संदीप औलीया आहे याची साक्ष देणारी ही एक सुरेख कविता ! स्वच्छंद जगण्याची आदीम उर्मी प्रत्येकाच्या अंतरी आहे पण रोजच्या जगण्यात ती हरवून गेलीये. स्वानंद किरकिरेची शायरी रांचो नांवाच्या स्वछंदाला शोधतांना हृदयस्पर्शी होते आणि डोळ्यात पाणी तरळवून जाते....
बहती हवा सा था वो,
उड़ती पतंग सा था वो,
कहाँ गया उसे ढूँढो
हम को तो राहें ही चलती
वो खुद अपनी राह बनता
गिरता संभालता, मस्ती में चलता था वो |
हमको कलकी फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो |
कहाँ से आया था वो
छू के हमारे दिल को
कहाँ गया...उसे ढूँढो |
स्वानंद म्हणतो आम्हाला रोजचा दिनक्रमच चालवतो, पण तो स्वतःचा दिवस मांडतो. आम्ही उद्याच्या चिंतेत जगतो, तो हरेक आजचा उत्सव करतो आणि हर क्षणाला साहसानं सामोरं जातो. झेन मास्टर रिंझाई या स्वच्छंदाचं वर्णन, केवळ दोनच शब्दात करतो `लिव्ह डेंजरसली !' आणि संदीप त्याच्या स्वच्छंदाचा माहौल रंगवतांना म्हणतो :
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !
ही कविता संदीपनं स्वत: गायलीये कारण ते त्याचं स्वत:चंच वर्णन आहे. त्यानं प्रत्येक कडव्यापूर्वी कव्याचं विवरणही केलंय त्यामुळे हे रसग्रहण म्हणजे एका अर्थानं संदीपशी केलेली जुगलबंदी आहे. तो कवितेतून स्वत:ला खोलतोयं आणि मी गद्यातून स्वच्छंदाचा माहौल उभा करण्याचा यत्न करतोय. संदीप म्हणतो ही आपल्यातल्याच दोन मींची कविता आहे. मला वाटतं, हा एका स्वच्छंद गवसलेल्याचा रोजच्या जगण्याचा अंदाज़ आहे. एकदा स्वच्छंद गवसला की चौकटीत जगणारं असं कुणी राहातच नाही.
रोज तेचते जगण्याची वृत्ती, सुरक्षितचौकटीत जगण्याची सवय आणि किरकोळ गोष्टींनी व्यथित होणं संदीप किती सुरेखपणे मांडतो. सहज भिडणारी रुपकात्मकता रसिकाला संदीपच्या अनुभवाशी तत्क्षणी रिलेट करते. जुनाट दार आणि किरकिरा बंदी ही धारणात बांधली गेलेली मानसिकता आहे, जी मोकळा श्वासच घेऊ देत नाही. स्वानंद म्हणतो तसा ‘एक कहानी ख़तम तो, दुजी शुरु हो गई मामू !’ असा जगण्याचा पॅटर्न होऊन बसतो. संदीप ती स्थिती ‘बिजागरीशी जीव गंजवत बसतो’ अशी मांडतो आणि शेवटच्या ओळीत तर कहर करतो...तो लंघून चौकट पार निघाया बघतो ! ही चौकट म्हणजे भीती आहे. आणि ती भीती दुहेरी आहे. मूळात जे भय आहे ते शारीरिक म्हणजे मृत्यूचं आहे आणि मानसिक भय इज्जतीचा कधीही फालुदा होण्याचं आहे. या दोन भयांना जो पार करतो तो चौकट लंघून जातो, स्वच्छंद होतो.
मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो !
मग या रोजमर्राच्या जिंदगीत वरुन कितीही हसतमुख दिसलो तरी आत कधीही भडका होईल असा संताप धगधगत असतो. इन अ वे, व्यक्तीमत्त्वाच्या जगण्याला हा उन्हाचा शाप आहे. आणि ज्याला स्वच्छंद गवसला तो याच उन्हाचे दागिने घडवतो ! तीच रिलेशनशिप्सची गुंतागुंत, त्याच आर्थिक विवंचना, तेच दैहिक प्रश्न, पण चौकट लंघून गेलेला त्यांची दाहकता सूर्यफुलात रुपांतरित करतो.
डोळ्यांत माझिया सूर्याहुनी संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप !
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते-
- घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !!
यशस्वी झालो तरच खरा जगलो ही मानसिकता अस्तित्वाविरोधात लढा उभा करते. प्रत्येक अडचण काच होते आणि रडीचा का होईना डाव खेळून जिंकण्याची इर्ष्या निर्माण करते. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तसा ‘स्व कायम विजयी आहे’ कारण तो दुसर्याच्या विजयात स्वत:ची हार मानत नाही तर ते त्याचं कौशल्य मानतो, त्याला दाद देतो. आणि मग ती हार सुद्धा त्याला आनंद देऊन जाते कारण तो नवं काही तरी शिकलेला असतो.
मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो !
आस्तिक देवावर भरोसा ठेवून असतो आणि तो सदैव आपल्याच पाठीशी उभा राहावा म्हणून नवस-सायास करतो. ‘तो’ आपल्या मनाजोगतं घडवेल या भाबड्या आशेपायी वेळातवेळ काढून भक्ती करतो. पण स्वच्छंद जगणार्याला दान काय पडेल याची फिकीर नसते, त्याचा सगळा रस खेळण्यातच असतो. या निर्वेध चित्तदशेमुळे आणि अशा बहुआयामी विश्वात, आपली व्यक्तिगत इच्छा रेटणं व्यर्थ आहे हे उमगल्यानं, तो अस्तित्वाशी कायम समरुप असतो. असं जगणं मग कृतार्थ होतं आणि अस्तित्वाचा धन्यवाद घेऊन जातं.
मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली !
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन् 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!
ज्या काव्याला अध्यात्मिक आयाम नाही ते फार सुपरफिशियल होतं. संदीप त्याचं अध्यात्मिक आकलन कवितेत आणतोच आणि त्यामुळेच तर त्याची कविती मिस्टीकल होते. चौकटीत जगणार्याला स्यूडो अध्यात्माचा मोठा आधार असतो. म्हणजे ‘तत् त्वं असी’ किंवा फारच डेरींग असेल तर ‘अहं ब्रह्मास्मी’ असे काही फंडा मनातल्या मनात रिपीट करत तो जगत असतो. शिवाय हे फंडे प्रसंगानुरुप बदलत असतात. या मानसिकतेला संदीप म्हणतो...मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार ! पण हे इतकं वरवरचं असतं की आतला चेहरा तसाच भेसूरच राहातो, कारण व्यक्तीमत्त्वातून सुटका झाल्याखेरिज तो बदलणार तरी कसा? स्वच्छंद जगणारा आकाश झालेला असतो ! त्याचं सगळं जगणं मोरपंखी झालेलं असतं. आणि या स्थितीचं वर्णन संदीप असं काही कमालीचं लोभस करतो की त्याच्या प्रतिभेचा केवळ हेवा वाटतो !...तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परि चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !
प्रतिक्रिया
14 Feb 2017 - 2:00 am | संदीप डांगे
प्लिज. उगीच प्रतिसाद ठोकायला मी रिकामा नाही. किंवा तुम्हाला वादात हरवायचेच असंही अजिबात नाही. काहीतरी जेन्युइन शंका आहे म्हणून विचारले आहे. मला समजले नाही म्हणून विचारत आहे. मला वर्षातून एकदाच एकहाती, वर्षभर खर्चाला पुरतील असे पैसे खात्रीने मिळत असतील तर त्यात अनिश्चितता कोठे आहे? वर्षभर काम करुनही पैसे मिळण्याची खात्रीच नसेल तर अनिश्चितता आहे. क्लायंट मिळण्याची-टिकण्याची खात्री नसेल तर अनिश्चितता आहे. ही फेफरं आणणारी सिच्युएशन माझ्या व्यवसायात चांगलीच अनुभवली आहे. तसे काही असेल तर खरंच मान्य करतो.
महिन्यावारी मिळण्याऐवजी वर्षाकाठी मिळणे ही काही अनिश्चितता होऊ शकत नाही. तसं बघितलं तर मग मासिक-पगार मिळवणारे रोज संध्याकाळी पैसे मिळणार्यांना, 'फेफरं येतील तुम्हाला' असं म्हणू शकतात. शिवाय काळ-वेळ हा भ्रम आहे असे आपण नेहमीच म्हणत असता. मला तरी ह्या निश्चिततेत कुठलीही फेफरं येणारी सिचुएशन दिसली नाही. प्लिज एलाबोरेट इफ यु फील इट्स इम्पोर्टन्ट.
14 Feb 2017 - 11:14 am | संजय क्षीरसागर
तुम्ही सीएच्या आर्थिक परिस्थितीची विचारणा केली होती त्यावर मी प्रतिसाद दिला आहे. वर्षातून एकदा पैसे मिळणं हे कुठल्या व्यावसायात आहे याचं तुमच्याकडे उत्तर नाही. आणि जे लिहीलंय ती वास्तविकता आहे त्यामुळे वादात हारण्याचा प्रश्न कुठे येतो ? वर्षातून एकदा मिळणारे पैसे आणि महिन्याला मिळणारे पैसे यातली अनिश्चितता तुम्हाला दिसत नसेल तर माझा नाईलाज आहे. कारण जितका कालावधी मोठा तितकी अनिश्चितता जास्त हे सरळ गणित आहे. शिवाय पैसे हमखास मिळणारच हा तुमचा अंदाज फक्त हॉस्पिटल आणि हॉटेलला लागू होतो हे तुमच्यासारख्या व्यावसायिकाला समजायला काही हरकत नाही.
14 Feb 2017 - 11:31 am | संदीप डांगे
पैसे हमखास मिळणारच हा तुमचा अंदाज फक्त हॉस्पिटल आणि हॉटेलला लागू होतो हे तुमच्यासारख्या व्यावसायिकाला समजायला काही हरकत नाही.
^^^
ओके, म्हणजे पैसे मिळण्यात अनिश्चितता आहे तर, तेही वर्षभर काम करून. इतकं डेंजरस, बेभरवशाचे काम कोणी करणे कसे काय शक्य आहे ह्याचेही आता कुतूहल आहे, मला हे खरंच माहित नव्हते. सगळे व्यावसायिक सीए तुमच्यासारखे 'लिव्ह डेंजरसली' ह्या विचारसरणीचे तर नसतील ना? असे जिवावर उदार होऊन वर्षभर मरमर काम करून पैसे मिळतील कि नाही ह्याची वाट पाहणे भयंकर आहे. इतके हुशार आणि व्यवहारी लोक असे कसे जगू शकतात, जणू काही दुसरा पर्याय नाही?
14 Feb 2017 - 2:02 pm | आदूबाळ
आणि गंजिफ्रॉकच्या दुकानाला.
13 Feb 2017 - 9:36 pm | सतिश गावडे
इथले प्रतिसाद उजवीकडे सरकत असल्याने आणि माझ्या चतूर भ्रमणध्वनी/ न्याहाळकामध्ये आडवा सरकपट्टा येत नसल्याने मी अनेक अनमोल प्रतिसादांना मुकतोय.
13 Feb 2017 - 10:02 pm | पैसा
मोबियस पट्टीवर बसण्यात आनंद असेल तर तेवढाच चुकतोय तुला.
13 Feb 2017 - 10:33 pm | संदीप डांगे
सबसे जबरदस्त प्रतिसाद! क ह र!! माझ्याकडून तुला नाशिकचा भेळभत्ता.....
13 Feb 2017 - 10:40 pm | पैसा
नाशिकला येऊन खाणार!
13 Feb 2017 - 10:10 pm | संदीप डांगे
गावडेसर... खफवर दिला होता तो अनमोल सल्ला विसरलात कि बघितलाच नाही. :-) मोबाईल ब्राउजरला डेस्कटॉप साईट रिक्वेस्ट करा.. सारे प्रतिसाद आनंदासकट हजर होतीलच,
14 Feb 2017 - 2:38 am | उन्मेष दिक्षीत
गोज बॅक टू कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क , त्यातलं हे वाक्य,
अँड देन फरदर गोज बॅक हिअर, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
14 Feb 2017 - 12:37 pm | पुंबा
स्वच्छंदी जगण्याबद्दल जी चर्चा वर चालुये त्याबद्दल माझे मतः
१. ९ ते ५ नोकरी करणारा माणूस या वेळात त्याचे स्किल्स वापरून तो जे निर्माण करतो त्याचा त्याला मोबदला मिळतो, त्याने त्याचे घर चालते. जगण्यासाठी लागणार्या गरजांची पूर्ती करण्यासाठी त्याला काही ना काही ट्रान्झॅक्ट करावेच लागणार आहे आणि ते म्हणजे त्याचे स्किल्स किंवा श्रम असतात. त्यामुळे एम्प्लॉयरच्या अपेक्षा पूर्ण करणे, आपल्या स्किल्स्मुळे होणारी निर्मीती पाहता येणे, इतर लोक सहजी रिप्लेस न करू शकणारे असे योगदान देण्यामुळे परीपूर्तीचा आनंद मिळणे आणि सर्वात महत्त्वाचे जो मोबदला मिळतो त्याने सार्या मूलभूत गरजा, चैनी भागवण्याकरीता पैसा मिळणे हे सारे सुखाचे विवीध पदर नोकरदाराच्या नशीबात येणारच. त्यामुळे स्वच्छंदी असणे जरी उपभोगायला मिळत नसले तरीही अंतीम ध्येय जे की आनंदी होणे हे प्राप्त होऊ शकते.
२. स्वच्छंदी असणे म्हणजे आदर्श व्यवस्था असे म्हणणे अतीरंजीत आहे. स्वच्छंदी मनुष्य आनंदी होईलच आणि त्याला मिळणारा आनंद निकोप, उदात्त असेलच असे नाही. उलट केवळ चोचले पुरवण्याला स्वच्छंदाचे नाव देऊन जगलो तर माझ्या तो केवळ पाशवी आनंद असेल.
३. सामान्य नेहमी मध्यममार्गच स्विकारू शकतात. रोजच्या कामात जितके वैविध्य, अचूकता आणि नैपुण्य आणता येईल तितके कामाचा आनंद अधिक मिळू शकेल, दुर्दैवाने आजीबात न आवडणारे काम करावे लागले तरीदेखील ते सोडून आवडणारे काम मिळवण्यासाठी प्रयत्न चालू ठेऊन कामाच्या वेळेला त्या वेळेपुरता आनंद घेऊन काम करणे शक्य असते आणि बरेच जण ते करतात(उदा. मी स्वतः)
४. उरलेला वेळ देखील प्रापंचीक जबाबदार्या आणि स्वतःचे छंद, आवडी यांच्यात विभागावाच लागतो. केवळ माझे स्वच्छंदपणे जगणे महत्त्वाचे म्हणून जबाबदार्यांकडे पाठ फिरवणे शक्य नसते. जबाबदार्या पार पाडण्यातदेखील आनंद असतोच, मुख्य म्हणजे त्या जबाबदार्या पार पाडल्याने येणारी कृतार्थतेची जाणीव. उरलेल्या वेळात मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याची चैन करता येते, तो वेळ स्वविकासासाठी, छंदाच्या परीपूर्तीसाठी देता येतो. शेवटी त्यानेदेखील मिळते काय? आनंदच. तेव्हा आनंद मिळणे हे ध्येय आहे. स्वच्छंदी राहणे हे त्या आनंदी राहण्याच्या सिद्धीकडे पोहोचण्याचा एक मार्ग(तुमच्या मताप्रमाणे) आहे. तोच एकमात्र मार्ग आहे हे आजिबात मान्य नाही.
५. केवळ वर्तमानातला क्षण सत्य मानून जगा, भविष्य आणि भूतकाळाला फाट्यावर मारा हा एक अत्यंत सुपरफिशीयल सल्ला वाटतो, तो अस्तित्वात आणणे शक्य असेलही मात्र त्याने आनंद मिळेलच आणि तोच महान आनंद असेल ही दोन्हीही गृहीतके खोटी वाटतात. भूतकाळाच्या आठवणींनी व्याकूळ होणे, इतीहासातील चुकांचे अवलोकन करणे, भविष्यासाठी तरतूद करणे, भविष्यातील यशाची स्वप्ने पाहणे या कृतींतून मिळणारा आनंद, तृप्ती यांना वर्तमानातला एकच क्षण जगणारे मुकत नाहीत का?
14 Feb 2017 - 1:01 pm | संजय क्षीरसागर
स्वच्छंदी असणे म्हणजे आदर्श व्यवस्था असे म्हणणे अतीरंजीत आहे.
तुमच्या संकल्पनेतच गल्लत आहे. स्वच्छंद म्हणजे जवाबदारी नाकारणं नसून
स्वेच्छेनं काम करणं
आहे. आनंद कामात नाही तर तुमच्यात आहे, हे न समल्यानं सगळा गोंधळ आहे. स्वेच्छेनं काम करणारा आनंदी असतो त्यामुळे त्याचं काम आनंदाचं होतं.केवळ वर्तमानातला क्षण सत्य मानून जगा, भविष्य आणि भूतकाळाला फाट्यावर मारा हा एक अत्यंत सुपरफिशीयल सल्ला वाटतो, तो अस्तित्वात आणणे शक्य असेलही मात्र त्याने आनंद मिळेलच आणि तोच महान आनंद असेल ही दोन्हीही गृहीतके खोटी वाटतात.
इथे ही आकलनाची गल्लत आहे. वर्तमान हा एकच काळ जगायला उपलब्ध आहे. भूतकाळ ही वर्तमानात प्रकट झालेली स्मृती आणि भविष्यकाळ ही वर्तमानातच केलेली कल्पना आहे. वर्तमानाचा उपयोग भविष्यात घडू शकणार्या गोष्टीसाठी करता येतो, उदा. तिकीट बुकींग. पण क्रिया कायम वर्तमानातच घडते. वर्तमानात राहून सतत गतस्मृतींचा आढावा घेणं किंवा तो सतत भविष्याची तरतूद करण्यासाठी वापरणं हा त्याचा अपव्यय आहे जो परिणामी जीवन नीरस करतो. तस्मात, आनंदात जगण्यासाठी केवळ वर्तमानच उपलब्ध असतो, त्यामुळे तुमचा मुद्दा टिकत नाही.
15 Feb 2017 - 10:45 pm | अर्धवटराव
खुप मस्त रसग्रहण.
पण यात आध्यात्माचे काँटेक्स्ट उगाच आल्यासारखं वाटतय. हि कविता मानसशास्त्रावरची आहे. माणसाच्या जगण्याच्या ऊर्मीने जगण्यातल्या भितीवर केलेली मात, प्रसंगी समझोता. इट्स प्योर सायकॉलॉजी... आणि हेच या कवितेचं बलस्थान आहे.