शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ बांडगुळ

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 6:59 am

aaaaaa

रणखांबे मास्तर लईच दार्शनिक.
परीक्षेत दुसऱ्याचं बगून ल्हिवायचो तर म्हनायचा '' तू लेका बांडगूळच रहाणार आयुष्यभर ''
लई राग याचा तवा .
धाव्वी काय लाभली नाय - आलो पुन्यात .
वळखीतनं युवराजदादाला भेटलो , पुढारी माणूस, कामबी मिळालं .
यका खबदाडीत झेरॉक्स मशीन टाकून दिली.
आकडा टाकून कनेक्शनबी दिलं.
फिप्टी - फिप्टीला आपल्या बाचं काय जातंय ?

दिपवाळी झाली. गावाकडनं आलो.
दादा बोल्ले , ''आजपासनं दुकान तुझं !
दोन लाख तुझ्या खात्यात टाकलेत- कुटं बोलला तर तंगडं तोडीन.
रोच्च्याला मिळतील तशे परत कर !''
कळायचंच बंद झालं. कायतरी लफडा केलाय युवराजानं!
रातच्या यष्टीनं गावाला छू !
मास्तर म्हनला ब्येस केलंस - आता आमचं दुकान सांबाळ. हाय मी पाठीशी... !
फुडाऱ्याचं बांडगूळ व्हन्यापरीस मास्तरचं झालेलं बरं !!

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 8:46 am | स्रुजा

हेहे आवडली