होणार होणार म्हणता म्हणता काल दिनांक ४ ऑक्टोबर २००८ रोजी 'शांग्रीला हॉटेल', पुणे इथे मिपा कट्टा संपन्न झाला. विशेष म्हणजे ह्या कट्ट्याला वरूण राजांनीही आपली उपस्थिती देऊन आम्हा सर्वांना उपकृत केले. अर्थात, रहदारीचा गोंधळ आणि त्यातल्या त्यात पुण्याचा कट्टा म्हंटल्यावर सदस्य वेळेवर पोहोचू शकले नाहीत आणि बापुडवाण्या चेहर्याने बसलेल्या आयोजक, श्री. सखाराम्_गटणे ह्यांना सर्व मंडळी जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न पडला. पण लवकरच त्यांच्या जोडीला मी, अभिज्ञ, मनोबा वगैरेंनी येऊन मिपाच्या सुधारलेल्या दर्जाबद्दल एक उद्बोधक चर्चा आणि विचारांचे आदान प्रदान सुरू केले.
प्रत्यक्ष उत्सवमुर्ती श्री. तात्यासाहेब अभ्यंकरांचे आगमन झाले आणि इतर सदस्यही भराभर जमू लागले.
सर्वश्री प्रकाश घाटपांडे, विजुभाऊ, वरद, धमाल-मुलगा, इनोबा, नीलकांत, आनंदयात्री, विकास, पुण्याचे पेशवे आदी सदस्यांनी हजेरी लावून मैफिलीत रंग आणि उत्साह भरण्यास सुरूवात झाली. सुरुवतीच्या झालेल्या किंचित उशीराच्या कंटाळवाण्या भावना विस्मूतीत जाऊन जो तो हिरीरीने चर्चेत भाग घेऊ लागला. सुरूवातीलाच पोलीस 'खाते' ह्या विषयावर श्री. प्रकाश घाटपांडे ह्यांनी 'अधिकार वाणीने' काही किस्से, विनोद सादर करून रंग भरायला सुरुवात केली. विजूभाऊंनीही काही विनोद त्यांच्या पोतडीतून काढल्यावर तात्यांना राहवेना. त्यांनी फक्त प्रौढांना श्रवणीय असे विनोद तर सांगीतलेच पण त्याच बरोबर अंगावर काटा आणणारा, प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रसंगही सांगितला. बाकी आम्ही बहुतेक सारे श्रोते होतो तसेच मधे मधे एखाद दुसरे वाक्य टाकून, फूंकणी मारून, चूलीतील निखारे धगधगते ठेवण्याचे काम करीत होतो. तात्यासाहेब, विजूभाऊ आणि श्री. प्रकाश घाटपांडे ह्यांच्या आयुष्यात आत्ताच, ह्या वयातच 'माझे आत्मवृत्त - भाग पहिला' प्रकाशित करण्या इतपत 'मसाला' तयार आहे. श्री. विकासरावांना घाई असल्यामुळे त्यांनी आणि घरी काही कार्यक्रम असल्या कारणाने श्री. पुण्याचे पेशवे ह्यांनी हजर सदस्याकडे दिलगीरी व्यक्त करत रजा घेतली. आणि मैफील पुढे सुरू झाली.
हॉटेल सेवकानी तरतर्हेची पेये आणि खाद्यपदार्थ आकर्षक ठंगात सादर केली आणि मंडळी विशेष रंगात येऊ लागली. माननिय आचार्य अत्र्यांचे विनोद आणि हजरजबाबी वृत्ती ह्यावरही मजेशीर चर्चा होऊन सदस्यांनी हास्यरसाचा पुरेपुर आस्वाद घेतला. विजुभाऊंनी बांसरी वादनाचा छोटेखानी कार्यक्रम सादर केला आणि कट्टा हळूहळू आपल्या मुळ उद्देशाकडे सरकू लागला. विषय शास्त्रीय संगीताकडे वळला. आपल्या 'कोर्टात' आलेल्या चेंडूवर एक आकर्षक फटकार लगावणार्या, त्याहून आकर्षक सानिया मिर्झा प्रमाणे, तात्या सरसावले. एव्हाना तानपुरा सज्ज झालाच होता. तात्या 'यमन' रागाची थोरवी, गोडवा, व्याप्ती आदी समजावून सांगतानाच वेगवेगळ्या गायकांची, एकच राग गातानाची, वेगवेगळी शैली संमजावून सांगत होते. अगदी साध्या आणि सोप्या भाषेतील वर्णन आणि सोबतीला माझ्यासारख्या ह्या विषयातील मठ्ठ माणसालाही 'यमन' रागाचे सौंदर्य सहजी लक्षात यावे म्हणून 'गाना मेरे बसकी बात नही, सुर और तालका मेल नही' ही ओळ वेगवेगळे गायक कसे गातील हे प्रत्यक्ष गाऊन दाखविले. मलाच खूप मजा आली, तेंव्हा तिथे हजर असलेल्या शास्त्रीय संगीतातील दर्दी सदस्यांना जो अवर्णनीय रसस्वाद घेता आला असेल त्याची मी कल्पना करू शकतो. एव्हाना मघाशी गेलेले पुण्याचे पेशवे पुन्हा परत येऊन मैफिलीत सामील झाले.
श्री. प्रकाश घाटपांडे ह्यांनीही एक गाणे सादर केले आणि 'आपल्या कलासक्त स्वभावावर पोलीसी दडपशाहीचा प्रभाव आपण पडू दिला नाही' हे कृतीने शाबित करून दिले. त्यानंतर पुन्हा शास्त्रीय संगीतावर चर्चा झाली. हॉटेलचे सेवक सेवेत तत्पर होतेच. मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. मिपासदस्यांची सेवा करता करता हॉटेल सेवकही मैफिलीचा आनंद लुटत होते. मध्येच एका सेवकाची आणि माझी एका कोपर्यात भेट झाली असता तात्यांक्डे हळूच अंगूलीनिर्देश करून तो मला म्हणाला,'वो साहब का सूर बहोत अच्छा है|' मी त्याला तेवढ्याच हळू सांगितलं , 'वो एक बहोत बडे गायक कलाकार है|' तो भारावला.
मैफील पहाटे पर्यंत चालावी अशी आमची इच्छा होती पण वेळेचे बंधन होतेच. हळू हळू मंडळींना जेवणाकडे वळावे लागले. सुप पासून सुरू करून चविष्ट जेवणाचा आस्वाद घेत घेत चर्चा विनोद चालूच होते. शेवटी आईस्क्रिमचा आस्वाद घेऊन तृप्त पण जड अतःकरणाने आम्ही 'शांग्रीला' बाहेर पडलो. बाहेरील वातावरण नुकत्याच जोरदार पडून गेलेल्या पावसाने विशेष थंड झाले होते.
पुढचा कट्टा ठाण्यात भरवू असे तात्यांनी सर्वांना आश्वासन दिले.
सर्वांनी श्री सखाराम_गटण्यांचे, इतका सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल, आभार मानले.
आणि 'पुन्हा भेटूच' ह्या शब्दात एकमेकांची रजा घेतली.
ह्या कट्ट्याचे काही फोटो सादर आहेत.......
उजव्या बाजूला श्री. आनंदयात्री आणि डाव्या बाजूला चौकडीच्या 'पिसांचा' श्री. डोमकावळा.
श्री. विजुभाऊ ह्यांचे सुश्राव्य बांसुरीवादन.
ई हमार बिटुवा 'पुनाका पेसवा' है, और कौनु नाही.
डाव्या बाजूला आयोजक श्री. सखाराम_गटणे उजव्या बाजूला पिवळ्या चहा-सदर्यात मितभाषी श्री. वरद.
'येऽऽ दोऽऽऽसती' श्री. आनंदयात्री आणि श्री. नीलकांत (मिपा तंत्रज्ञ)
गाणे सादर करताना श्री. विजुभाऊ.
आणि....
मिपासदस्यांना 'यमन' राग आणि शास्त्रीय संगीताचे सौंदर्य विशद करतानाच्या श्री तात्यासाहेब अभ्यंकर ह्यांच्या कांही भावमुद्रा...
प्रतिक्रिया
5 Oct 2008 - 11:06 am | डॉ.प्रसाद दाढे
गटण्या॑चे अभिन॑दन! मला काही वैयक्तिक अडचणी॑मुळे कालचा मिपा कट्टा अटे॑ड करता आला नाही ह्याचा मनस्वी खेद आहे. पण म॑डळी॑नी मजा केली हे पाहून आन॑द झाला. फोटू आणि लेखाबद्दल पेठकरकाका॑चेहे आभार
5 Oct 2008 - 11:10 am | कलंत्री
आनंद तर झालाच पण येण्याची इच्छा असुनही येता आले नाही याचे अतिव दुख झाले.
आपला वृतांत वाचुन थोडेफार "दुधाची तहान" या उक्तीचा प्रत्यय आला.
तात्याने आपल्या या ज्ञानाचा फायदा इतरांना करुन देण्यासाठी दृक्श्राव्य माध्यमाचा उपयोग केला पाहिजे. सध्या तबकडी बनविणे सोपे आहे तशी ध्वनिफीत बनविता येऊ शकते.
आणि 'पुन्हा भेटूच' ह्या शब्दात एकमेकांची रजा घेतली. या वाक्यात मी फक्त "लवकर" हा शब्द जोडू इच्छितो.
5 Oct 2008 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काका,
मस्त वर्णन आणि तुम्ही लोकांनी एकंदरीत धमाल केलेली दिसते. तात्यांचे फोटू तर क्लासच! त्यांच्या गाण्याचं रेकॉर्डींग कोणी केलं आहे का?
पहिल्या फोटूत तात्यांबरोबर आणखी कोण मंडळी आहेत?
मलाही कार्यबाहुल्यामुळे(!) येता आलं नाही त्यामुळे तुम्हा लोकांना असात्विक संगीताचा आस्वाद घेता आला नाही त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि क्षमस्व.
अदिती
5 Oct 2008 - 11:40 am | प्रभाकर पेठकर
पहिल्या फोटूत तात्यांबरोबर आणखी कोण मंडळी आहेत?
पहिल्या फोटोत तात्यांच्या उजव्या बाजूला पूर्ण बाह्यांचा सदरा घातलेले श्री. नीलकांत, तंत्रज्ञ मिपा.
तात्यांच्या डाव्या बाजूलाऽऽऽऽ???? नीट ओळख झाली नाही किंवा मी विसरलोय. पण प्रतिसादांमधून तेच पुन्हा आपली ओळख करून देतील अशी आशा आहे.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
6 Oct 2008 - 11:24 am | डोमकावळा
आहेत ते...
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
6 Oct 2008 - 8:07 pm | प्रभाकर पेठकर
त्यांची 'झकास' अशी ओळख झालीच नाही. असो, आता लक्षात ठेवीन.
माफी असावी झकासराव...
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
6 Oct 2008 - 8:38 pm | झकासराव
अहो राहु द्या हो काका.
माफी मागुन लाजवता कशाला? :)
काल आम्ही समस्त तरुण वर्गाने शेव आणि उकडलेले शेंगदाने गिळुन गप्प बसण्याचच काम केल की.
तुमची चौफेर फटकेबाजी बघत होतो.
पेठकर काका, विजुभाउ, घाटपांडे काका आणि तात्या ....
बाकी कोणाला बोलायला काही चान्सच नाही की. ;)
त्यांची 'झकास' अशी ओळख झालीच नाही>>> मग तुम्ही फोटोग्राफी संबंधीत चर्चा कोणाशी केलीत?? :)
कट्टा एकदम झकास झाला. कट्ट्याच्या व्यवस्थापनात "गटण्या"चा "नारायण" झाल्यामुळे कसलीही अडचण आली नाही. :)
तात्या लयी भारी हसतात. एकदम सात मजली.
आणि विजुभाउ आणि पेठकर काकानी हसण्याच्या अनेक संधी दिल्या.
"सज्जन" एकदम उच्च होता. :)
आणि हो तात्याच्या नरड्यात आणि विजुभाउंच्या बासरीत अम्मंळ मजा आहे राव. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
6 Oct 2008 - 11:01 pm | विसोबा खेचर
आणि हो तात्याच्या नरड्यात आणि विजुभाउंच्या बासरीत अम्मंळ मजा आहे राव.
धन्यवाद रे झकासा... :)
7 Oct 2008 - 12:13 am | प्रभाकर पेठकर
मग तुम्ही फोटोग्राफी संबंधीत चर्चा कोणाशी केलीत??
अहो मैफिलीतल्या उत्तरार्धातील घटनांचे डोक्यातील तपशील जरा अपरिहार्य कारणाने सरमिसळ झाले आहेत.
पण आता तुम्ही आठवण करून दिलीत आणि ट्यूब लख्ख पेटली बघा.
धन्यवाद.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
6 Oct 2008 - 9:36 am | विजुभाऊ
त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा ?
हे काय गौड्बन्गाल आहे/ कोणाचा वर्धापनदिन होता?
ज्या कोणाचा असेल त्याना त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
5 Oct 2008 - 11:12 am | यशोधरा
रेकॉर्डिंग केलंत का?
5 Oct 2008 - 11:42 am | प्रभाकर पेठकर
चौदा मिनिटांचे केले आहे. सध्या ते 'सेन्सॉर बोर्डाकडे ' आहे.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
6 Oct 2008 - 5:48 am | चित्रा
छान, मजा केलेली दिसते आहे.
तात्यांच्या गाण्याचे रेकॉर्डिंगही चढवा असल्यास.
6 Oct 2008 - 8:32 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो .
कट्टा जोरदार झाला असे दिसतेय ! व्हीडीओ क्षणचित्रे पुरवा अशी विनंती :-)
6 Oct 2008 - 9:41 am | आनंदयात्री
रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे पण ते मोबाईलवर शुट केल्यामुळे 3gp फॉरमॅट मधे आहे, उद्या दुपारपर्यंत देण्याची व्यवस्था करतो.
5 Oct 2008 - 11:32 am | प्रकाश घाटपांडे
अहो पेठकर सायेब आपन या विषयात मठ्ठ आहोतच पन आपन गुंगुन गेल्तो कि नाई. गाना मेरे बस कि बात नही या शब्दांनीच आपली संगीताशी जवळीक साधली गेली.
पेठकर साहेबांचा रंग- पानी तेरा रंग कैसा जिस मे मिलाऎ जाये वो जैसा।
हे अनुभवाला आले. तरी म्हन्ल पेठकर सायेब पानीच का टाकत्यात
प्रकाश घाटपांडे
5 Oct 2008 - 4:40 pm | कवटी
तरी म्हन्ल पेठकर सायेब पानीच का टाकत्यात
=)) =)) =)) =))
6 Oct 2008 - 8:29 am | llपुण्याचे पेशवेll
रम्य ही स्वर्गाहून लंका घाटपांडे साहेबांनी काय सही म्हटले अगदी त्यातल्या सतारीच्या आवाजसकट..
पुण्याचे पेशवे
5 Oct 2008 - 11:33 am | ऋषिकेश
आमच्या नशीबात कार्यबाहुल्य (!!) नको तेव्हा नको त्या दिवशीच का आडवं येतं कोण जाणे..
असो... कट्ट्याला म्हणजे अपेक्षेप्रमाणे फूल टू धमाल केलेली दिसतेय :) तात्यांच्या भावमुद्रा प्रेक्षणिय ;)
पेठकरकाका,
इथे फोटू चढवल्या बद्दल व व्रुत्तांतावद्दल अनेक आभार.. विकासरावांचा फोटू नाहिये का?
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
5 Oct 2008 - 11:36 am | प्रभाकर पेठकर
विकासरावांचा फोटू नाहिये का?
नाही नं..
ते नुसतेच कट्ट्याचे दार ठोठवून परतले. त्यांचे कांही महत्वाचे काम होते.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
5 Oct 2008 - 1:10 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
सहमत. आनंद झाला.
अवांतरः फोटो बघुन तात्या रागावले तर कसे दिसतील ह्या बाबतीत प्रश्न निर्माण झाले.
5 Oct 2008 - 1:48 pm | टारझन
सर्वप्रथम सर्व कट्टेकरूना आणि खास गटणेला आयोजनाबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
तात्यांच्या भावमुद्रा भावल्या ... लाष्टचा फोटू क्लास ... असो .. कमीत कमी ठाणे कट्ट्याला उपस्थिती लाउ शकू असा अशावाद :)
सोनेरी द्रव्यांचे ना फोटो दिलेत ना वर्णन ? सात्विक झाला का काय कट्टा ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
5 Oct 2008 - 1:54 pm | जयवी
मस्त मज्जा केलेली दिसतेय तुम्ही लोकांनी तर....... :) फोटो बघून पुरेपूर अंदाज आला ;) तात्यांचे फोटो "विलक्षण बोलके" आलेत :)
5 Oct 2008 - 2:28 pm | देवदत्त
अरे वा, मज्जा केलेली दिसतेय.
असे कट्टे वारंवार घडो :)
--------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.
5 Oct 2008 - 2:42 pm | सहज
मस्त! जोरदार मजा केलेली दिसते.
विकासराव यांचा फोटू काढायला पाहीजे होता. असो. पेशव्यांची त्यांच्या न्हाव्याशी भेट झालेली दिसते. :-) [संदर्भ इस्ट कोस्ट कट्टा फोटु]
तात्यांचा व्हीडिओ लवकर येउ दे.
माननीय आनंदयात्रीजी क्या कहने!
रामगोपाल वर्मानी श्री. गटणे यांना पाहीले तर पुढच्या सिनेमात नक्की कास्ट करतील असे वाटते.
नीलकांत कधी जॉइन होणार रे?
पेठकरकाकांचा, घाटपांडेकाकांचा फोटो का बरे नाही आला?
स्वगतः तात्यांच्या भावमुद्रा पाहून असे वाटते की त्यांचे लक्ष त्यांच्या "पितळी तांब्या" कडे आहे व ते गाण्यात मग्न आहेत हे पाहुन गटणे हळुच "तांब्या" रिकामा करु पहात आहे ;-)
5 Oct 2008 - 2:53 pm | रामदास
पेठकर साहेबांनी काढलेले फोटो फार सुंदर आहेत.
पेशव्यांनी पान खायला सुरुवात केलेले दिसते आहे. (आलोच आहे इंडीयात तर केस कापून घ्यावेत.)
यात्री आणि नीलकांत सुखवस्तू दिसायला लागले आहेत.
बाकी उपस्थीती कमी वाटते आहे.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
5 Oct 2008 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर
इतर सदस्यांनीही काढलेले फोटो आहेत जे कदाचित येतीलच मिपावर. माझे फोटो 'निवडक' आहेत.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
5 Oct 2008 - 3:46 pm | घाटावरचे भट
जियो मिपाकर्स....असे कट्टे वारंवार होवोत हीच इच्छा!!!
अजून फोटो टाकायला हवे होते...बाकीची मंडळी कुठे आहेत???
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
5 Oct 2008 - 3:54 pm | घासू
अहो काही ठिकाणी फोटो नाही दिसत हो, एखादी लि॑क जोडा की?
5 Oct 2008 - 4:14 pm | बिपिन कार्यकर्ते
घासू, हे फोटो बहुधा फ्लिकर वर चढवून मग इथे लिंकवले आहेत. आपल्या इथे यु.ए.ई. मधे फ्लिकर बॅन आहे. फोटो बघायाला काही युक्ति लागेल ती मी तुम्ही भेटाल तेव्हा सांगेन.
बिपिन.
5 Oct 2008 - 4:17 pm | बिपिन कार्यकर्ते
कट्टा एकंदरीत छानच झालेला दिसतो आहे. काका, तुम्ही लिहिलंय पण छान. तात्याराव एकदम फॉर्मात दिसत आहेत. मी धम्याला फोन करायचा खूप प्रयत्न केला पण फोन लागतच नव्हता :( . तात्याला केला नाही कारण मला वाटलंच होतं की तो गाण्यात रंगला असणार. असो.
बिपिन.
5 Oct 2008 - 4:22 pm | विसोबा खेचर
पेठकरशेठ,
कट्टा वृत्तांत लै भारी.. सगळ्या गोष्टी अगदी छान कव्हर केल्या आहेत. बाकी, कट्ट्यावरील काही काही गोष्टींवर कव्हरच राहू दिलेत ते बरे केलेत.. :)
फोटू टाकण्यात आपली काहीतरी गडबड झाली होती ती आता सुधारली आहे...
काल आपल्या सर्व मिपाकरांसोबत कट्ट्याला खूप मौज आली.. :)
तात्या.
--
आम्ही देवांपाशी तेलाच्या दिव्यासमवेत, तुपाचाही दिवा लावतो.. :)
5 Oct 2008 - 4:56 pm | भडकमकर मास्तर
हा पुणे कट्टा यशस्वी केल्याबद्दल समस्त मिपाकरांचे अभिनंदन...
( आणि आयोजनाबद्दल गटणेचे सुद्धा अभिनंदन)...
कट्ट्याचे मस्त वर्णन....
पेठकर काकांना धन्यवाद...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
5 Oct 2008 - 5:43 pm | विकास
कट्ट्यावर थोड्यावेळासाठी का होईना जाऊन सर्वांना प्रत्यक्षात भेटता आले म्हणून आनंद झाला. पण ८-१० दिवसांसाठीच असल्याने एकाच संध्याकाळी अनेकांना भेटणे गरजेचे होवून गेले होते. त्यामुळे वरील वृत्तांत वाचल्यावर संपूर्ण कार्यक्रमासाठी राहता आले नाही याची रुखरुख लागली.
परत लवकरच भेटता येईल अशी आशा करतो...
5 Oct 2008 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो, कट्टा वर्णन सहीच !!!
5 Oct 2008 - 7:08 pm | सर्वसाक्षी
का रे तात्या? सध्या काही पथ्यावर वगैरे आहेस की काय?
असो. आता ठाणे कट्टा कधी?
5 Oct 2008 - 7:11 pm | सर्वसाक्षी
सगळयांना टिपता टिपता तुमच्या कॅमेर्यावर स्वतःचे एकही चित्र उतरले नाही? अहो द्यायचात कुणालातरी तुम्हाला टिपायला. बाकी वृत्तांत झकास. भेटु एकदा सवडीने.
6 Oct 2008 - 8:56 pm | मी_ओंकार
बाकी वृतांत आणि छायाचित्रे छान.
- ओंकार.
5 Oct 2008 - 11:00 pm | प्राजु
कट्ट्याचे फोटो मस्त. पुण्याचे पेशवे आत एकदम सभ्य वाटताहेत. बहुतेक, अमेरिकेतून घरी पोचल्यावर केसांवर कात्री चालवली गेली वाटतं.
तात्यांचे गातानाचे फोटो एकदम मस्त. त्याचं रेकॉर्डींग केले आहे का? यूट्यूब वर टाकाल का ?
आवांतर : सखाराम गटणे कौल काढण्याव्यतिरिक्त इव्हेंट मॅनेजमेंटही चांगली करू शकतात असं दिसतंय.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Oct 2008 - 11:54 pm | टुकुल
कट्टा जोरात झालेला दिसत आहे त्याबद्द्ल समस्त मिपाकरांचे अभिनंदन...
6 Oct 2008 - 12:29 am | धनंजय
मजा आलेली दिसते. पेठकरकाका - धन्यवाद.
6 Oct 2008 - 3:55 am | मदनबाण
व्वा. कट्टा जोरदार झालेला दिसतोय्,,आम्ही आपले फोटो पाहुनच समाधान करुन घेतो..ठाणे कट्ट्याची वाट पाहतो आहे !!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
6 Oct 2008 - 8:11 am | ऋचा
माझा कट्टा हुकला :(
तुम्ही मजा केलेली दिसतेय मस्त :)
रेकॉर्डींग केल आहे का गाण्यांच?
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
6 Oct 2008 - 9:07 am | अनिल हटेला
फोटो, कट्टा वर्णन सहीच !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
6 Oct 2008 - 9:42 am | शिवा जमदाडे
लै बेष्ट मजा केलीत लोकाहो तुम्ही...... थोडं रेकॉर्डींग बी लवकर चढला जालावर.....
- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)
6 Oct 2008 - 9:56 am | आनंदयात्री
साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा !!
या उक्तीचा प्रत्यय आला :)
संत तात्याबा महाराजांनी खास कट्ट्यासाठी पुण्यात येउन यावर्षी आम्हाला दिवाळी दसरा अंमळ आधीच घडवला. संत तात्याबा महाराजांचे प्रवचन फार छान झाले, सर्वप्रथम त्यांनी निरनिराळ्या किश्यातुन, विनोदातुन त्यांचे अफाट जिवनविषयक तत्वज्ञान सांगितले. नंतर "गाना मेरे बस की बात नही" हे बाबुजी कसे म्हणतील अन अण्णा कसे म्हणतील असे उदाहरण घेउन समजवुन देतांना यमन रागाचे काही बारकावे समजावुन दिले.
तात्याबांच्या सत्संगाला तिर्थ हवेच म्हणुन पेठकरकाकांनी उंची स्कॉच आणली होती सगळ्यांसाठी (ग्रँड्स). पेठकरकाका फुल्ल फॉर्मात ब्याटिंग करत होते. तात्या, पेठकर काका, प्रकाशकाका अन विजुभाउं यांची विनोदांची आतिशबाजी ऐकुन आख्खा कट्टा प्लस बाजुचे वेटर मंडळी हसुन हसुन बेजार झाले होते. धमाल मुलगा वीस पंचवीस वेळा ठ्याssss झाला होता. तरुण मंडळी तशी गप्पच होती, कोणतरी कानात कुजबुजले पण होते की "तरुण तुर्क अन म्हातारे अर्क" म्हनुन, कोण म्हटले आठवत नाय बॉ आता ! ;)
काय वर्णन कितीही करता येईल अजुन पण काहीही म्हणा कट्ट्याला लै मजा आली राव !!
6 Oct 2008 - 10:07 am | प्रभाकर पेठकर
तरुण मंडळी तशी गप्पच होती, कोणतरी कानात कुजबुजले पण होते की "तरुण तुर्क अन म्हातारे अर्क" म्हनुन, कोण म्हटले आठवत नाय बॉ आता
ठीऽऽऽऽऽक आहे आनंदराव! आम्ही 'म्हातारे अर्क' काय? पाहतोच आता पुढच्या कट्ट्याला तुमच्याकडे.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
6 Oct 2008 - 10:25 am | आनंदयात्री
गैरसमज..गैरसमज..गैरसमज.. !!
काका तुम्ही तर तरुणात होते ना :D .. बस्स का ??
बर आपण हा विषय थांबवुयात, मिपाची आचारसंहिता पाळुयात ना !! ;)
(विषय थांबला म्हणजे मी सुटलो)
6 Oct 2008 - 11:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> (विषय थांबला म्हणजे मी सुटलो)
आंद्या हलकट्ट ऐवजी तुझं नाव आंद्या डरपोक केलं पाहिजे.
बाकी पेठकर काका तरूणांत मोजले जावेत याला माझंही अनुमोदन!
अदिती
6 Oct 2008 - 11:43 am | आनंदयात्री
डरपोक म्हणा काहीही म्हणा !! आम्ही चिडणार नाही :D
तुम्हाला माहितीये का ? पुर्वी लोक आंतरजालावर वावरायला गेंड्याची कातडी लागते असे म्हणायचे आता आंद्याची कातडी लागते असे म्हणतात !!
-आंद्या हलकट
(यापुढे खरडवहीतुन बोलावे ही ण्म्र विनंती)
6 Oct 2008 - 3:40 pm | बिपिन कार्यकर्ते
बाकी पेठकर काका तरूणांत मोजले जावेत याला माझंही अनुमोदन!
पेठकर काकांना तरूणांत मोजल्याबद्दल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तरूण झाल्याबद्दल पेठकरकाकांना हार्दिक शुभेच्छा. आणि असेच उद्गार माझ्या बद्दल न काढल्या बद्दल तुझा जाहिर आणि सार्वजनिक निषेध.
6 Oct 2008 - 8:20 pm | मेघना भुस्कुटे
पेठकर काकांना तरूणांत मोजल्याबद्दल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तरूण झाल्याबद्दल पेठकरकाकांना हार्दिक शुभेच्छा. आणि असेच उद्गार माझ्या बद्दल न काढल्या बद्दल तुझा जाहिर आणि सार्वजनिक निषेध.
बिपिन.... जहबहराहा.... =)) =)) =))
बाकी फोटू उत्तम! मजा आली...
6 Oct 2008 - 11:53 am | विजुभाऊ
(विषय थांबला म्हणजे मी सुटलो)
ही मराठवड्यातली परंपरा आहे. मराठवाड्यातले एक सज्जन सातार्यात राहुन संत झाले.
खुद्द त्यानीच तीनशे वर्षांपूर्वी लिहुन ठेवले आहे " विषय सर्वथा नावडो"
विषय सर्वथा नावडो" लिहिणारे संत पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य नव्हते याचा त्याना राग आला असावा"
6 Oct 2008 - 11:56 am | आनंदयात्री
_/\_
विजुभाउ .. अहो आंतरजालावर कधी कुणा दुसर्याला शोधा हाणायला .. सगळे येतात अन मलच भिडतात.
साला मी खपलो म्हणजे सुटाल सगळे !
6 Oct 2008 - 12:06 pm | विजुभाऊ
सगळे येतात अन मलच भिडतात.
अरे तुझ्यात ती क्षमता आहे. एका वेळे तू किती जणाना झेलु शकतोस ...खरेच कौतुक आहे.
साला मी खपलो म्हणजे सुटाल सगळे !
ते आम्ही कसे होउ देवु. अन्डे देणारी कोंबडी मारायची नसते. ते लहानपणी शाळेत शिकलोय.
विषय सर्वथा नावडो हे वाक्य समर्थ रामदासानी ल्हिलय
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
6 Oct 2008 - 11:44 am | विसोबा खेचर
तात्याबांच्या सत्संगाला तिर्थ हवेच म्हणुन पेठकरकाकांनी उंची स्कॉच आणली होती सगळ्यांसाठी (ग्रँड्स).
याबद्दल मात्र आम्ही पेठकरकाकांचे विशेष ऋणी आहोत. त्यांनी कट्ट्याकरता मोठ्या प्रेमाने अन् आपुलकीने आपल्या संग्रही असलेला सोनेरी द्रव्याचा खजिना खुला केला होता..!
साली, ग्रँन्ड्सची चव होतीही फार सुंदर! आणि दुसर्या दिवशी सकाळी साला हँगओव्हर आजिबात नाय!
वा! सुंदर दारू...मजा आली... :)
आपला,
(तिर्थवाला प्रवचनकार) तात्या.
--
वातीचा कापूस ऐन वेळेस नाही मिळाला तर आम्ही लेंग्याची नाडी थोडीशी कापून, तिची वात करतो व दिवा लावतो.
6 Oct 2008 - 10:24 am | मनस्वी
मस्त वर्णन आणि फोटो. धन्यवाद पेठकरकाका.
कट्टा यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल गटणूचे अभिनंदन.
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
6 Oct 2008 - 12:03 pm | मनिष
कट्टा धमाल झालेला दिसतो आहे, मी कळवले होते तसे मी वैयक्तिक कारणामुळे नाही हजर राहू शकलो; त्याची हुरहुर वाटते आहे...
6 Oct 2008 - 12:34 pm | स्वाती दिनेश
कट्ट्याला भरपूर मजा केलेली दिसते.. :)
आमच्या भ्रमणमंडळाची सहलही २ ते ५ ऑक्टोबर प्राग आणि साल्झबुर्ग येथे गेली होती.म्हणजे मिपाकरांचे एकाच दिवशी दोन खंडात संमेलन होते,:) लवकरच वृत्तांत आणि चित्रे चढवते.
स्वाती
6 Oct 2008 - 2:51 pm | विसोबा खेचर
आमच्या भ्रमणमंडळाची सहलही २ ते ५ ऑक्टोबर प्राग आणि साल्झबुर्ग येथे गेली होती.म्हणजे मिपाकरांचे एकाच दिवशी दोन खंडात संमेलन होते,
मिसळपाव मस्तकी धरावा,
अवघा हलकल्लोळ करावा..! :)
लवकरच वृत्तांत आणि चित्रे चढवते.
वाट पाहतो मॅडम! :)
आपला,
(मिसळपावकर) तात्या.
6 Oct 2008 - 3:18 pm | छोटा डॉन
सर्व वॄत्तांताबद्दल व फोटोंबद्दल पेठकरकाकांना धन्यवाद !
आम्ही बरेच काही "मिस" केले हे क्षणात उमगले ...
( त्याची कसर आम्ही "भ्रमणमंडळाच्या सहलीत" काढली पण तो भाग वेगळा, स्वातीताई टाकेलच वॄत्तांत.
आमचही मुड लागला तर खास आमच्या शैलीत वॄत्तांत टाकु, फोटोचे तेवढे नका विचारु , ते स्वातीताईच पाहिल. )
फक्त ते "सेंसॉर पास" व्हिडीओ चढवा म्हणजे कानही तॄप्त होतील ...
अजुन थोड्या जास्त वर्णनाच्याही अपेक्षेत आहे, काही "वेचक किस्से" टाकावेत ही विनंती ...
च्यायला आम्हाला असल्या कट्ट्यांना यायची लै हौस, पण आजकाल जीवन धावपळीचे झाले आहे ...
पुन्हा एकदा जमवु घाट व तात्यांना मुंबईवरुन हक्काने ओढुन आणु गायला लाऊ ...
आमेन !
बाकी " आयोजक गटणे, तात्या व सर्व उपस्थीत मिपाकरांचे" आभार व अभिनंदन ....
अवांतर : सात्विक संगीत वाचले व पाहिले, असात्विक संगीत काय ऐनवेळी रद्द झाले काय ?
बरीच मंडळी फोटोत दिसत नाहीत ???
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
6 Oct 2008 - 4:02 pm | धमाल मुलगा
जे दिसत नाहीत ते फोटोमध्ये घेण्याचा अवस्थेत नसावेत. त्यामुळे काकांचा तिसरा डोळा त्यांच्याकडे मुद्दामच नाही वळला ;)
असात्विक संगीताची जबाबदारी अदितीने घेतली होती, पण ती बहुतेक तिच्या दुर्बिणीला भेटायला गेली असावी...आली नाही कट्ट्याला. त्यामुळे नो असात्विक संगीत गाईंग बिझनेस.
6 Oct 2008 - 8:07 pm | बिपिन कार्यकर्ते
नक्की काय प्रकार होता ते व्य. नि. मधून कळवणे ही नम्र पण आग्रहाची विनंति. ;)
बिपिन.
ही अदिती कोण ब्वॉ ~X(
7 Oct 2008 - 10:03 am | धमाल मुलगा
व्य नि कशाला? तो कट्ट्यामधलाच एक भाग होता की. त्यात काय एव्हढं?
मला म्हणायचंय, पेठकर काकांनी आणलेली 'ग्रँड्स' कदाचित फोटोत न आलेल्या मंडळींना जरा 'ग्रँड'च झाली असावी, म्हणुन काकांनी उगाच त्यांची शोभा नको असा विचार करुन फोटो नसतील काढले.
पण खाली काकांनी सांगितलंच की योग्य प्रकाशाअभावी काही फोटो ते इथे देऊ शकले नाहीत. त्यामुळे माझा अंदाज रद्द समजावा ही नम्र विनंती.
काय बिपीनभौ, असं का करताय? आपल्या आख्ख्या मिपावर अशी एकच व्यक्ती आहे जी दुर्बिणीला भेटायला जाते...यमी द ग्रेट सायंटिश्ट!
असो.
बाकी, कट्ट्याला एकदम झनाटामॅटीक मजा आली बॉ.
विजुभाऊंनी वाजवलेली बासरी काय, तात्यांचं गाणं काय, ती सुंदर, सोज्वळ, मर्यादाशील स्कॉच काय, तात्या+विजुभाऊ+पेठकर काका+ ढॅण टॅ ढॅण घाटपांडे काका ह्यांची खत्तरनाक टोलेबाजी काय.......
हॅ:..साला आम्हाला वाटायचं की आमच्याइतका दंगा कोणी करतच नाय..वर लिहिलेल्या चौघांनी जे एकसे एक टाकलेले..आम्ही तिच्यामारी घडीघडी तोंडातल्या सुवर्णद्रव्याचे फवारे उडु नयेत ह्या काळजीनंच निम्मे झालो.
नारायण गटणू, थ्यांक्यु रे ह्या कट्ट्याबद्दल :)
एक आचरट सुचना: पुढच्या कट्ट्याच्या नियोजनापुर्वी त्या वरद्याची तब्येत ठीक आहे ना ते पाहुन तारीख ठरवा बॉ. ते बिचारं कट्ट्याला येतं आणि भिजल्या मांजरासारखं गप एका कोपर्यात बसुन राहतं.
6 Oct 2008 - 8:17 pm | प्रभाकर पेठकर
तसे नाही. माझ्या छायाचित्रकलेच्या प्रयोगांमध्ये काही सदस्यांवर, भ्रामक सूर्यप्रकाश (फ्लॅश) नीट पोहोचला नाही. आणि मीही अतिआत्मविश्वासाने, संगणकावर सावरून घेऊ अशा विचारांनी, सुधारीत छायाचित्रे काढली नाहीत. काही समस्या छायाचित्रांना कात्री लावताना आल्या. त्यामुळे काही सदस्यांवर अन्याय झाला आहे. क्षमस्व.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
7 Oct 2008 - 12:09 am | प्रभाकर पेठकर
आहेच मी अजून यौवनात.
हं! जरा गुडघे दुखतात, जरा कंबर दुखते, जरा टक्कल पडत चाललय, चष्मा आला असला तरी नंबर काही मोठा नाहीए, डॉक्टरांनी मधुमेहाच्या गोळ्या सुरू करायला लावल्यात, पण त्यांना काय कळतंय? मैफिलीचा आनंद घेणं, छायाचित्र काढणं, आणि सदस्यांची ओळख लक्षात ठेवणं, अशा एकाच वेळी तिन्ही तिन्ही गोष्टी नीट जमत नाही म्हणून काय झालं? हल्ली प्रदुषण, धावपळीचे जीवन, जीवघेणी स्पर्धा आणि मानसिक तणाव ह्या मुळे, ' ह्या सर्व व्याधी तरूणांचा 'घास' घेत आहेत' असा एका सर्व्हे चा निष्कर्ष्य आहे.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा