शतशब्दकथा स्पर्धा २०१७: देवाची काठी

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
10 Feb 2017 - 7:03 am

aaa

"हा पाहिलास फोटो? पेपरात छापला होता म्हणे.. आजी आणि तिची मैत्रीण."
"आणि हे मागे काय ग आई? "
" भूकंप झाला होता ना त्यावेळी...”
"मग?"
"तुझी आजी हिमतीची. तिच्या घरचं कोणीच वाचलं नाही. या मैत्रिणीच्या आईला विचारलं तिने, तुमच्या बरोबर राहू का, म्हणून. त्यांचं घर तरी कुठे वाचलं होतं? कष्ट उपसले आणि निभावलं कसं तरी. गावची शाळाही कोसळली होती, पण दोघी दूरच्या शाळेत चालत जात.”
"आणि हा फोटो? ही आजीने काढलेली शाळा ना?"
"हो. मुलींची शाळा. मला तर वाटतं, भूकंपामुळेच गावात मुलींची शाळा झाली."
"म्हणजे?"
"आजीच्या घरी मुलींना शिकायला बंदी होती. लग्नच लावणार होते तिचं. तेवढ्यात भूकंप झाला, म्हणून तर.”

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

10 Feb 2017 - 8:57 am | जव्हेरगंज

मस्त डोकं लढवलंय!!

जव्हेरगंज's picture

10 Feb 2017 - 8:58 am | जव्हेरगंज

*लेखकाने

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2017 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण !

मराठी कथालेखक's picture

10 Feb 2017 - 11:11 am | मराठी कथालेखक

छान..

अॅस्ट्रोनाट विनय's picture

10 Feb 2017 - 11:11 am | अॅस्ट्रोनाट विनय

वाईटातही चांगलं होतं म्हणतात ते असं

शब्दबम्बाळ's picture

10 Feb 2017 - 11:22 am | शब्दबम्बाळ

ठीक आहे कथा पण आजीच्या लहानपणीच्या काळात कलर फोटो जरा बरोबर नाही वाटलं...

आंबट गोड's picture

10 Feb 2017 - 2:53 pm | आंबट गोड

आणि आजी व तिची मैत्रिण एकदम शर्टपँट वगैरे घालत होत्या पाठीवर सॅक घेत होत्या हेही नाही पटत.

पिलीयन रायडर's picture

10 Feb 2017 - 9:16 pm | पिलीयन रायडर

गोष्ट अजुन १०० वर्षांनी सांगितलेली असेल तर त्यावेळच्या आज्ज्या ह्या आजच्या मिनिस्कर्ट घालणार्‍या मुली सुद्धा असु शकतातच ना.. !

चांगली कथा!

मराठी कथालेखक's picture

11 Feb 2017 - 1:24 pm | मराठी कथालेखक

बरोबर.. पण त्यावेळी "घरी मुलींना शिकायला बंदी होती" हे जुळणार नाही ना ? अर्थात फोटोतला अर्थ महत्वाचा, मुलींच्या अंगावरचे कपडे , पाठीवरची सॅक या गोष्टींना महत्व देण्याची गरज नाही.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2017 - 12:00 am | पिलीयन रायडर

अहो.. ह्यावरच्या फोटोत शर्ट पॅण्ट घातलेल्या मुलींनाही शिकायला बंदी असण्याची दाट शक्यता आहे. ज्या वातावरणातला तो फोटो आहे, ते बघता नक्कीच तिथे मुलींना शिकायला फार वाव नसेल असंच वाटतंय. :(