कडाडकाड.!! आवाज ऐकून गाढ झोपेत असलेली रेश्मा उठून बसली...अंधारात तिला काय घडते आहे ते कळेचना. भूकंप!! सगळीकडे माती , कानठळ्या बसविणारे आवाज, सैरावैरा धावणारी माणसे यात तिचा आक्रोश हरवून गेला. घरातले सगळे ढिगार्याखाली जणू लुप्त झाले होते.
आक्रोशत ती काठमांडूच्या रस्त्यांवरुन चालत राहिली. अचानक तिला एका ढिगार्याखालून बारीक रडण्याचा आवाज ऐकू आला. क्षीणपणे कुणीतरी मदतीची याचना करीत होतं. तिने प्राणपणाने माती बाजूला केली. तर खाली एक कोवळीशी दिड वर्षाची बालिका तिच्याकडे पाहून हात पसरून रडत होती. रेश्माने तिला बाहेर काढले. “चल, पपी, आजसे एक नयी शुरुआत करेंगे. हम दोनो!” तिला घट्ट जवळ घेत रेश्मा म्हणाली. दोघींचेही अश्रू एक झाले होते.
प्रतिक्रिया
28 Mar 2017 - 9:21 pm | यशोधरा
ही कथा वाचलीच नव्हती. थोडक्या शब्दांत पोचली.