शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
10 Feb 2017 - 6:57 am

a

तो संदेश सर्वात आधी नासाच्या उपग्रहांनी पकडला.
“आम्ही येतोय.” फक्त दोनच शब्द होते संदेशात.

“आपण शांततेच्या मार्गाने बोलणी करू.” संयुक्त राष्ट्रसंघ

“सर्व देशांनी आपापले क्षेपणास्त्र अवकाशाच्या दिशेने वळवावेत.” अमेरिका

“जगाचा अंत जवळ आलाय.” व्हॅटिकन

“ते आपले मित्र असावेत.” भारत

“ही भारताची चाल.” पाकिस्तान

काही दिवसांनी परत एक संदेश मिळाला-
“लढायला तयार रहा.”
यावेळचा संदेश पृथ्वीच्या अगदी जवळून आलेला.

जगभरातलं सैन्य अन शस्त्रास्त्रं खडबडून जागे झाले, धार्मिक स्थळी जाणाऱ्यांची संख्या शेकडो पटींनी वाढली. अन दुसऱ्या दिवसापासून-

किण्वनाशी संबंधित उद्योगधंदे बंद पडू लागले. जिवाणू विषाणूंमुळे होणारे रोग जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे छुमंतर झाले.

ते अतिप्रगत मायक्रो-एलीयन्स पृथ्वीवरच्या सुक्ष्मजिवांना मारून केव्हाच निघून गेले होते.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

वा. आवडली शतशब्दकथा. डॅन ब्राऊन छाप कादंबरीचे पोटेन्शिअल आहे कथाबीजात.

डॅन ब्राऊन ? ज्यूल्स व्हेर्न

जव्हेरगंज's picture

10 Feb 2017 - 8:51 am | जव्हेरगंज

ज ब र द स्त !

काय कलाटणी आहे!! अचाट!!

चिनार's picture

10 Feb 2017 - 9:32 am | चिनार

जबरदस्त कथा !!
एस भाऊंशी सहमत !

अॅस्ट्रोनाट विनय's picture

10 Feb 2017 - 10:43 am | अॅस्ट्रोनाट विनय

क्या बात क्या बात क्या बात.
याला म्हणतात शशक

सस्नेह's picture

10 Feb 2017 - 11:00 am | सस्नेह

एक शंका : सगळे सूक्ष्म जिवाणू मेल्यावर जीवनोपयोगी बॅक्टेरिआंचे काय ? आणि पर्यायाने त्यावर अवलंबून असलेल्या निसर्गचक्राचे काय ?

शब्दबम्बाळ's picture

10 Feb 2017 - 11:19 am | शब्दबम्बाळ

कचऱ्याचे ढीग, मेलेली न कुजलेली जनावरे आणि इतर अनेक परिणाम होतील.
माणसाला जीवसृष्टी टिकवून ठेवायला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल! :)

च्यामारी पण ते एलीयन्स आपल्या बॉलीवूड विल्लन सारखे आहेत वाटत. आवाज करून मग येतात, मारायला!

रामपुरी's picture

10 Feb 2017 - 9:23 pm | रामपुरी

अगदि हेच मनात आलं. जिवाणू आणि विषाणू फक्त रोगराईच निर्माण करतात असं नाही.

स्रुजा's picture

11 Feb 2017 - 2:11 am | स्रुजा

हो ना.. दही सुद्धा लागायची मारामार असं झालं तर !

कथा आवडलेली आहे !!

फारच मस्त, कायच्या काय आवडल्या गेली आहे.

सिरुसेरि's picture

11 Feb 2017 - 11:21 am | सिरुसेरि

मस्तच . अशाच आशयाचा "रशियन्स आर कमिंग" चित्रपट असावा .

संजय पाटिल's picture

11 Feb 2017 - 5:21 pm | संजय पाटिल

मस्त!
कथा आवडल्या गेली आहे....

लोथार मथायस's picture

12 Feb 2017 - 4:54 am | लोथार मथायस

जबरदस्त कलाटणी
एक नंबर शशक

प्रसाद गोडबोले's picture

23 Mar 2017 - 4:17 pm | प्रसाद गोडबोले

भारीच