शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अनुत्तरित

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
3 Feb 2017 - 11:02 pm

aa

त्याचं विचित्र वागणं आता सगळ्यांनाच माहिती झालं होतं. दिवसभर समुद्रावर भटकणार्‍या मोहनला लोक एव्हाना वेडा म्हणायला लागले होते. एकटा मुरुगप्पाच रोज रात्री मोहनला आपल्या घरी घेऊन जाई, जेवायला घाली आणि मुलासारखं थोपटून झोपवी. मित्रत्वाच्या व्याख्येपलिकडे जाऊन तो मोहनला जपत होता; बायकोचा रोष ओढवूनही. एका अशाच संध्याकाळी मुरुगप्पा मोहनला शोधत किनाऱ्यावर आला. मोहन वाळूत घर बनवत होता. दर लाटेगणिक ते तुटत होतं, आणि तो पुन्हा पुन्हा नवीन बनवत होता.
बराच वेळ बघून मग एक उसासा टाकत मुरुगप्पा मोहनच्या बाजूला बसला. त्याने मोहनच्या खांद्यावर हात ठेवला. मोहनचे वाळूतले हात सावधपणे थांबले.
स्तब्धपणे जमिनीकडे बघतच मोहन म्हणाला, 'का आली रे सुनामी, माझ्या घरावर?'

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

3 Feb 2017 - 11:48 pm | राघवेंद्र

आवडली !!!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2017 - 7:09 am | अत्रुप्त आत्मा

छान.

जव्हेरगंज's picture

4 Feb 2017 - 10:09 am | जव्हेरगंज

कल्पना आवडली!!!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Feb 2017 - 10:52 am | अॅस्ट्रोनाट विनय

छान

पद्मावति's picture

4 Feb 2017 - 2:22 pm | पद्मावति

+१

शब्दबम्बाळ's picture

6 Feb 2017 - 10:19 am | शब्दबम्बाळ

आवडली!

चिनार's picture

6 Feb 2017 - 10:21 am | चिनार

छान कथा...