शतशब्दकथा स्पर्धा: २०१७: पाउलखुणा

श्वेता व्यास's picture
श्वेता व्यास in जनातलं, मनातलं
30 Jan 2017 - 10:23 pm

aa

तू गेल्यावर रोज येते मी ठरलेल्या ठिकाणी.

आपल्यातली अंतरं विसरून जाते! समोर दिसतं ते सगळंच भव्य!
अथांग समुद्र, नजरेत न सामावणारं क्षितिज, अस्ताला जाऊनही अफाट रक्तिमा पसरवणारा सूर्य, बेभान सुटणारा वारा!

या सगळ्यापुढे आपण कोण य:किंश्चित प्राणी? पण तुझ्यात सगळं झुगारण्याची हिंमत नाही, कळून चुकलंय मला!

रोज पाहते तू गेल्यावर मागे उरलेल्या पाऊलखुणा. बराच प्रयत्न करते मी माझी पावलं त्यात बसवून चालण्याचा!
पण दोन पावलातलं अंतर तुझ्यापेक्षा कमीच पडतं, आणि माझे पुन्हा प्रयत्न सुरु होतात तुझ्याशी समाजमान्य बरोबरी करण्याचे!

आज का आला नाहीस? काळजी? हुरहूर? नक्की काय? काहीच क्षण.... आणि छान वाटतंय आज कितीतरी युगांनी वाळूत तुझी पावलं येताना पाहताना!

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

31 Jan 2017 - 5:14 pm | मराठी कथालेखक

आवडली..आणि बहूधा लेखिका कोण ते ही ओळखलंय :)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2017 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा

खूप आवडली. शशकचं सर्व काही आलय या कथेत.

निओ's picture

2 Feb 2017 - 1:12 pm | निओ

आवडली