निळकंठबुवा बिदरकर ..संगीत क्षेत्रातील एक गुरुतुल्य व्यक्तीमत्व . बुवांचे नाव घेताच अनेक जाणकार गायक, वादक , रसिक श्रोते कानाची पाळी पकडत .
एक निर्माता आपल्या शास्त्रीय संगीतावरील चित्रपटामध्ये बुवांनी गावे यासाठी इच्छुक होता . पण चित्रपटसंगीतातील बंधनांमुळे बुवा राजी नव्हते .
अखेरीस आर्थीक गरजांमुळे ते तयार झाले . तो चित्रपट आणी बुवांचे गाणे खुप गाजले .
एका मैफीलीला बुवांनी ईश्वरवंदना करुन रागदारीला आरंभ केला .
"बुवा ..आधी तुमचे " सुरचंद्रमा" पिच्चरमधलं " सावनकी बहारें" होउन जाऊदे ." पहिल्या रांगेतील मानाच्या कोचावरील देणगीदाराने फर्माईश केली .
बुवांनी संताप आवरला . सप्तसुरांना वंदन करुन अर्धवट राहिलेली रागदारी त्यांनी पुनश्च आरंभ केली .
प्रतिक्रिया
11 Feb 2017 - 6:14 pm | राघवेंद्र
मस्त जमली आहे.
11 Feb 2017 - 6:20 pm | संजय पाटिल
कथा चांगलिये, पण थीमशी कशी रिलेट होतेय कळेना...
12 Feb 2017 - 4:51 am | लोथार मथायस
कथा फोटोशी जुळत नाहीये ???
27 Mar 2017 - 6:17 pm | सिरुसेरि
आपल्या प्रतिसादांबद्दल आभार . सर्व कथा लेखकांचे अभिनंदन .
कथेबद्दल --- "मैफल" हि कथा "दॄष्टिकोन" या विषयाशी / छायाचित्रावर बेतलेली / संबधीत आहे . संगीताकडे पाहण्याचा गायकाचा व समाजातील इतर घटकांचा दॄष्टिकोन वेगवेगळा असु शकतो . या फरकामुळे त्यांच्यामध्ये मतभेद होउ शकतात. असा या कथेचा आशय आहे .