तुझ्या पाऊलखुणा पुसू नयेत म्हणून त्या दिवशी त्याने भरती रोखून धरली होती म्हणाला. वाळू तुडवत मी तुझ्या मागे येईन आणि थांबवेन तुला, उद्या तू माझ्यावरचा राग विसरशील अन पुन्हा कातरवेळी आपण त्याला अशीच आजच्यासारखी सोबत द्यायला येऊन बसूत, या आशेने त्याने बराच वेळ वाट पहिली म्हणाला. एकदा तुझ्या पाऊलखुणांबरोबर चालत गेलेल्या माझ्या पाऊलखुणा पाहिल्या की मी निर्धास्तपणे पाटी पुन्हा कोरी करायला मोकळा असेही म्हणाला. त्याच पाऊलखुणांवरून माझा माग काढत तू येशील म्हणून मीही बसून राहिलो त्याच्या सोबतीने. घटिका गेली पळे सरली अन मग माझी आशाही निमाली. त्याच्या हृदयात पडलेल्या खड्ड्याने ओहोटी आली, अन मग आपसूकच मी त्याच्या कुशीत शिरलो, कायमचा.
प्रतिक्रिया
8 Feb 2017 - 11:08 am | मराठी कथालेखक
मी, तो , तू मध्ये गोंधळ होतो आहे.
मी = समुद्र ?
कथेतलं दूसरं वाक्य फारच मोठं झालंय कळत नाहीये नीट..कल्पना चांगली आहे असं वाटतंय पण थोडी सोप्या शब्दांत मांडायला हवी होती.