शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हाक

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 6:36 am

aa

तुम्हाला सगळं जेव्हा संपवायच असतं ना तेव्हा घाई असते, आरामात मरता येत नाही.

पण मला शांतपणे मरायच होत.

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे, स्वतःला समुद्रात लोटून द्यायच.

मग तडक निघाले समुद्र किनारी, रात्रीच्या वेळी, कोणी बघणार नाही, शांतपणे निरोप घेता येईल.
सरळ त्या समुद्राला जाऊन भिडले, डोळे मिटून घेतले, थोड्याच वेळात मुक्ती!!

मला कोणी हाक मारली का?

मला कोण बोलवतय?

मी माघारी फिरले, धावत परत किनारी आले, डोळे मोठे करून बघितले, वाळूवर कोणाची तरी पावलं उमटली होती!

पायातले त्राण गेले होते, त्या थंडगार वाळूवर तशीच पडले.

पण एक गोष्ट खटकत होती, माझ्यासारख्या मुक्या, बहिऱ्या मुलीला कोणीतरी मारलेली हाक ऐकू कशी आली?

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 8:55 am | स्रुजा

छान, आवडली.

सस्नेह's picture

23 Feb 2017 - 11:05 am | सस्नेह

छान जमलीय.

प्रसाद गोडबोले's picture

23 Mar 2017 - 4:20 pm | प्रसाद गोडबोले

वाह !