घरात तीन हजाराच्या आसपास कॅश असेल,खरेदीसाठी राजेश, तेजसकडे उधारी करता येईल. माझ्याकडे आणि हिच्याकडे कार्डस तर आहेतच, त्यावरचे पॉईंटस बघून घ्यायला हवेत.
माझ्या मनातली आर्थिक गणिते अव्याहतपणे चालूच होती.
"डॅडा"
माझ्या छकूलीच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो.
"या नोटा कॅन्सल झाल्याने किती छान झालयं ना ? "
नोटबंदीचा या छोट्याश्या मुलीवर कसा काय परिणाम झाला असेल? मी बुचकळ्यात पडलो.
"आता नोटा नाही म्हणजे पैसे नाही, म्हणून आता तुला नोकरी करावी लागणार नाही. तुला सगळा टाईम मला देता येईल ना! तू आलास की त्या लॅपिला घेऊन बसतोस.आता तुला रोज माझ्यासोबत खेळता येईल."
तिची पैशाची आणि नात्यांची गणित खरचं किती सोपी होती
प्रतिक्रिया
8 Feb 2017 - 9:27 am | चिनार
मस्त !!
विचार करायला लावणारी कथा..
8 Feb 2017 - 11:09 am | मराठी कथालेखक
छान.
8 Feb 2017 - 11:27 am | बबन ताम्बे
खूपच छान विचार !
9 Feb 2017 - 12:24 am | Rahul D
+1
12 Feb 2017 - 7:22 pm | नूतन सावंत
Zakas
23 Mar 2017 - 4:13 pm | प्रसाद गोडबोले
अनुक्रमणिकेनुसार कथा वाचत आहे , आत्ता पर्यंतच्या कथात ही सर्वात जास्त आवडली !