‘हे घ्या शेट दहा लाख. तुमच्या सहा लाखाचा व्याज धरुन हिशेब.’
‘कुणाला च्युतिया बनवतो बे कचरा देऊन?’
‘रोखीचा व्यावहार रोखीतच चुकता होणार ना शेट? मी तर इमानदारीनं कमावलेत. तुम्ही नाही घेतले तर मी उठलो ना जिंदगीतून. आता पुन्हा नाही कमवू शकत शेट. ’ सदानंद काकुळतीला आला.
समोर आलेल्या लक्ष्मीवर पाणी सोडायचं शेटच्या जीवावर आलं. सगळं जगच जणू अनंत काळ थांबलं.
मग शेट म्हणाला ’ सदा एक काम कर. पाच पॅनकार्डच्या झेरॉक्स आणि त्या लोकांचे चेक घेऊन ये’
दहा दिवसांनी शेटनी सदाला पॅनकार्डवाल्यांच्या नांवच्या सोनाराच्या पावत्या दिल्या.
सदा पाहातच राहीला....
त्याच्या पैशाचे कागद झाले होते.... आणि
शेटनी कचर्याचं सोनं केलं होतं!
प्रतिक्रिया
23 Feb 2017 - 8:47 am | स्रुजा
असं पण होऊ शकतं !
23 Feb 2017 - 1:03 pm | संजय क्षीरसागर
.
23 Feb 2017 - 8:11 pm | पिलीयन रायडर
आवडली!!