आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल
नुसतेच बोलण्याचे, नुसतेच सांगण्याचे
बापा समोर येती आवाज फाटण्याचे
खोली कशी असावी सांगू नका मला हो
असतात फायदे ही घरदार पसरण्याचे
लपणे कठीण नसते प्याल्यावरी, कितीही
असतात प्रश्न अवघड रेषेत चालण्याचे
घडले कसे लपावे नजरेतुनी जगाच्या ?
उरले न भान मजला थोबाड झाकण्याचे
चुपचाप राबणारा नवराच दु:ख जाणे
दिनरात बायकोच्या तालात नाचण्याचे
करता कशास त्रागा वाचून "केशवा"ला
असती विडंबने ही साहित्य हासण्याचे
प्रतिक्रिया
7 Dec 2007 - 7:11 pm | विसोबा खेचर
अवांतर - मिसळपावच्या सुरवातीलाच पोष्ट्या गजाननाने इथे टाकलेली 'प्रसव' ही कविता कुणा एका माणसाने लिहिलेली नसून तिच्या उभारणीत ३-४ जणांचा सहभाग आहे, त्यापैकी एक व्यक्ति ही अनील फणसे असावी, असा संशय नुकत्याच भारतयात्रेवर आलेल्या चांदीमयी या आमच्या खास मैत्रिणीने आमच्याशी गप्पा मारताना व्यक्त केला! :)
असो, केशवा सवडीने तुझ्या विडंबनाचा आस्वाद घेऊन प्रतिसाद टाकेन.
तात्या.
8 Dec 2007 - 11:58 am | धोंडोपंत
केशवा,
मस्त विडंबन रे !!!
चुपचाप राबणारा नवराच दु:ख जाणे
दिनरात बायकोच्या तालात नाचण्याचे
हाहाहाहाहा. क्या बात है!
आपला,
(हसरा) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com