेकर's picture

9 Mar 2017 - 11:42 am | अप्पा जोगळेकर

गरम गरम भाकर्‍या - पिठलं - वांग्याची भाजी वगैरे मेन्यु असतो. मला हॉटेल पेक्षा हे आवडतं.
हायला, हॉटेलात जाउन घरगुती जेवण जेवायच ?
मग घरी काय कान्टिनेन्टल किंवा थाई खायच का. अजबच.

अनुप ढेरे's picture

9 Mar 2017 - 11:54 am | अनुप ढेरे

हा हा हा, कॉलिंग गवि :)

अगम्य's picture

9 Mar 2017 - 7:36 am | अगम्य

इथे दुपारी जेवायला जाण्याचा योग गेल्या वर्षी पाऊस सरत असताना आला होता. हे ठिकाण उंचावर असल्यामुळे इथून सभोवतालचे देखावे छान दिसतात. रेस्टॉरंट चा ambiance चांगला classy आहे. आम्ही गेलो तेव्हा गर्दी नव्हती. सेवा चांगली होती. इथे खाल्लेल्या पदार्थांपैकी मटण बिर्याणी आठवते आहे. मटण अगदी योग्य शिजलं होतं. आणि उगीच तिखटजाळ नव्हती तरी मसालेदार आणि स्वादिष्ट (flavorful) होती. इतरही पदार्थ (कोंबडी चा कुठलातरी पदार्थ होता त्याचे नाव आठवत नाही) चांगले होते. इतका सुंदर ambiance आणि सेवा असून किमती त्यामानाने जास्त नव्हत्या. इथे जायच्या आधी आम्ही लोणावळ्याला एक दोन रेस्टॉरंट मध्ये जेवलो होतो. त्या जागा ताशा साध्याच होत्या परंतु त्यांच्या किमतीत फार फरक नव्हता. तर वातावरण, सेवा, आणि पदार्थांचा दर्जा ह्या सर्वांचा विचार केला तर मला तरी हे ठिकाण पैशाचा परतावा देणारे वाटले. फक्त आम्ही मराठीत बोलत असलो तरी वेटर इंग्रजीमध्ये बोलत होता हे थोडे खटकले. पण ते तर हल्ली सगळीकडेच दिसते. तो विषय वेगळा आहे.