धनुष्कोडीचा नयनमनोहर समुद्रसंंगम आणि रामसेतूचंं दर्शन फार प्रसिद्ध. ते अनुभवण्यासाठी दोघेजण उत्साहात रामेश्वरला बसमध्ये बसले. बस थांंबली. समोर समुद्र आणि अफाट वाळू. त्या वाळूतून शेवटपर्यंंत नेण्यासाठी खास गाड्या उभ्या होत्या. अवाजवी भाव व अडवणूक खटकल्यानं त्या गाड्यांंनी जायला अजिबात मन होईना. दुसर्या बाजूला इथेपर्यंंत येऊनही धनुष्कोडी पहाण्याचंं नीलसुंंदर स्वप्न अपुरंं रहाणंं पण रुचेना.!!
तिच्या बोलक्या चेहेर्यावर सगळंंसगळंं लिहिलेलंं होतंं. त्यानंं ते पाहिलंं आणि वाचलंंसुद्धा!!
"जवळ पिण्याचं पाणी पुरेसंं आहे." तो म्हणाला, "आलोय तसंं धनुष्कोडी बघायचंंच आहे. आपण चालत जायचंंय!!" असंं म्हणून तो चालूही लागला. त्याच्या बोलण्याचा अर्थ लागल्यावर मनावरचंं मळभ दूर झालं. हरखून तीही त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागली.
प्रतिक्रिया
8 Feb 2017 - 1:37 pm | प्रीत-मोहर
ही माझी सत्यकथा आहे.अर्थातच आवडली. :)
8 Feb 2017 - 5:55 pm | जव्हेरगंज
तुमची?
""त्याच्या बोलण्याचा अर्थ लागल्यावर मनावरचंं मळभ दूर झालं."">>>> काय अर्थ लागला त्याच्या बोलण्याचा..
8 Feb 2017 - 9:59 pm | अॅस्ट्रोनाट विनय
आपण चालत जायचंंय!!
हा असेल अर्थ